वसंत भोईर, वाडा,
लिंबाचे भाव कडाडले, आवक कमी, मागणी प्रचंड,; लिंबू ५ रु.ला एक,
उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे,उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच लिंबाचा भाव गगनाला पोहोचला आहे. लिंबाचे एवढे दर वाढले आहेत की पूर्वी दहा रु.मध्ये तीन लिंबू मिळत होते.आता पाच रु.त केवळ एकच लिंबू विकण्यात येत आहे.
सध्या बाजारात लिंबूचे दर वाढलेले आहेत.५० रु.पाव किलो,असा सध्या लिंबूचा दर आहे.उन्हाळ्याच्या सुरुवातीला दरात वाढ झाल्यामुळे येणाऱ्या काळात लिंबूचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
उष्मा वाढल्यामुळे शीतपेये,लिंबूसरबत पिण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.त्यामुळे बाजारात अचानक लिंबाची मागणी वाढली आहे.बाजारात २०० ते ३०० रु.शेकडा या दराने लिंबाची विक्री होत आहे. घाऊक बाजारात दर वाढल्याने लगेचच किरकोळ बाजारात लिंबू पाच रुपये एक या दराने विकले जात आहेत.
मागणी वाढल्याबरोबर २०० ते ३०० रु.प्र.शेकडा,अशी दरात वाढ झाली आहे.घाऊक बाजारातही दरात अशी भरमसाठ वाढ झाल्यामुळे किरकोळ बाजारातही लिंबाच्या किमतीत तातडीने वाढ झाल्याचे दिसून आले. किरकोळ बाजारातही लिंबू पाच रु.ला एक,अशा दराने सध्या विकत घ्यावे लागत आहे.
सध्या लिंबूची आवक कमी झाली आहे,नवीन लिंबाची लागवड प्रक्रिया सुरू झाली असली तरी बाजारात अपेक्षित आवक नसल्यामुळे त्याचा परिणाम लिंबाच्या दरावर झाला आहे.लिंबाच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लिंबाचा वापर रसवंतीगृहात मोठ्याप्रमाणात केला जातो.याशिवाय हॉटेल,नाश्ता सेंटर,येथेही लिंबे लागतात.
उन्हाचा कडाका वाढल्यामुळे लिंबू सरबतच्या मागणीतही प्रचंड वाढ झाली आहे.त्यामुळे लिंबांना अधिक भाव आला आहे.ऋतू बदलामुळे फेब्रु.महिन्यातच अशी स्थिती निर्माण झाली असेल तर,एप्रिल व मे महिन्या पर्यंत काय होणार,असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे.उन्हाळा संपेपर्यंत तरी लिंबाचे दर असेच चढे राहतील.
-दिनेश पाटील,लिंबू विक्रेता,

