वसंत भोईर,वाडा,
बाॅयलर स्फोटातील मृत्यूमुखी पडणाऱ्यांची
संख्या चारवर,
तालुक्यातील वडवली या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एम डी पायरोलीसेस या कंपनीत गेल्या महिन्यात २९ जाने.रोजी बाॅयलरचा स्फोट होऊन कंपनीला भीषण आग लागली होती.या आगीत अनेक कामगार जखमी झाले होते त्यातील दोन कामगार व कामगारांची दोन लहान मुले असे एकूण चार जण मृत्यृमुखी पडले.या प्रकरणी वाडा पोलीसांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवून कंपनीचे मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.
काजल प्रविण परमार आकाश प्रेम परमार,वसणी प्रवीण परमार व नुरा प्रेमसिंह मचार अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
एम.डी.पायरोलीसेस या कंपनीमध्ये जुने टायर जाळून त्या पासून ऑईल,तारा काढून त्यांची विक्री केली जात आहे.बुध.२९ जाने.रोजी सायंकाळच्या सुमारास कंपनीच्या बाॅयलर मध्ये स्फोट होऊन आग लागली आणि या आगीमुळे कंपनीतील साहित्याने पेट घेतला आणि या आगीने रौद्र रूप धारण करून कंपनीचा बराचसा भाग जळून खाक झाला आहे.या आगीत जखमी झालेल्या जखमींवर मुंबई येथील रूग्णालयात उपचार सुरू होते.
अखेर काजल या मुलीचा ३१ जाने.रोजी आकाश याचा ३ फेब्रु.रोजी तर वसणी परमार ( वय २६ ) नुरा प्रेमसिंह मचार ( वय २७ ) यांचा मृत्यृ झाला आहे.
दरम्यान, निष्काळजीपणे मृत्यू घडवणे प्रकरणी कंपनी मालक जावेद हरून मुसानी ( ६१ ) कंपनी व्यवस्थापक तुफान कलासिंग डामोर यांच्यावर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.गुन्ह्य़ाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे करीत आहेत.
