अनंत भोईर,पालघर,
माजी आ.राजेश पाटील यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट,
पालघर जिल्ह्यातील विविध भौगोलिक विभागांमध्ये नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी येत्या २७ फेब्रु. रोजी सकाळी ११. ०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
यासंदर्भात आज माजी आ. राजेश पाटील यांनी शिष्टमंडळासह माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील औद्योगिक,पर्यावरण, मच्छीमार,वनहक्क,आरोग्य, पाणीपुरवठा,रस्ते विकास, वाहतूक आणि वीजपुरवठा याविभागाच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.या बैठकीसाठी जिल्ह्यातील संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा आरोग्य अधिकारी, महावितरण,महामार्ग पोलीस, फॉरेस्ट विभाग,महसूल विभाग आणि पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.
जिल्ह्यातील प्रमुख समस्यांमध्ये औद्योगिक प्रदूषण,मच्छीमारांचे प्रश्न, सरकारी जमिनीवरील अवैध बांधकामे,वनहक्क पट्टे, ग्रामीण आरोग्यसेवा,जल जीवन मिशन अंतर्गत रखडलेली कामे,महामार्ग व वाहतूक समस्या,प्रामुख्याने कामण भिवंडी रस्त्याचे संथ गतीने सुरू असलेले काम तसेच वाढवण बंदर प्रकल्पाशी संबंधित प्रश्न प्राधान्याने चर्चिले जाणार आहेत.
ही बैठक जिल्ह्यातील नागरी आणि ग्रामीण भागातील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
या भेटीसाठी माजी आ.राजेश पाटील यांच्या समवेत , माजी जिल्हा परिषद सदस्य म्हात्रे,कुंदन विरारकर,समाजसेवक कमलाकर जाधव,सरपंच हितेश बाडगा,पी.टी.पाटील,हार्दिक राऊत,सचिन आकरे तसेच वनपट्टे संदर्भात भेटण्यासाठी आलेले बांधव उपस्थित होते.

