- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
संजय नेवे,विक्रमगड, साखरे देहर्जे प्रकल्पबाधित लोकांचे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर, विक्रमगड तालुक्यातील साखरे हद्दीवर देहर्जे प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे.या बांधकाम सुरू होऊन दोन वर्षे झाली असून तरी अजून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मात्र अद्याप मार्गी लागलेले नाहीत. या प्रकल्पासाठी वनविभागाची ४४५ हे. तर शेतकऱ्यांची २३४ हे.जमीन अशी एकूण ६८० हे.जमीन संपादित होणार आहे.या प्रकल्पासाठी साखरे,खुडेद, जांभा व सुकसाळे या ग्रामपंचायत हद्दीतील ३७४ प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.या प्रस्तावित धरणात एकूण ३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. हे पाणी वसई विरार महानगरपालिका देण्यात येणार आहे.या प्रकल्पाचा आम्हाला काय उपयोग ? असा सवाल प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित…
संजय लांडगे, वाडा शहर, गावपाड्यांना जोडणारे साकाव व पक्के रस्त्याची गरज, पालघर जिल्हातील अनेक आदिवासी गावपाडे विकासापासून वंचित असून अनेक पाड्यांवर धड चालायला रस्ते नाहीत,देश डिजिटल होत असताना ग्रामीण भागातील जनतेला आजही पायावाटाचांच आधार घ्यायला लागत आहे,अशी खंत समाजिक कायकर्ते अनंता वनगा यांनी व्यक्त केली आहे. वनगा यांनी जव्हार तालुक्यातील आपटाळे गावात भेट देऊन आपटाळे ते वनवासी गावा दरम्यान असणाऱ्या ओहोळाची पाहणी केली.या गावांमधील स्थानिक रहिवाश्यांनी केलेल्या मागणीनुसार या ओहोळात साकाव उभारल्यास दोन्ही गावांना व आजुबाजुच्या गाव पाड्यांचा दळण-वळणाचा प्रश्न मार्गी लागेल,असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी वनगा यांनी प्रकल्प अधिकारी जव्हार यांना निवेदन दिले व आदिवासी घटक योजनेअंतर्गत साकाव…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कोणत्याही रंगाला करदात्यांचा आक्षेप नाही,पण सलोख्याचे वातावरण बिघडवू नका, रंगात काय ठेवलं आहे.रंग हा इतर कोणत्याही रंगात मिसळला की तो वेगळा दिसायला लागतो,हे सारे रंग जेंव्हा एकत्र येतात,तेंव्हा मन मोहून टाकणारे इंद्रधनुष्य आकाराला येते.तेही क्षणिक डोळ्यांना सुख देते व आसमंतात विलीन होऊन जाते.पावसाळ्यात पाहायला मिळणाऱ्या इंद्रधनुष्य माझा प्रत्येक रंग निरपेक्ष असतो,हे दाखवून देत असतो.असो,आज मी साहित्याच्या भाषेत का बोलतोय ? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल ना ? त्याला कारणही तसच आहे.महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आता रंगाची ॲलर्जी होवू लागली आहे.कारण,सत्तेत परिवर्तन घडल्या,घडल्या पिवळा व हिरव्या रंगाची त्यांना उपरती झाल्याचे दिसून आले आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे उद्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आम्ही झालो बटिक, महानगरपालिकेचे पक्षपाती धोरण ; मॅरेथॉनच्या रंगात अचानक बदल, वसई-विरार महापालिकेच्या कार्यक्रमांत राजकीय अजेंडा नसावा,अशी अपेक्षा नवनिर्वाचित भाजप आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी व्यक्त केली होती.आम्ही आमचा रंग असावा,असा अजिबात आग्रह धरणार नाही.मात्र अन्य राजकीय पक्षांचा रंगही दिसू नये,असं आ.स्नेहा दुबे-पंडित यांनी काल आपल्या भाषणात म्हटलं होतं.पण नेमके घडलं उलटे,मॅरेथॉनचे बूथ,स्टॉल्स व झाडांना भगवा रंग लावण्यात आला.पूर्वी महानगरपालिका प्रशासन हिरवा व पिवळा रंग लावत असे,पण आयुक्तांना या रंगाची उपरती झाली व भगव्या रंगाने त्याची जागा घेतली. महापालिकेचे उपक्रम राजकीय पक्ष निरपेक्ष असावेत,अशी त्यांची अपेक्षा होती.प्रत्यक्षात मात्र भाजपने आपले “रंग,” सत्तेत आल्या आल्या आपले रंग दाखवण्यास…
दीपक मोहिते, शिंदे गटाची मुस्कटदाबी, खातेवाटपातही भाजपकडून एकनाथ शिंदे गटाची कोंडी, मुख्यमंत्रीपदावरून रंगलेले नाट्य आता निवळले असले तरी खातेवाटपावरून पुन्हा नळावरच्या हमरीतुमरीला पुन्हा सुरुवात सुरुवात झाली आहे.आमदारांचा शपथविधी पार पाडण्यासाठी आज तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.या अधिवेशनानंतर सर्वांचं लक्ष मंत्रीमंडळ विस्तार व खातेवाटपाकडे लागले आहे. महायुतीत मलईदार खात्यांवरून सध्या जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी गृहखात्याचा हट्ट धरला आहे.पण आजवरचा अनुभव लक्षात घेता मुख्यमंत्री फडणवीस हे खाते,इतर कोणालाही मिळू देत नाहीत.त्यामुळे शिंदे यांना गृहखातं मिळणे,कठीण आहे. महायुतीमध्ये भाजप हा मोठा पक्ष असून त्यांना सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत.त्यामुळे भाजपच्या वाट्याला सर्वाधिक खाती जातील,असा अंदाज आहे.गृह विभागासाठी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढील पाच वर्षे धोका नाही, गेल्या आठ दिवसांपासून विविध वृत्तवाहिन्यांनी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना डोक्यावर घेतले,त्यांना दिवसभरात १८ तास प्रसिद्धी दिली.त्यांच्या बातम्या चालवल्या,त्या लक्षात घेता एकनाथ शिदे व अजित पवार हे दोघेही या काळात घनघोर अंधारात गुडूप झाल्याचे दिसून आले. आज राज्यात ” सबकुछ देवेंद्र,” असे वातावरण पाहायला मिळत आहे.आगामी काळात ” दिल्लीमे नरेंद्र,” और महाराष्ट्रमे देवेंद्र,” ” और ये दोनो है,तो सबकुछ मुमकिन है,” असे घोषवाक्य झाले तर आपल्याला आश्चर्य वाटता कामा नये. आज दिल्ली दरबारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वजन वाढले आहे.त्यांना विचारल्याशिवाय मोदी व शहा हे दोघे राज्यासंदर्भात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वसई तालुक्याच्या वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर ; वाहतूक पोलीस केवळ वसुलीच्या मागे, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात वाहतूक व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला आहे.वाहतूक पोलीस हे ” मलिदा गोळा करण्याच्या संस्कृती,” मध्ये गुंतले आहेत.त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी हे वाहतूक पोलीस गायब होत असतात.वाहतूक पोलिसांची खाबुगिरी व वसई – विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा, यामुळे तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत.या प्रकरणी पोलीस आयुक्त व महानगरपालिकेचे आयुक्त या दोघानी हस्तक्षेप करावा,अशी मागणी करण्यात येत आहे. वसई – विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात वसई,विरार,नालासोपारा,या तीन महानगराच्या पूर्व व पश्चिम भागात सकाळी व संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असते.स्टेशन परिसर पूर्व व पश्चिम,बोळींज,पूर्वेस…
जव्हार प्रतिनिधी, साखरशेत येथे सुरू असलेल्या शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण वर्गाचा समारोप, पालघर जिल्ह्यातील केंद्रशाळा साखरशेत न.१ येथे गेले १० दिवस सुरू असलेल्या शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण वर्गाचा सांगता समारंभ काल पार पडला. सदर उपक्रम जि.प.शाळा साखरशेत १,ता. जव्हार येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार हरिश्चंद्र भोये,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जव्हार करिश्मा नायर (आय.ए. एस.),पंचायत समिती जव्हार सभापती विजयाताई लाहरे, उपसभापती दिलीप पाडवी, आणि साखरशेत ग्रामपंचायतच्या सरपंच अनिता चौधरी इ.मान्यवर उपस्थित होते.या प्रशिक्षण उपक्रमात विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले,ज्याचे प्रात्यक्षिक उपस्थित मान्यवरांसमोर सादर करण्यात आले.प्रशिक्षक शरद पाटील ( संभाजीनगर, औरंगाबाद,) यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त…
नदीम शेख,पालघर, कौतुकास्पद उपक्रम, विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी आधुनिक स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यासाठी सहकार्य. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी एक चांगलं घर असण्याची आवश्यकता आहे,असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गृहनिर्माण क्षेत्रात काम करणारी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया,ही एक आघाडीची ना-नफा तत्वावरची संस्था आहे. सॅमसंग सी.अँड टी.या संस्थेसोबत भागीदारी करत हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटीने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये सावरे,कंचाड आणि हमरापूर या गावांत राहणाऱ्या वारली आदिवासी कुटुंबांचे जीवन समृद्ध करण्यासाठी १५ घरे आणि जिल्हा परिषदेच्या ३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याचा संकल्प केला आहे.पायाभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या या दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या आदिवासी समुदायासाठी आवश्यक सुविधांची उभारणी,या प्रकल्पाद्वारे केली जाणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमावर बोलताना हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे राष्ट्रीय संचालक…
दीपक मोहिते, आश्रमशाळा ; भयाण वास्तव, भाग क्र.,३, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वरदान ठरलेल्या आश्रमशाळा योजनेत सुधारणा करा, कालच्या भाग क्र.२ मध्ये आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे भयानक वास्तव प्रकाशात आणले, आजच्या भागात आश्रमशाळा या चांगल्या योजनेचा गेल्या पाच दशकात कसा करायचा बट्ट्याबोळ करण्यात आला,याविषयी माहिती घेणार आहोत.ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे,शिक्षणासोबत दोन वेळचे जेवण,कपडेलत्ते त्यांना मिळावेत,त्यांच्या निवासाची सोय व्हावी,यासाठी राज्यसरकारने १९७२-७३ साली ही योजना सुरू केली.त्यासाठी सरकार दरवर्षी राज्याच्या अर्थसंकल्पात हजारो कोटी रु.ची आर्थिक तरतूद करत असते.ही योजना सुरू करण्यामागे ग्रामीण भागाचा मूलभूत विकास व्हावा,त्या भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहता कामा नयेत,असा उद्देश होता.गेल्या ५० वर्षात तो कितपत यशस्वी…
