नारायण पाटील, विरार पूर्व,
भाताणे-आडणे रस्त्याचे भूमिपूजन संपन्न,
माजी आ.राजेश पाटील यांच्या अथक प्रयत्नाने एमएमआरडीएकडून मंजूर करण्यात आलेल्या भाताणे-आडणे रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन भाताणे येथील तलाव परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले.
गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत असलेल्या या रस्त्याचे काम भाताणे नवसई येथील नदीपासून गावापर्यंत डांबरीकरण,तसेच तलावाच्या पुढे सिमेंट काँक्रिटीकरण,अशा दोन टप्प्यांत होणार आहे.हा रस्ता यापूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाच्या अखत्यारीत होता,त्यामुळे दुरुस्तीला विलंब होत होता.मात्र,माजी आ.राजेश पाटील यांनी एमएमआरडीए विभागाशी सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा करून रु.६ कोटी निधी मंजूर करून घेतला.
यासोबतच,पुढील टप्प्यात आडणे ते कळभोण रस्त्यासाठी रु. १२ कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला माजी आ.राजेश पाटील,वसई पंचायत समितीचे सभापती अशोक पाटील,सरपंच हितेश बाडगा,उपसरपंच हेमराज कासार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रणय कासार,जिल्हा परिषद माजी सदस्या रंजना सायरे,तसेच ग्रामपंचायत सदस्य योगेश कुडू,सुदाम कुडू,अशोक कुडू, सुभाष कासार, सुभाष पाटील, भाऊ काका,सलीम शेख, रूपेश पागी,संजय कासार, रवी कासार,मोरेश्वर जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

