तलासरी पोलिसांतर्फे विद्यार्थ्यांना नवीन कायद्याविषयी मार्गदर्शन,
तलासरीच्या दयानंद नर्सिंग कॉलेज वडवली येथे आज सकाळी विद्यार्थी व शिक्षक यांना भारतीय न्याय संहिता-२०२३,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३,भारतीय साक्ष अधिनियम-२०२३, या नवीन कायद्याबाबत तलासरी पोलिस ठाण्याचे अधिकारी पोलीस निरीक्षक विजय मूतदक, तसेच कर्मचाऱ्यातर्फे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक पालघर याचे कार्यालयाकडून प्राप्त सायबर गुन्हे जनजागृती बाबत व्हिडीओ दाखवण्यात आले तसेच महिला अत्याचार, सायबर क्राईम,डायल ११२, लैंगिक अत्याचार,रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, महिला व बालकांची सुरक्षितता,याबाबतही मार्गदर्शन करण्यात येऊन पालघर पोलीस दलाच्या वेबसाईट,इंस्टाग्राम पेज व फेसबुक पेजला भेट व फॉलो करणेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

