शुभम सावंत,विरार
विरार पूर्व मनवेलपाडा भागात गुढीपाडवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन,महिलांचाब उत्स्फूर्त प्रतिसाद,
स्त्री प्रतिष्ठा अभियान तनिष्का व्यासपीठ व बहुजन विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विरार पूर्व येथे जय दुर्गा महीला मंडळ अध्यक्षा बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका संगिता भेरे यांनी परिसरातील महिलांना घेऊन तनिष्का व्यासपीठ गटप्रमुख म्हणून गेली १४ वर्षे अनेक कार्यक्रम राबवत आहेत.महिलांचे हक्क आणि प्रतिष्ठा महिलाच्या हक्काचे संरक्षण,त्यांना समाजात समानतेने जगता यावे, महिलांचे विविध समस्या सोडवण्यावर आजवर झालेल्या अनेक उपक्रमात भर देण्यात आला.
राज्यात अनेक ठिकाणी स्त्री प्रतिष्ठेची गुढी उभारली जाते.यंदाही तनिष्काची गुढी उभारताना अनेक संदेश देण्यात आले.स्त्री प्रतिष्ठान अभियान तनिष्का व्यासपीठ जबाबदारीसह घेते भरारी …नाव आहे तिचे नारी... शिकण्याची हाऊस म्हणजे यशाचे द्वार, शिकण्यासाठी वय नाही,फक्त जिद्द हवी असते.त्यामधील महत्त्वाचा संदेश म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिका आपण आपली घरपट्टी /पाणीपट्टी कर भरा आणि महानगरपालिकेला सहकार्य करा.त्याचबरोबर पाणी जिरवा,पाणी आडवा,जल है तो कल है,झाडे लावा झाडे जगवा,उन्हात हवी असेल सावली,तर वृक्ष लावा, बलात्कार झाल्यानंतर मेणबत्त्या लावण्यापेक्षा बलात्कार करणाऱ्यांना पेटवा,स्त्रीभ्रूणहत्या टाळा, असे अनेक संदेश देण्यात आले.या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

