- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” व्यक्तीविशेष,” पंकजा मुंडे ; अखेर राजकीय वनवास संपला, गेल्या महिन्यात माजी मंत्री व स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार पंकजा मुंडे यांचा सात वर्षाचा राजकीय वनवास संपुष्टात आला.देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ग्रामविकासमंत्री पदावर असताना त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने त्यांना प्रदीर्घ वनवास भोगावा लागला होता.ते वक्तव्य काय होते ते पहा,त्यावेळी त्या म्हणाल्या,” मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल,” या त्यांच्या एका वाक्यानंतर भाजपमधील अदृश्य शक्ती सक्रिय झाल्या व त्यांनी पंकजा मुंडे यांना हा राजकीय वनवास घडवून आणला.मंत्रीपदाच्या काळात त्यांच्यावर विद्यार्थ्यांच्या चिक्की खरेदीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता.त्यावेळी विरोधकांना माहिती पुरवणारे कोण होते,हे जगजाहीर आहे.त्यामुळे येथे त्यांचे नाव घेणे योग्य होणार नाही.२०१९…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्य दिवाळखोरीच्या वाटेवर, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारतर्फे प्रस्तावित करण्यात आलेली ” लाडकी बहीण,” योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.या योजनेला राज्याच्या वित्त विभागाने विरोध केला होता,असे उघडकीस आले आहे.पण सरकारने ती कार्यान्वित करून स्वतःचा अट्टाहास पूर्ण केला आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या डोक्यावर असलेला ८ कोटी रु.चा बोझा हा दहा लाख कोटीच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.शासन जाहीर करत असलेल्या योजनांसाठी पैसा आणायचा कुठून ?अशा संकटात वित्त विभाग सापडला आहे. या योजनेला लागणारा पैसा आणणार कुठून असा प्रश्न विचारत एका वित्त अधिकाऱ्याने ही योजना व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.राज्य सरकारला हा एकप्रकारे ” घरचा आहेर,” मिळाला आहे.तर अनेक अर्थतज्ञानी…
विवा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला नॅकचे ” बी ++,” मानांकन, पालघर, विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तसेच मुंबई विद्यापीठ संलग्नित विवा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, विरार कॉलेजने राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यापन परिषद ” नॅक,” च्या प्रथम मूल्यांकनामध्ये २.८४ सीजीपीए गुणांकनासह ” बी प्लस प्लस,” (बी++) मानांकन प्राप्त केले आहे. बी.फार्मसी हा अभ्यासक्रम वर्ष २०१० सुरू करण्यात आला, त्यानंतर फार्मसीला मिळालेल्या वाढत्या प्रतिसादामुळे २०१३ साली स्वतंत्रपणे विवा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.अशीच प्रगती करत असताना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्या ६० वरून १०० इतकी वाढवून मिळाली. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात एम्. फार्मसी फार्माकोलॉजी हा विषय घेऊन अभ्यासक्रम देखील…
दिपक मोहिते, आ.हितेंद्र ठाकूर पुन्हा रिंगणात असतील…! पळा पळा कोण पुढे पळे तो..! आगामी विधानसभा निवडणुकीत वसई व नालासोपारा मतदारसंघात अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या दोन्ही मतदारसंघात तुफान बॅटिंग केल्यामुळे भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळते.तर याच निवडणुकीत शिवसेनेच्या ( उबाठा ) भारती कामडी यांनीही लक्षणीय मते मिळवत दुसरा क्रमांक मिळवला.त्यामुळे महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेच्या ( उबाठा ) अनेक इच्छुकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. वसई व नालासोपारा विधानसभा हे दोन्ही मतदारसंघ आ.हितेंद्र ठाकूर यांचे गड असून २००९ चा एकमेव अपवाद वगळता अन्य सर्व निवडणुकांमध्ये आ.ठाकूर यांचे कायम…
” दीपक मोहिते,” ” बॉटमलाईन,” ” कारगिल विजय दिन ; दक्षिण आशियात भारतच ” दादा,” दरवर्षी आपल्या देशात ” कारगिल विजय दिन,” साजरा करण्यात येतो.युद्धविषयक असलेले सर्व आंतरराष्ट्रीय कायदे धाब्यावर बसवत पाकिस्तानच्या लष्कराने घुसखोरी करत काही भूभाग ताब्यात घेतला होता.३ मे १९९९ रोजी पाक लष्कराने घुसखोरी करत कारगिलमधील अनेक टेकड्यावर ताबा मिळवला.सुमारे ८५ दिवसाच्या लढाईनंतर भारताने हा परिसर पुन्हा ताब्यात घेतला व पाक घुसखोरांना यमसदनी धाडले.या पराभवामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच निंदानालस्ती झाली.भारतीय तोफखान्याच्या माऱ्यासमोर पाकच्या सैन्याची अक्षरशः धुळदाण उडाली व भयभीत झालेले लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ याना युद्ध थांबवण्यासाठी साकडे घातले.कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवा,त्यासाठी अमेरीकेला…
दीपक मोहिते, पुणेकर,आगामी विधानसभा निवडणुकीत हिसका दाखवतील, राज्यात सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण होऊन हाहाकार उडाला आहे.शहरी भागातील जनजीवन तर पार विस्कळीत झाले आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईच्या कामाची पाहणी करणारे नेतेमंडळी आता गायब झाले आहेत.राज्याची नैसर्गिक आपत्कालीन यंत्रणा पार ढेपाळली असून पुणे शहर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.मुख्यमंत्र्यांचे ठाणे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे नागपूर शहर देखील याच रांगेत आहे. पुण्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री अजित पवार काल पुणे महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षात आले होते.त्यांनी ऐटीत बसत पुण्यातील पूरपरिस्थिती पाहीली.या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या.ते आपल्या प्रतिक्रियेत काय म्हणाले ते पहा,ते म्हणाले ” शहरात वाटेल तशी बांधकामे झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यांचे…
दीपक मोहिते, जरांगे पाटील यांचे आंदोलन दिवसेंदिवस क्षीण होतेय, मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनातील बरीच हवा निघून गेली आहे.आंदोलन करायचे व अवघ्या काही दिवसात ते मागे घ्यायचे,असे सतत होत गेल्यामुळे लोक पार कंटाळून गेले आहेत.आता त्यांच्या आंदोलनाची सरकार देखील फारशी दखल घेत नाही.मी ” एवं करेन,मी त्यवं करेन,” अमुक अमुक तारखेला बॉम्ब फोडीन,अशा गर्जना करायच्या व प्रत्यक्षात काही करायचे नाही,असे सतत होत गेल्यामुळे त्यांच्यासमवेत असणारे त्यांचे साथीदार देखील त्यांच्यापासून आता दुरावत चालले आहेत. त्यांचे उपोषण,मोर्चा व अन्य आंदोलनाची राज्य सरकारला भिती वाटेनाशी झाली आहे.आंदोलन सुरू करायचं आणि काही दिवसात ते मागे घ्यायचे, असे सतत होत गेल्यामुळे राज्यसरकारने त्यांचे पाणी जोखले.उपमुख्यमंत्री देवेंद्र…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” स्वबळावर निवडणुका लढण्याचा राज ठाकरे यांचा निर्णय अंगलट येणारा, राज ठाकरे यांनी निवडणुकीची तुतारी फुकली असून राज्यात २२० ते २५० जागा लढणार असून या निवडणुकीत आपण कोणाशी युती करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.त्यांच्या या घोषणेने सर्वांच्याच भुवया वर गेल्या आहेत.स्वबळावर निवडणुका लढवण्याचा त्यांचा निर्णय हा महायुतीला मतविभागणीचा फायदा मिळवून देणारा ठरणार आहे.शिवसेना ( उबाठा ) गटाला दगाफटका करण्यासाठी ही एकप्रकारची खेळी असू शकते.हिंदू मतांमध्ये विभागणी व्हावी,यासाठी अशाप्रकारची रणनिती भाजपने आखली असावी,असा संशय राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात अनेक जाहीर सभा घेणारे राज ठाकरे यांना अचानक स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय…
दीपक मोहिते, अर्थसंकल्प कृषी क्षेत्राला मारक ठरणार, नुकत्याच मंजुरी मिळालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात युवा, महिला,गरीबव व शेतकरी, या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवल्याच्या वल्गना अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केल्या असल्या तरी २०२४-२५ च्या या अर्थसंकल्पात शेतकरी व कष्टकरी जनतेच्या गरजांकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. केंद्रसरकारने अर्थसंकल्प तयार करताना कार्पोरेट कंपन्यांशी सल्लामसलत केली,पण किमान हमीभावाच्या कायदेशीर अधिकाराच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एकाही संघटनेशी चर्चा करण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही. पीडिएस योजनेत ९७ हजार कोटी रु.ची केलेली कपात भरुन काढण्यासाठी कोणतीही तरतूद केली नाही.त्यामुळे अन्नधान्याची कोठारे रिकामे होऊन देशाच्या अन्नसुरक्षेवर संकट कोसळू शकते. शेती आणि शेतीवर उपजिवीका करणाऱ्या ५६ % लोकांसाठी एकुण ४८.२८…
दीपक मोहिते, वसई-विरारकर बेहाल, वसई-विरारकर नागरिक गेल्या दोन दिवसापासून हलाखीचे जीवन जगत आहेत.वसई तालुक्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.नालासोपारा पूर्व भागात गोरगरिबांच्या घरात पाणी घुसले आहे.व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरून त्यांच्या मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.१०० % नालेसफाई केल्याचा दावा करणाऱ्या वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त व त्यांच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रु.कोणाच्या घश्यात घातले ? याचा जाब विचारण्याची पाळी सध्या करदात्यावर आली आहे. दरवर्षी पाऊस पडला की या महानगरपालिका हद्दीतील लाखो नागरिक,व्यापारी व भाजीविक्रेते यांचा जीव टांगणीला लागतो.नालेसफाई न करता ठेकेदारांच्या घश्यात पैसे घालणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांनी आता या महानगरपालिकेतून चालते व्हायला हवे.” यंदा पाऊस खूप पडला,त्यामुळे पाणी साचले,”असे निर्लज्जपणे उत्तर देणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांनी तोंडाला…
