Author: दीपक मोहिते

चेतन भालेकर,मुंबई, राजकीय आखाडा, राज्यात लवकरच नवीन राजकीय समीकरणे… काल देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आज सकाळी शिवसेना उबाठा गटाचे सुभाष देसाई,अंबादास दानवे व मिलिंद नार्वेकर या तिघांनी सागर या फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली.ही भेट कशासाठी होती,हे स्पष्ट होत नसले तरी राजकीय वर्तुळात वातावरण मात्र तापू लागले आहे.एकनाथ शिंदे गटाची नाराजी व होत असलेले असहकार्य,अशा दोन कारणामुळे महायुतीमध्ये सध्या अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस आता शिंदे गटावर फारसे अवलंबून न राहता महायुतीची तटबंदी अधिक भक्कम करण्याच्या कामाला लागले आहेत.हिंदुत्वाचा पाया असलेल्या पक्षाची मोट बांधण्यासाठी त्यांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे.राज…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सत्तेचा मुकुट हा काटेरी असतो….. सत्तेचा मुकुट किती काटेरी असतो,याचा अनुभव वसई व नालासोपारा विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांना पावलोपावली घ्यावा लागत आहे.वसईच्या आ.स्नेहा दुबे यांची एक व्हिडियो क्लिप माध्यमावर व्हायरल झाली आहे.या क्लिपमध्ये आ.दुबे या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मानभावी सल्ला देत असताना पाहायला मिळाल्या.त्यांची ही विनंती मनपाचे अधिकारी मनावर घेतात का त्याला केराची टोपली दाखवतात,हे काही दिवसात स्पष्ट होईल. त्या ऑडिओ क्लिपमध्ये आ.दुबे आपल्या कार्यक्षेत्रात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,त्यामध्ये गटारे,पाणी,आरोग्य व अन्य समस्यांचा समावेश असून अधिकाऱ्यांनी याविषयी लक्ष घालून प्रश्न सोडवायला हवेत,अशी विनंती करताना पाहायला मिळाल्या.पण गेंड्याची कातडी पांघरलेले मनपाचे अधिकारी,त्यांच्या या विनंतीला मान देतात की केराची…

Read More

” टग्या, ” फडणवीस – राज यांची भेट ही राजकीयच….. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,हे काल सकाळी अचानकपणे नाश्ता करण्यासाठी राज ठाकरे यांच्या दरबारी दाखल झाले.नाश्ता करता करता त्यांनी तब्बल एक तास एकमेकांची विचारपूस केली.यावेळी त्यांनी या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,ही भेट केवळ सदिच्छा भेट,अशा स्वरूपाची होती,हे सांगायला मुख्यमंत्री फडणवीस विसरले नाहीत. ” नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर राज यांनी माझे अभिनंदन केले होते.त्यांचे आभार मानण्यासाठी मी आज त्यांना भेटायला गेलो,या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,” असे फडणवीस यांनी माध्यमाना सांगितले.पण त्यांच्या या दाव्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही.ही भेट मुळात सदिच्छा नव्हे तर राजकीय…

Read More

राजू देसाई,पालघर, पालघर येथे जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न, पालघरच्या डॉ.स.दा.वर्तक विद्यालयात नुकतीच जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न पार पडली. बोईसर एज्युकेशन सोसायटी आयोजित,लायन चंद्रशेखर घाग पुरस्कृत पालघर जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात घेण्यात आली.या स्पर्धेत प्राथमिक गटातून २७ तर माध्यमिक गटातून २८ शाळा सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत प्राथमिक विभागात पुढील शाळांनी प्राथमिक विभागात विजेतेपद पटकावले. प्रथम क्रमांक- प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज , पालघर, द्वितीय क्रमांक – सेंट जॉन इंटरनॅशनल स्कूल,पालघर तृतीय क्रमांक- डॉन बॉस्को स्कूल,बोईसर, माध्यमिक विभागातून पुढील शाळांनी विजेतेपद पटकावले. प्रथम क्रमांक- राजगुरु ह.म. पंडित विद्यालय,सफाळे, द्वितीय क्रमांक- आनंद आश्रम इंग्लिश स्कूल,पालघर, तृतीय क्रमांक- श्री.सिद्धीविनायक…

Read More

अनंत भोईर,पालघर, माजी आ.राजेश पाटील यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट, पालघर जिल्ह्यातील विविध भौगोलिक विभागांमध्ये नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी येत्या २७ फेब्रु. रोजी सकाळी ११. ०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज माजी आ. राजेश पाटील यांनी शिष्टमंडळासह माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील औद्योगिक,पर्यावरण, मच्छीमार,वनहक्क,आरोग्य, पाणीपुरवठा,रस्ते विकास, वाहतूक आणि वीजपुरवठा याविभागाच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.या बैठकीसाठी जिल्ह्यातील संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा आरोग्य अधिकारी, महावितरण,महामार्ग पोलीस, फॉरेस्ट विभाग,महसूल विभाग आणि पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांची उपस्थिती…

Read More

वसंत भोईर,वाडा, तीन एकर शेतीत तब्बल ११ हजार खरबूज रोपांची लागवड, वाडा तालुक्यातील आंबिस्ते बुद्रूक येथील शेतकरी कल्पेश काळूराम पाटील यांनी आपल्या ३ एकर शेतीत तब्बल ११ हजार रोपांची लागवड केली असून त्यासाठी त्यांना २ लाख ५० हजार इतका खर्च अपेक्षित आहे.खर्च वजा जाऊन चांगले उत्पन्न मिळेल,अशी अपेक्षा शेतकरी पाटील यांनी व्यक्त केली आहे. आंबिस्ते बुद्रूक येथील शेतकरी कल्पेश पाटील,हे दोन एकर जागेत खरबूज फळाचे पीक घेत असून कुंदन व्हरायटीज वाणाची लागवड त्यांनी केली आहे.खरबूज पीक ६० ते ६५ दिवसात तयार होते.तयार झालेल्या खरबूज खरेदीसाठी शहरातून व्यापारी शेतकऱ्याच्या शेतावर येऊन खरेदी करतात.प्र.कि.३० ते ३५ रु.असा भाव मिळत असतो.माझे खरबूज पीक…

Read More

वसंत भोईर,वाडा, बाॅयलर स्फोटातील मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या चारवर, तालुक्यातील वडवली या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एम डी पायरोलीसेस या कंपनीत गेल्या महिन्यात २९ जाने.रोजी बाॅयलरचा स्फोट होऊन कंपनीला भीषण आग लागली होती.या आगीत अनेक कामगार जखमी झाले होते त्यातील दोन कामगार व कामगारांची दोन लहान मुले असे एकूण चार जण मृत्यृमुखी पडले.या प्रकरणी वाडा पोलीसांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवून कंपनीचे मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. काजल प्रविण परमार आकाश प्रेम परमार,वसणी प्रवीण परमार व नुरा प्रेमसिंह मचार अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. एम.डी.पायरोलीसेस या कंपनीमध्ये जुने टायर जाळून त्या पासून ऑईल,तारा काढून त्यांची विक्री केली जात आहे.बुध.२९ जाने.रोजी सायंकाळच्या सुमारास कंपनीच्या…

Read More

नालासोपारा येथे झालेल्या ” फनस्ट्रीट सनडे,” ला नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद, वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा विभाग,जागरुक नागरिक संस्था वसई व नारी प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फनस्ट्रीट सनडे हा कार्यक्रम आज पार पडला.या कार्यक्रमात एरवी मोबाईलवर रमणारी मुले विविध खेळात रमल्याचे चित्र पाहायला मिळाले तर ज्येष्ठ नागरिकांनीही पुन्हा एकदा आपले बालपण अनुभवले. या कार्यक्रमाला नालासोपारा मतदारसंघाचे आ.राजन नाईक,माजी नगरसेवक प्रविण म्हाप्रळकर,क्रीडा विभाग, प्रभाग समिती ई च्या सहा. आयुक्त अश्विनी मोरे,सहा. आयुक्त शशिकांत पाटील,जेएनएस संस्थेतर्फे अध्वरी कुलकर्णी,नारी प्रेरणा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अंकिता नाईक,क्रीडा विभागाचे गणेश पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते. नालासोपारा येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सहभागी हजारों नागरिक व विद्यार्थी यांना…

Read More

नारायण पाटील, विरार पूर्व, भाताणे-आडणे रस्त्याचे भूमिपूजन संपन्न, माजी आ.राजेश पाटील यांच्या अथक प्रयत्नाने एमएमआरडीएकडून मंजूर करण्यात आलेल्या भाताणे-आडणे रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन भाताणे येथील तलाव परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले. गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत असलेल्या या रस्त्याचे काम भाताणे नवसई येथील नदीपासून गावापर्यंत डांबरीकरण,तसेच तलावाच्या पुढे सिमेंट काँक्रिटीकरण,अशा दोन टप्प्यांत होणार आहे.हा रस्ता यापूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाच्या अखत्यारीत होता,त्यामुळे दुरुस्तीला विलंब होत होता.मात्र,माजी आ.राजेश पाटील यांनी एमएमआरडीए विभागाशी सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा करून रु.६ कोटी निधी मंजूर करून घेतला. यासोबतच,पुढील टप्प्यात आडणे ते कळभोण रस्त्यासाठी रु. १२ कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष…

Read More

संजय लांडगे,वाडा खा.डॉ.सवरा यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्र्यांची भेट, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान पालघर लोकसभा मतदारसंघाचे खा.डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी राज्यमंत्री ( स्वतंत्र प्रभार ) आयुष मंत्रालय आणि राज्यमंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण, प्रतापराव जाधव यांची सदिच्छा भेट घेतली.या बैठकीत त्यांच्याकडे पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या. पालघर जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात,यासाठी प्रस्तावित २०० खाटांचे जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी आवश्यक अतिरिक्त निधी त्वरित मंजूर करावा,अशी मागणी खा.डॉ.हेमंत सवरा यांनी केली.या प्रकल्पासाठी कोट्यावधी रु.च्या निधीची गरज आहे. हे रुग्णालय झाल्यास पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई,ठाणे किंवा इतर ठिकाणी उपचारांसाठी जाण्याची गरज भासणार नाही,आणि त्यांना स्थानिक पातळीवरच चांगल्या आरोग्य…

Read More