जव्हार,प्रतिनिधी
१० वी च्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत –
भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, जव्हार येथे १० वीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि पहिल्या पेपरसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संदेश दुमाडा गटविकास अधिकारी,जव्हार, भुसाळ,सहा.पोलीस निरीक्षक, के.पी.तरवारे प्राचार्य भारती विद्यापीठ,अवधूत गावंड मुख्याध्यापक,के.व्ही. हायस्कूल,तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात आत्मविश्वास वाढवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
शिस्तबद्ध आणि नक्कलविरहित परीक्षा पार पाडण्यासाठी ” कॉपी मुक्त परीक्षा,” अभियानांतर्गत परीक्षाकेंद्र विनवळ येथे गटविकास अधिकारी संदेश दुमाडा,गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे व विस्तार अधिकारी मनीषा डांगे यांनी भेट देऊन परीक्षा केंद्राची पाहणी केली.त्यांनी केंद्रप्रमुख व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत परीक्षेच्या नियमांचे पालन कसे करावे,याबाबत सूचना दिल्या.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.

