अनिल दुमाडा,मांडवी
मेढे येथे आढावा बैठक संपन्न,
आज आदिवासी विकास विभागातर्फे अध्यक्ष विवेक पंडित यांनी अधिकारी व सरपंच,ग्रामसेवक यांची मेढे या गावात संयुक्त आढावा बैठक घेतली.
मेढे ग्रामपंचायत हद्दीतील मधील घोघाटपाडा येथे ही बैठक पार पडली.या बैठकीत या विभागा अंतर्गत सुरु असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला.तसेच बैठकीत मेढे व पंचक्रोशीतील अनेक गावातील विविध विकासकामाचाही आढावा घेण्यात आला.तसेच प्रस्तावित विकासकामाबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या अपेक्षा व सूचना अध्यक्ष विवेक पंडित यांनी ऐकल्या व बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या.बैठकीला बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आ.विलास तरे,उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर घाडगे,गटविकास अधिकारी डोलारे व मेढे ग्रामपंचायत संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

