वसंत भोईर,वाडा
वाडा तालुक्यात ईद उत्साहात साजरी
वाडा तालुक्यात सामुहिक नमाज पठण व विविध धार्मिक कार्यक्रमाने रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील मुस्लिम बहुल लोकवस्ती असलेल्या वाडा शहर,कुडूस,नारे,वडवली व खानिवली या गावात आज उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते.हिंदू बांधवांनी आज मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.अनेक मुस्लिम बांधवांकडे आज शिरखुर्मा कार्यक्रमास सर्व धमिॅयांनी उत्साहाने हजेरी लावली.सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.तालुक्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

