Author: दीपक मोहिते

अनंत भोईर,पालघर एकही कुटुंब निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही-पालकमंत्री नाईक, मानवी जीवनाची सुरुवात झाल्यापासून माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा आहेत.या गरजांचा एक भाग म्हणून निवारा आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकही घटक निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही,असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत राज विभागाच्या प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-२ च्या २० लाख लाभार्थ्यांना मंजूरीपत्राचे वितरण व १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रम,आज जननायक बिरसा मुंडा सभागृह,जिल्हा परिषद पालघर येथे पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास खा.हेमंत सवरा,जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.भानुदास पालवे, उपायुक्त…

Read More

दीपक मोहिते, अत्यंत संवेदनशील प्रकरण, युएसएडच्या भारतातील फंडिंगची सखोल चौकशी झाली पाहिजे… अमेरिकेतील यूएसएड ही संस्था वादाच्या भोवऱ्यात सापडली असून भारतातील त्यांच्या प्रतिनिधीवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला होणारी युएसएड अंतर्गत फंडिंग तात्काळ बंद केली आहे.या सर्व घडामोडीमुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे भारताच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की,अमेरिकेच्या ” युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट,” ( यूएसएड ) ने भारतात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या वाढवण्यासाठी २१ दशलक्ष डॉलर्स ( सुमारे १८२ कोटी रु. ) वित्तपुरवठा केला होता. ट्रम्प यांच्या…

Read More

वसंत भोईर, वाडा, लिंबाचे भाव कडाडले, आवक कमी, मागणी प्रचंड,; लिंबू ५ रु.ला एक, उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे,उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच लिंबाचा भाव गगनाला पोहोचला आहे. लिंबाचे एवढे दर वाढले आहेत की पूर्वी दहा रु.मध्ये तीन लिंबू मिळत होते.आता पाच रु.त केवळ एकच लिंबू विकण्यात येत आहे. सध्या बाजारात लिंबूचे दर वाढलेले आहेत.५० रु.पाव किलो,असा सध्या लिंबूचा दर आहे.उन्हाळ्याच्या सुरुवातीला दरात वाढ झाल्यामुळे येणाऱ्या काळात लिंबूचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. उष्मा वाढल्यामुळे शीतपेये,लिंबूसरबत पिण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.त्यामुळे बाजारात अचानक लिंबाची मागणी वाढली आहे.बाजारात २०० ते ३०० रु.शेकडा या दराने लिंबाची विक्री होत आहे. घाऊक बाजारात दर वाढल्याने लगेचच किरकोळ बाजारात…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” नेत्यांच्या गाठभेटी केवळ विचारपूस करण्यासाठी : नेत्यांचे दावे निखालस खोटे, राजकीय नेते एकमेकांच्या भेटी झाल्यानंतर बाहेर येऊन माध्यमांसमोर या भेटीत राजकीय विषयावर आमची चर्चा झाली नाही.आमची ही भेट वैयक्तीक स्वरूपाची भेट होती,असे सांगायला विसरत नाही आणि आपले चॅनेलवाले त्यांच्या या प्रतिक्रिया वारंवार दाखवण्यात धन्यता मानत असतात.नेत्यांच्या या गाठीभेटी या महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठीच असतात,पण ही मंडळी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी या भेटींना वेगळे स्वरूप देत असतात. राजकीय नेत्यांच्या भेटी या ” आज तुझ्याकडे जेवणात काय बनवले आहे ? सकाळी नाश्ता काय केलास ? आज दिवसभर तुझा काय प्रोग्राम आहे ? अशी विचारणा करण्यासाठी असते,असे लोकांनी…

Read More

अनिल दुमाडा,मांडवी मेढे येथे आढावा बैठक संपन्न, आज आदिवासी विकास विभागातर्फे अध्यक्ष विवेक पंडित यांनी अधिकारी व सरपंच,ग्रामसेवक यांची मेढे या गावात संयुक्त आढावा बैठक घेतली. मेढे ग्रामपंचायत हद्दीतील मधील घोघाटपाडा येथे ही बैठक पार पडली.या बैठकीत या विभागा अंतर्गत सुरु असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला.तसेच बैठकीत मेढे व पंचक्रोशीतील अनेक गावातील विविध विकासकामाचाही आढावा घेण्यात आला.तसेच प्रस्तावित विकासकामाबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या अपेक्षा व सूचना अध्यक्ष विवेक पंडित यांनी ऐकल्या व बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या.बैठकीला बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आ.विलास तरे,उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर घाडगे,गटविकास अधिकारी डोलारे व मेढे ग्रामपंचायत संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Read More

सुरेश वैद्य,सफाळे, बोईसर,सफाळे,केळवे-माहीम,नगरपंचायती होणे,ही काळाची गरज, सफाळे,केळवे-माहीम व बोईसर,या तीन ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणाला आलेला वेग व ग्रामपंचायतीची आर्थिक कुवत लक्षात घेऊन या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये व्हावे,अशी मागणी करण्यात येत आहे.त्यासाठी एका एनजीओचे शिष्टमंडळ लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री/नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. वरील तिन्ही गावातील लोकसंख्या सतत वाढत असून बोईसरची लोकसंख्या ही जवळपास एक लाखाच्या घरात पोहोचली आहे.येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीमध्ये उपलब्ध होणारा रोजगार लक्षात घेता,या परिसरात भविष्यात लोकसंख्येला अधिक वेग येण्याची शक्यता आहे.वास्तविक शहराचा वाढता पसारा लक्षात घेऊन राज्य सरकारने येथे यापूर्वीच नगरपरिषद स्थापन करायला हवी होती.पण…

Read More

जव्हार,प्रतिनिधी १० वी च्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत – भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, जव्हार येथे १० वीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि पहिल्या पेपरसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संदेश दुमाडा गटविकास अधिकारी,जव्हार, भुसाळ,सहा.पोलीस निरीक्षक, के.पी.तरवारे प्राचार्य भारती विद्यापीठ,अवधूत गावंड मुख्याध्यापक,के.व्ही. हायस्कूल,तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात आत्मविश्वास वाढवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. शिस्तबद्ध आणि नक्कलविरहित परीक्षा पार पाडण्यासाठी ” कॉपी मुक्त परीक्षा,” अभियानांतर्गत परीक्षाकेंद्र विनवळ येथे गटविकास अधिकारी संदेश दुमाडा,गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे व विस्तार अधिकारी मनीषा डांगे यांनी भेट देऊन परीक्षा केंद्राची पाहणी केली.त्यांनी केंद्रप्रमुख व…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अण्णा हजारे यांनी आपले मौन सोडल्यामुळे महायुतीचे अनेक मंत्री भितीच्या सावटाखाली, थोर समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत.गेले एक दशक मौन बाळगून असलेले हजारे अचानक राजकीय भाष्य करू लागल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.दोनच दिवसापूर्वी त्यांनी मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यास त्यानी आपली नैतिक जबाबदारी म्हणून सर्वप्रथम आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे,अशी मागणी केली आहे.तसेच ज्या आमदारांवर आरोप आहेत,अशा लोकांना मंत्रिमंडळात घेताना विचार केला पाहिजे.त्यासाठी निकष ठरवण्याची गरज आहे.यावेळी अण्णा हजारे यांनी वादग्रस्त मंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत. धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटे,हे दोन मंत्री भ्रष्टाचार प्रकरणी वादग्रस्त ठरले असताना अण्णा…

Read More

दीपक मोहिते, ” घरचा आहेर,” एसटी जमिनविक्री ; ” रोगापेक्षा उपचार भयानक,” असे होता कामा नये, लाडक्या बहिणींना व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात सवलती दिल्यामुळे एसटी तोट्यात आल्याची प्रांजळ कबुली परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव येथे झालेल्या एका कार्यक्रमात दिली.यावेळी त्यांनी अशा आकर्षक योजनांमुळे एसटीला दरदिवशी ३ कोटी रु.चा तोटा होत असल्याचे सांगितले.यावरून महायुती सरकार हे सत्तेच्या हव्यासापोटी राज्याला कसे आर्थिक खाईत ढकलत आहे,हे स्पष्ट होत आहे. गद्दारी करून सत्तेत आलेले आपले सरकार टिकले पाहिजे,यासाठी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्या,आल्या सवंग लोकप्रियतेच्या योजना लागू केल्या.या योजना लागू करताना राज्याची आर्थिक स्थिती ढासळेल,याची तमा न बाळगता सवंग लोकप्रियतेच्या…

Read More

तलासरी पोलिसांतर्फे विद्यार्थ्यांना नवीन कायद्याविषयी मार्गदर्शन, तलासरीच्या दयानंद नर्सिंग कॉलेज वडवली येथे आज सकाळी विद्यार्थी व शिक्षक यांना भारतीय न्याय संहिता-२०२३,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३,भारतीय साक्ष अधिनियम-२०२३, या नवीन कायद्याबाबत तलासरी पोलिस ठाण्याचे अधिकारी पोलीस निरीक्षक विजय मूतदक, तसेच कर्मचाऱ्यातर्फे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक पालघर याचे कार्यालयाकडून प्राप्त सायबर गुन्हे जनजागृती बाबत व्हिडीओ दाखवण्यात आले तसेच महिला अत्याचार, सायबर क्राईम,डायल ११२, लैंगिक अत्याचार,रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, महिला व बालकांची सुरक्षितता,याबाबतही मार्गदर्शन करण्यात येऊन पालघर पोलीस दलाच्या वेबसाईट,इंस्टाग्राम पेज व फेसबुक पेजला भेट व फॉलो करणेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

Read More