नालासोपारा येथे झालेल्या ” फनस्ट्रीट सनडे,” ला नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद,
वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा विभाग,जागरुक नागरिक संस्था वसई व नारी प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फनस्ट्रीट सनडे हा कार्यक्रम आज पार पडला.या कार्यक्रमात एरवी मोबाईलवर रमणारी मुले विविध खेळात रमल्याचे चित्र पाहायला मिळाले तर ज्येष्ठ नागरिकांनीही पुन्हा एकदा आपले बालपण अनुभवले.
या कार्यक्रमाला नालासोपारा मतदारसंघाचे आ.राजन नाईक,माजी नगरसेवक प्रविण म्हाप्रळकर,क्रीडा विभाग, प्रभाग समिती ई च्या सहा. आयुक्त अश्विनी मोरे,सहा. आयुक्त शशिकांत पाटील,जेएनएस संस्थेतर्फे अध्वरी कुलकर्णी,नारी प्रेरणा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अंकिता नाईक,क्रीडा विभागाचे गणेश पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.
नालासोपारा येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सहभागी हजारों नागरिक व विद्यार्थी यांना आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. मनमोकळेपणाने जेष्ठ नागरिक विविध खेळात सहभागी होऊन आपल्या जुन्या आवडी पुन्हा एकदा जगताना दिसत होते.मुले तर हातातील मोबाईल बाजूला ठेऊन खेळत होती.पण त्याचवेळी महिलाही आपल्यातील विविध कलागुण दाखवत होत्या.कोणी दोरीवरील उड्या मारत होत्या तर कोणी सायकलिंगचा आनंद घेत होत्या.आज झालेल्या फनस्ट्रीटमध्ये मलखांब,महिलांसाठी मंगळागौर,भजन,स्केटिंग,कराटे,झुम्बा,सायकलिंग,दोरी उड्या, चित्रकला,कॅलिग्राफी,या खेळानी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.हा उपक्रम
आता १६ फेब्रु.रोजी वसईतील दत्तानी मॅाल येथील रस्त्यावर आयोजन करण्यात आले असल्याचे महानगरपालिका सूत्राने सांगितले.

