दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राज्य दिवाळखोरीच्या वाटेवर,
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारतर्फे प्रस्तावित करण्यात आलेली ” लाडकी बहीण,” योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.या योजनेला राज्याच्या वित्त विभागाने विरोध केला होता,असे उघडकीस आले आहे.पण सरकारने ती कार्यान्वित करून स्वतःचा अट्टाहास पूर्ण केला आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या डोक्यावर असलेला ८ कोटी रु.चा बोझा हा दहा लाख कोटीच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.शासन जाहीर करत असलेल्या योजनांसाठी पैसा आणायचा कुठून ?अशा संकटात वित्त विभाग सापडला आहे.
या योजनेला लागणारा पैसा आणणार कुठून असा प्रश्न विचारत एका वित्त अधिकाऱ्याने ही योजना व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.राज्य सरकारला हा एकप्रकारे ” घरचा आहेर,” मिळाला आहे.तर अनेक अर्थतज्ञानी अशा संवग लोकप्रियतेच्या योजना,या राज्याला दिवाळखोरीच्या मार्गावर नेणाऱ्या ठरणार आहेत.राज्यावर सध्या ७ लाख ८० हजार कोटी रु.चे कर्ज आहे.त्यामध्ये सतत वाढ होत आहे.एसटीच्या कामगारांचे वेतनही देताना सरकारची दमछाक होत आहे.तर आपल्या विभागाला पुरेसा निधी दिला जात नाही,यावरून मंत्रीमंडळाच्या बैठकीत अर्थमंत्री अजित पवार यांना इतर मंत्र्यांनी चांगलेच खडे बोल सुनावले.यावरून राज्याची आर्थिक घडी किती विस्कळीत झाली आहे,हे समोर आले आहे.महायुतीचे सरकार हे विधानसभा निवडणुकीमध्ये आपला पराभव होता कामा नये,यासाठी विविध योजना जाहीर करत खिरापत वाटत सुटली आहे.पण हे अत्यंत घातक असून राज्याला ते आर्थिक खाईत ढकलणारे ठरणार आहे.

