- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- वातावरण बदलत चालल्यामुळे फडणवीस कासावीस,
- अमेरिकन सिनेटच्या निवडणुकीत रिपब्लिकनची पीछेहाट ; ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार,
- नालासोपारा नागरिकांचे पलायन ; यापूर्वी असं कधीच घडलं नव्हते,
- नेहा बोरा ; एक अभ्यासू व आक्रमक नेतृत्व,
- वाढवण बंदर ; स्थानिक ग्रामस्थांचे समुद्रात उतरून आंदोलन,
- गुंडाच्या दहशतीमुळे अनेक कुटुंवाचे घरदार सोडून पलायन,
- आ. हरिश्चंद्र भोये ; आदिवासी समाजाचे बहुआयामी नेतृत्व,
- एपस्टीन फाईलच्या कागदपत्रानी अनेकांची झोप उडवली…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, महायुतीमध्ये धुसफूस सुरु; कवकरच कुस्तीचा फड रंगण्याची शक्यता… *विधान परिषद निवडणुकीनंतर महायुतीच्या घटक पक्षात चांगलीच जुंपली आहे. शिंदे गटाचे धंगेकर विरुद्ध भाजपचे नवनाथ बन व निलेश राणे विरुद्ध बन हे तिघे एकमेकांच्या झिज्या उपटत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांना सबुरीने घेण्याचे सांगितले. एकंदरीत या सर्व घडामोडीवरून महायुतीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत असून लवकरच कुस्तीचा फड रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.* *नुकतेच विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक पार पडली. पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, मराठवाडा पदवीधर, पुणे शिक्षक, अमरावती शिक्षक, या निवडणुकीत महाविकास आघाडीने तिन्ही पदवीधर मतदारसंघ तर महायुतीने फक्त दोन शिक्षक मतदारसंघ…
दीपक मोहिते, माजी खा.राजन विचारे व आ. अनिल परब यांचे ठाणे पोलिसांवर सनसनाटी आरोप, गेल्या महिन्यात ठाणे शहरात शिवसेनेचे ( उबाठा ) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येतील सर्व आरोपीना अटक करण्यात आली.मात्र या हत्येमधील खरे सूत्रधार अद्याप मोकळे फिरत आहेत, त्यांना त्वरित अटक करा, अशी मागणी पूर्णेकर कुटुंबियांनी केली आहे. २९ ससप्टें.२०२६ रोजी घोडबंदर रोडवरील मानपाडा येथे शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या आणि चॉपरने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. २९ ऑक्टो.ला हत्येला एक महिना पूर्ण झाला तरी हत्येचे नेमके कारण पोलिसांनाअद्याप स्पष्ट…
दीपक मोहिते, डहाणू : कॉ. विनोद निकोले, राज्यातील सर्वात गरीब लोकप्रतिनिधी : आ.कॉ. विनोद निकोले, डहाणूचे आ. कॉ. विनोद निकोले हे विद्यार्थी दशेपासून राजकारणात सक्रिय आहे. सुरुवातीला डिवायएफआय या विद्यार्थी संघटनेमध्ये सक्रिय होते.त्यानंतर सिटूमध्ये ठाणे – पालघर जिल्हा सचिव, मग महाराष्ट्र सिटूचे राज्य सचिव आणि माकप राज्य समिती सदस्य व सध्या, विधानसभा सदस्य. २०१८ साली नाशिक – मुंबई किसान लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले होते. २०१३ – १५ दरम्यान आदिवासीच्या जमिनी व कामगार आंदोलनात त्यांच्यावर असंख्य गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना पाच जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.पण प्रशासनाच्या या आदेशाविरोधात सुमारे २५ हजार शेतकऱ्यांनी डहाणू पोलीस ठाण्याला घेराव घातला त्यामुळे पोलीस प्रशासन…
दीपक मोहिते, पालघरवासियांना देशोधडीला लावणाऱ्या वाढवण बंदरा विरोधात जनआक्रोश… वरोर येथे आयोजित करण्यात आलेल्या विनाशकारी वाढवण बंदरविरोधी जनआक्रोश सभेत हजारो ग्रामस्थानी सहभागी होऊन वाढवण विरोधी संघर्षाला पाठिंबा दिला. वाढवण बंदर हा केवळ एक प्रकल्प नसून पालघर जिल्ह्यातील निसर्ग, पर्यावरण, शेती, मासेमारी आणि स्थानिक जनजीवनावर दूरगामी परिणाम करणारा ज्वलंत विषय आहे. या प्रकल्पामुळे समुद्रातील जैवविविधता, मासळीचे नैसर्गिक अधिवास आणि मच्छीमार बांधवांच्या पारंपरिक व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शेतजमिनी, पाण्याचे स्रोत, पर्यावरणीय समतोल आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरही संकट कोसळण्याची शक्यता आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या हक्कांवर गदा आणणे, त्यांच्या जमिनी आणि उपजीविकेची साधने हिसकावून घेणे, त्यामुळे स्थानिक जनता गेल्या…
दिपक मोहिते, आम्ही सारे गाफिल, ( भाग क्र.१ ) असंख्य नद्या असूनही हजारो गावे तहानलेलीच… पालघर जिल्हा,हा देशातील ३६ वा जिल्हा आहे.सात वर्षांपूर्वी देशातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ रोजी नवीन आदिवासी जिल्हा निर्माण करण्यात आला. नागरी परिसराचा विचार न करता तत्कालीन राज्य सरकारने सागरी व डोंगरी,असे जिल्हा विभाजन केले. अनेक वर्षे चर्चेत असलेला हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला व जिल्ह्यातील जनतेचा आनंद गगनात मावेनासा झाला.ग्रामीण विकासाला चालना मिळून आपले जीवन सुख-समृद्धीने बहरेल,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.पण गेल्या बारा वर्षात प्रशासनाचा लालफितीचा कारभार व लोकप्रतिनिधींची बुरसटलेली मानसिकता,यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनात फारसा फरक पडला नाही.पाणी, शिक्षण, आरोग्य, कृषी,…
दीपक मोहिते, चुकीचा पायंडा, जनगणनेच्या कामात खाजगी व्यक्तीचा शिरकाव, देशात जनगणनेचे कार्य सुरू झाले असून केंद्र सरकारने प्रगणक म्हणून काम करण्यासाठी खाजगी व्यक्तींची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सरकारी कर्मचार्यांसह सरकारला योग्य वाटणार्या अन्य व्यक्तींनाही प्रगणक म्हणून नियुक्त करता येणार आहे. मात्र, या बदलामुळे जनगणनेची अचूकता, गोपनीयता आणि राजकीय हस्तक्षेप याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत.केंद्र सरकारच्या या निर्णयावर सर्वत्र टीका होत आहे.* *केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या महा रजिस्ट्रार कार्यालयाने पंधरा दिवसापूर्वी जनगणना ( सुधारणा ) नियम, २०२६ अधिसूचनेद्वारे जनगणना नियम, १९९० मधील प्रगणकांच्या पात्रतेसंबंधीच्या तरतुदींमध्ये बदल केला आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाला प्रगणक…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी,५ पैकी ३ जागा जिंकल्या नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीत महायुतीची चांगलीच पीछेहाट झाल्याचे लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोघांना त्यांच्या होम ग्राऊंडवर विरोधी पक्षांनी भुईसपाट केले. या निवडणुकीत मिळालेल्या यशाने विरोधी पक्षात सध्या आनंदाचे वातावरण आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, भाजप, काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले आहेत. पदवीधरच्या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळाल्यामुळे पदवीधरांनी महायुतीला साफ नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. पाचही मतदारसंघांतील मतमोजणीला प्रचंड वेळ लागल्यामुळे उमेदवारांच्या जीवांची चांगलीच घालमेल…
दीपक मोहिते, आ. राजेंद्र गावित यांची कारकीर्द बेताचीच राहिली, मूळचे नंदुरबारचे असलेले गावित, हे कालांतराने मिरा रोड स्थायिक झाले. राजकारणाची आवड असल्यामुळे त्यांनी त्यावेळी असलेल्या ठाणे जिल्ह्यातील विधानसभा उमेदवारीसाठी अनेक तालुक्याची चाचपणी केली. अखेर त्यानी पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवली. या तालुक्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अस्तित्व अगदी नगण्य होते. तरीही त्यानी ही निवडणूक लढवली. काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यानी त्यांच्या विरोधात या विधानसभा निवडणुकीत उपरा उमेदवार म्हणून छुपा प्रचार केला. त्यामुळे सेनेच्या मनिषा निमकर पुन्हा निवडून आल्या. पराभव झाल्यानंतरही गावित हे पायाला भिंगरी लावल्यागत तालुकाभर फिरले व त्यांनी तालुक्याच्या प्रत्येक गावांत स्वतःच्या कार्यकर्त्यांची फळी उभारली. त्यानंतर २००९ साली पुन्हा निवडणूक लढवली व…
दीपक मोहिते, अस्मानी संकट, उद्या प्रस्तावित वाढवण बंदर विरोधात वरोर येथे जनआक्रोश सभेचे आयोजन, पालघर जिल्ह्यातील वाढवण येघे होऊ घातलेले विनाशकारी महाकाय बंदराच्या विरोधात स्थानिक जनतेचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येत्या ३० ऑक्टो. रोजी स्थानिक जनतेतर्फे वरोर येथे जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी हे तिघे ” हा प्रकल्प स्थानिकांना रोजगार मिळवून देणारा तसेच तो जिल्ह्याला चौथी मुंबई बनवण्याच्या दिशेने नेणारा आहे, असा दावा करत आहेत. पण त्यांच्या या दाव्यात बिलकुल तथ्य नाही, उलट हा विनाशकारी प्रकल्प आम्हा स्थानिकांना देशोधडीला लावणारा आहे, असा आरोप करण्यात येत आहे. या बंदरासाठी समुद्र किनारपट्टीपासून ६…
दीपक मोहिते, बविआचा प्रभाग रचनेचा ठराव शासनाकडून रद्द, वसई-विरार शहर महानगरपालिकेमध्ये बहुमताच्या जोरावर आणि सर्व नियम-कायदे धाब्यावर बसवून बहुजन विकास आघाडीने मंजूर केलेला प्रभाग रचनेचा ठराव महाराष्ट्र शासनाने निलंबित केल्याचे विरोधी पक्ष नेते मनोज पाटील यांनी माध्यमाना सांगितले व याविषयी पत्रक प्रसिद्धीस दिले. नगरविकास विभागाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ४५१ (१) अन्वये ही कारवाई केली असून, या निर्णयामुळे महनगरपालिकेतील बविआच्या कारभाराला मोठा चाप बसला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण घडामोडींमध्ये भारतीय जनता पक्षाने घेतलेला आक्रमक पवित्रा आणि खासदार, दोन्ही आमदार व विरोधी पक्षनेते, गटनेते यांनी केलेल्या मंत्रालयस्तरावर पाठपुराव्याला मोठे यश आले. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या २० मार्च २०२६ रोजी…
