राजू देसाई,पालघर,
पालघर येथे जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न,
पालघरच्या डॉ.स.दा.वर्तक विद्यालयात नुकतीच जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न पार पडली.
बोईसर एज्युकेशन सोसायटी आयोजित,लायन चंद्रशेखर घाग पुरस्कृत पालघर जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात घेण्यात आली.या स्पर्धेत प्राथमिक गटातून २७ तर माध्यमिक गटातून २८ शाळा सहभागी झाल्या होत्या.
या स्पर्धेत प्राथमिक विभागात पुढील शाळांनी प्राथमिक विभागात विजेतेपद पटकावले.
प्रथम क्रमांक- प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज , पालघर,
द्वितीय क्रमांक – सेंट जॉन इंटरनॅशनल स्कूल,पालघर
तृतीय क्रमांक- डॉन बॉस्को स्कूल,बोईसर,
माध्यमिक विभागातून पुढील शाळांनी विजेतेपद पटकावले.
प्रथम क्रमांक- राजगुरु ह.म. पंडित विद्यालय,सफाळे,
द्वितीय क्रमांक- आनंद आश्रम इंग्लिश स्कूल,पालघर,
तृतीय क्रमांक- श्री.सिद्धीविनायक इंग्लिश हायस्कूल,विरार
तसेच सर्वसाधारण विजेतेपदाचा फिरता चषक राजगुरु ह.म.पंडित विद्यालय, सफाळे,या शाळेने पटकावला.
सर्व यशस्वी शाळा व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन..

