शुभम सावंत,विरार
वसई-विरारमध्ये यशवंत वेलनेस सेंटरचे उदघाटन,
वसई-विरार महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांच्या हस्ते यशवंत वेलनेस सेंटरचे उद्घाटन आज उदघाट्न करण्यात आले.
नागरी परिसरात हे १५० खाटांचे अत्याधुनिक केंद्र असून,येथे व्यसनमुक्ती, पुनर्वसन आणि डिमेंशिया केअर यांसाठी विशेष सेवा देण्यात येणार आहेत.
हे केंद्र डॉ.सुरेश पाटील ( कन्सल्टंट सायकेट्रिस्ट ), संतोष प्रभू आणि हर्ष मिश्रा यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आले आहे. व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य पुनर्वसन यावर भर देत, दीर्घकालीन मानसोपचार सेवा देण्याचे या केंद्राचे उद्दिष्ट आहे.
उद्घाटन सोहळ्याला स्थानिक नागरिक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि मान्यवर उपस्थित होते.राजीव पाटील यांनी यशवंत वेलनेस सेंटरच्या संकल्पनेचे कौतुक केले,
“मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्तीसाठी अशा समर्पित केंद्रांची समाजाला नितांत गरज आहे. वसई-विरारसारख्या शहरात अशा आधुनिक सेवांचा लाभ मिळणे ही एक अभिमानाची बाब आहे.” असे त्यांनी यावेळी सांगितले.

