- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, वसई-विरार मनपातर्फे मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन, आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वीप अॅक्टीविटी अंतर्गत मा.आयुक्त तथा प्रशासक, वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी ०८.४५ वाजता वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, नवीन प्रशासकीय इमारत,यशवंत नगर रोड,विरार (पश्चिम) येथे मतदान जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या बाईक रॅलीमध्ये महानगरपालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी,तसेच महानगरपालिकेतील विविध विभागाचे कर्मचारी सहभाग घेणार असून सदर रॅली वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, यशवंत नगर रोड,विरार (पश्चिम) येथून सुरु होऊन बोळींज नाका,आगाशी नाका, निर्मळ नाका,होळी, पारनाका,कोर्ट नाका, माणिकपूर,अंबाडी रोड, वसंत नगरी,आचोळे व नालासोपारा पूर्व-पश्चिम ब्रिज मार्गावरून वसई विरार…
दीपक मोहिते, भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते बविआत सामील, आज भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नालासोपाऱ्याचे युवा आ.क्षितिज ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला.हा प्रवेश कार्यक्रम जुन्या विवा महाविद्यालयात पार पडला. भाजपचे वसई विरार जिल्हा युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस विक्की झा व विरार शहर जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस सुधाकर मिश्रा आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह बहुजन विकास आघाडीमध्ये सामील झाले.या सगळ्यांचे आ.क्षितिज ठाकूर यांनी स्वागत केले.यावेळी विक्की झा यांनी माध्यमांशी बोलताना भाजपमध्ये उत्तर भारतीयांना मानसन्मान मिळत नाही.आमची सतत उपेक्षा झाल्यामुळे आम्ही भाजपला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला.या निवडणुकी दरम्यान अनेक उत्तर भारतीय पदाधिकारी व कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीत सहभागी होण्याच्या तयारीत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुतीच्या नेत्यांनी आपल्या वाचाळवीराना आवरावे, काल पुरोगामी महाराष्ट्राचा सुसंस्कृत चेहरा काळवंडला गेला.महायुतीचे आ.सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या.त्यांच्या या टीकेचे राज्यात जोरदार पडसाद उमटले व विविध स्तरावरुन त्यांचा निषेध करण्यात आला.आपली राजकीय ताकद किती,आपण स्वतःला शेतकरी नेते म्हणवून घेतो.पण आपण शेतकऱ्यांची कशी लूट केली ? त्याचे भान न ठेवता त्यांनी शरद पवार यांच्या आजारावर टीका करावी,हे मराठी मनाला पटलेले नाही.त्यामुळे त्यांना भाजपमधूनही चांगलेच खडे बोल सुनावण्यात आले.पण अशा लोकांना खडे बोल सूनावुन भागणार नाही,तर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची गरम आहे.या खोतांनी सत्तेच्या हव्यासापोटी एकेकाळचे आपले सहकारी शेतकरी नेते…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, बोईसर मतदारसंघात बविआचे कार्यकर्ते कामाला लागले.. बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पहिली बैठक आज देवभूमी सफाळे येथे पार पडली.श्री गणरायाच्या व संविधानाच्या प्रतिमेसमोर नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या बैठकीला आ.राजेश पाटील यांच्यासह राजीव पाटील,प्रविण राऊत,सुरेश तरे,तालुका अध्यक्ष,प्रमुख पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राजीव पाटील व प्रविण दादा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.तसेच आपली शिटी निशाणी पळवण्याचा प्रयत्न करणा-यांना न्यायालयाने चांगलीच चपराक दिली व आपल्या अथक प्रयत्नानंतर शिटी निशाणी आपल्याला मिळाली,हा आपला विजय असल्याचे या दोघांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत जेव्हा राजेश पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा तो बोईसर मतदारसंघासाठी ते नवीन…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, माझा फोकस विकासकामांवर -आ.क्षितिज ठाकूर, नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ.क्षितिज ठाकूर हे कालपासून उसंत न घेता आपला मतदारसंघ पिंजून काढत आहेत.चौकाचौकात त्यांच्या लहानमोठ्या सभा घेण्यास सुरुवात होत आहेत.त्यांच्या या उपक्रमाला नालासोपारावासीयांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.गेल्या पाच वर्षात केलेल्या कामावर त्यांच्या प्रचाराचा भर आहे.शहरात झालेल्या जाहीर सभेत भाषण करताना ते म्हणाले,२००९,२०१४ व २०१९ या सलग तीन निवडणुकांमध्ये तुम्ही मला भरभरून प्रेम दिले.याही निवडणुकीत तसच प्रेम मला तुमच्याकडून मिळणार आहे,याची मला खात्री आहे.वाढत्या नागरीकरणामुळे विकासकामे करताना अनेक अडथळे येत असतात,पण मी माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यावर मात करू शकलो.आपल्या शहराची लोकसंख्या सुमारे आठ लाखाच्या घरात पोहोचली आहे.वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या…
दिपक मोहिते, निवडणूक पर्व, आ.हितेंद्र ठाकूर यांचा प्रचार दणक्यात सुरू;विरोधी पक्षाच्या उमेदवारांची बत्ती गुल…. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी काल चर्चमध्ये जाऊन फादरांची भेट घेतली व सामूहिक प्रार्थनेत सहभागी झाले.त्यानंतर त्यानी आपल्या प्रचारास रीतसर सुरुवात केली.आ.ठाकूर यांची ही कृती त्यांना दिलासा देणारी ठरली आहे.त्यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीत ख्रिस्ती समाजातून भरभरून मते मिळत असतात,यंदाही तशीच स्थिती राहणार आहे.या समाजाच्या अनेक विकासकामांबाबत आ.ठाकूर हे कायम प्रयत्नशील राहिले.या समाजाच्या अनेक तरुण उद्योजकांना विविध उद्योगात त्यांनी पुढे आणले.त्यामुळे त्यांच्या जवळच्या वर्तुळात अनेक ख्रिस्ती तरुण पाहायला मिळतात.तसेच मुस्लिम समाजातही त्यांना मानाचे स्थान आहे.सर्वधर्मसमभाव पाळत त्यांनी मुस्लिम समाजाचे अनेक जटील प्रश्न मार्गी लावले. शिक्षण,आरोग्य,वक्फ बोर्ड व…
दीपक मोहिते, न्यूजलाईन, आ.क्षितिज ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू, १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे युवा आ.क्षितिज ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू झाला असून काल त्यांनी प्रचाराच्या पहिल्याच दिवशी आपल्या प्रचाराचा धुरळा उडवून दिला.काल त्यांनी विरार पूर्व भागातील अनेक प्रभागात प्रचाराच्या मोहिमेस सुरुवात केली.यावेळी त्यांनी मतदारांची प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर दिला.त्यांच्या या उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या प्रचारात महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जागोजागी अनेक महिलांनी त्यांना ओवाळले व विजयाच्या शुभेच्छा दिला.यावेळी मतदारांशी संवाद साधताना आ.क्षितिज यांनी आपला फोकस केलेल्या विकासकामांवर ठेवला.तसेच सध्या जाणवणाऱ्या नागरी समस्यांचा आढावाही घेतला.ज्या काही समस्या प्रलंबित आहेत,त्या अल्पावधीत मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी जागोजागी…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, आपल्याला खोकेबाज सरकार भस्मसात करायचे आहे-उद्धव ठाकरे, काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी विधानसभा मतदारसंघात झालेली पहिली जाहीर सभा न भूतो न भविष्यती अशी झाली.या जाहीर सभेला झालेल्या गर्दीने यापूर्वीचे सारे रेकॉर्ड ब्रेक केले. या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभाराची अक्षरशः पिसे काढली.ते यावेळी म्हणाले, कोण स्वतःला देवाभाऊ तर कोण स्वतःला गुलाबी भाऊ म्हणतो,पण हे तिन्ही भाऊ जेथे जाऊ तेथे खाऊ,अशा पद्धतीने वागत आहेत.ज्या माणसाला आपण सर्वस्व दिलं,मानसन्मान प्रेम व आमदारकी दिल्यानंतरही हा नराधम आता शिवसेना नावाच्या आईच्या छाताडावर वार करायला उभा आहे.पण त्याला ते शक्य होणार नाही,कारण या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जरांगे पाटील यांचा वैचारिक गोंधळ उडाला आहे, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा सध्या वैचारिक गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे.गेल्या तीन महिन्यापासून ते मराठा समाज,विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार व मराठा आरक्षण विरोधात असलेल्या उमेदवारांना पाडणार,असे सांगत होते.पण काल त्यांनी अचानक घुमजाव करत निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय रद्द केला.जरांगे पाटील यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेमुळे मराठा समाजात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. निवडणूक लढण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर त्यांनी आता रिंगणात असलेल्या इतर पक्षाच्या उमेदवारांकडून,” आपला मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे,” असे लिहून घ्यायचे ठरवले आहे.जो उमेदवार असे लिहून देईल,त्याला आपण पाडायचं नाही,असे जाहीर केले आहे.हा एकप्रकारे…
दीपक मोहिते, विक्रमगड वगळता इतर मतदारसंघातील बंडखोरी संपुष्टात, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पालघर लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघातील अनेक बंडखोरांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले.परंतु शिंदे गटाचे बंडखोर तसेच पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी विक्रमगड मतदारसंघात मात्र आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला.त्यामुळे येथील भाजपचे उमेदवार हरीश्चंद्र भोये अडचणीत आले आहेत. १२९ विक्रमगड मतदारसंघात आता ११ उमेदवार रिंगणात आहेत.त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) सुनील भुसारा,भाजपचे हरिश्चंद्र भोये,मनसेचे सचिन शिंगडा,बविआचे हेमंत खुताडे,शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार प्रकाश निकम व अन्य सहा जण असे एकूण ११ जण रिंगणात आहेत.मात्र खरी लढत भाजपचे भोये व राष्ट्रवादीचे भुसारा यांच्यात होणार आहे.…
