Author: दीपक मोहिते

भूषण वर्तक, केळवे – पालघर, लोकप्रतिनिधी प्रशिक्षण व महिला मेळाव्याचे उत्साहपूर्ण आयोजन, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे पारोळ १ येथे लोकप्रतिनिधी प्रशिक्षण व महिला मेळावा उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून महिलांना सशक्त करण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास आशा चव्हाण जि.प.सदस्य,गीता पाटील माजी सभापती व पं.स. सदस्य,रमा किणी नगरसेविका,यज्ञा पाटील उपसरपंच, रवींद्र पाटील माजी उपसरपंच,कविता भूयाळ,ग्रा.प.सदस्य तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी,बालविकास अधिकारी,पर्यवेक्षिका आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या मेळाव्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध योजना,महिलांसाठी कायदा,( पोसो ) मोबाईल व इंटरनेट वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.महिलांच्या सक्षमीकरणासाठी व तंत्रज्ञानाच्या योग्य उपयोगाबाबत माहिती…

Read More

संजय लांडगे,वाडा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी सुनिल पाडवी, वाडा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी सुनिल दावा पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाडवी हे गेली तीन दशके शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांना २६ वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असून त्यांनी यापूर्वी प्रभारी मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री ” माझी शाळा,सुंदर शाळा,” या उपक्रमात सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांचे शैक्षणिक कार्य व अनुभव याची दखल घेऊन संस्था व शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.शिक्षण,हे गाव पाड्यावरील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असुन प्रत्येक पाड्यावरील मुलगा-मुलगी शिक्षणाच्या प्रवाहात पोहोचला पाहिजे.ज्यामुळे…

Read More

अजित क्षीरसागर,ठाणे आपत्ती व्यवस्थापन समिती ; एकनाथ शिंदे यांना डच्चू ,समर्थकांमध्ये संतापाची लाट, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डच्चू देण्यात आल्यामुळे ठाण्यातील शिंदे यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.विद्यमान उपमुख्यमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजप सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे या नाराज कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या दोघांचे संबंध चांगलेच ताणले गेले आहेत.मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी काही काळ अबोला धरत महायुती सरकारच्या दैनंदिन कामापासून स्वतःला दूर ठेवले होते.ते या काळात आपल्या मूळगावी दरे येथे विसावले होते.अनेक निरोप त्यांच्या निकटवर्तीयांतर्फे पाठवल्यानंतरही शिंदे यांची नाराजी कायम…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यातील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले का हो ? काल आपल्या वाढदिवसादिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडेसे आनंदी पाहायला मिळाले.त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कॉल केल्याचा कदाचित हा परिणाम असावा.कारण गेल्या काही दिवसांपासून शिंदे हे दिल्लीपासून दुरावले आहेत.पंतप्रधान मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व सध्या काय चालले आहे ? आणि कुठे आहात ? अशी विचारणा केली.ज्यावेळी आपल्यापासून दुरावलेली एखादी व्यक्ती आपली आस्थेने चौकशी करतो,तेंव्हा त्या दुरावलेल्या व्यक्तीला खूप नाही पण किंचित बरं वाटू लागते.त्यामुळे खूप दिवसांनी का होईना,शिंदे हे माध्यमांसमोर बोलते झाले,आणि त्यांनी माध्यमांना खडेबोल सुनावले. ते काय म्हणाले पहा जरा,ते…

Read More

सुनिता जोंधळे,नागपूर डॉ.क्षिप्रा उके व डॉ.शिवशंकर दास,दाम्पत्यांचा ६ वर्षाचा यशस्वी लढा : १२७ कोटींचा दावा मान्य, मालमत्तेच्या व्याख्येत बौद्धिक बौद्धिक संपत्तीच्या समावेशाचा युक्तिवाद मान्य. ॲट्रॉसिटी ॲक्ट मधील ” प्रॉपर्टी,” ची व्याख्या व्यापक करण्यास न्यायालयास भाग पाडले. डॉ.क्षिप्रा उके व डॉ.शिवशंकर दास,हे पती – पत्नी दोघेही जेएनयुचे पीएचडीधारक.सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर ” सोशल पॉलिटिकल अवेरनेस अमंग लोकल युथ,” या विषयावर त्यांनी स्वखर्चाने नागपुरात संशोधन करण्याचे ठरवले. नागपूरात दीक्षाभूमीपासून अर्धा एक कि.मी.अंतरावर असलेल्या उच्च जातीयांचे वर्चस्व असलेल्या लक्ष्मीनगर मधील इमारतीत/वसाहतीत त्यांना घर भाड्याने मिळाले. काही दिवसांनंतर हे दोघे राजकीय घडामोडीमध्ये सहभागी होत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. रोहित वेमुलाच्या…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” संपर्कमंत्रीपद : भाजप,आयुधासारखा वापर करणार….. ज्या जिल्ह्यात आपला पालकमंत्री नाही,त्या जिल्ह्यात संपर्कमंत्री नेमण्याचा जो निर्णय भाजपने घेतला आहे तो शिंदे व अजित पवार गटांसाठी धोकादायक ठरणारा आहे.भाजप या पदाचा हा वापर हा आयुधासारखा करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नव्याने नियुक्त झालेले संपर्कमंत्री या दोन्ही गटाच्या पालकमंत्र्यांच्या कारभारावर देखरेख तर ठेवणारच,परंतु आपल्या पक्षासाठी हानिकारक ठरू शकतील,असे निर्णय ते घेऊ देणार नाहीत.एकंदरीत हे संपर्कमंत्री ” वॉच डॉग,” ची भूमिका पार पाडणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाची एक वेगळी छाप आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,या मातृसंघटनेच्या छत्रछायाखाली वाढलेल्या भाजपला संघाने आखून दिलेल्या चौकटीत काम करावे लागते.गेल्या दहा बारा वर्षात हे आपण…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शेतकरी,बेरोजगार व सर्वसामान्य माणूस मेला तरी बेहत्तर…! तीन वर्षांपूर्वी राज्यात सत्तापालट झाल्यापासून सर्वच पक्षात ” फोडाफोडीच्या राजकारणा,” ला आता राजाश्रय मिळू लागला आहे.दर दिवशी अमुक माजी आमदार,तमुक पदाधिकारी या पक्षात गेला,त्या पक्षात गेला,अमुक पदाधिकारी नाराज असून लवकरच तो या पक्षात दाखल होणार,अशा आशयाच्या बातम्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत. एकमेकांचे आमदार,खासदार व पदाधिकारी गळाला लावणे,हे आता राष्ट्रीय कार्य आहे,असा समज जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी करून घेतला आहे. वास्तविक राज्यात लोकहीत, विकास व जनतेच्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्न आ वासून उभे असताना या राजकीय पक्षांनी फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे.राज्यात कृषी,आरोग्य,रोजगार, शिक्षण व पायाभूत…

Read More

अमन शेख,मनोर अंगणवाडी सेविकांचे प्रधानमंत्री मातृवंदना योजना प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण, जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना या विषयावर विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. मनोर येथे संपन्न झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात सुमारे ३०० अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन ) चंद्रशेखर जगताप प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास विभाग,प्रवीण भावसार यांनी केले. प्रशिक्षणादरम्यान,मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे महत्त्व स्पष्ट केले.सदर योजना पूर्वी आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येत होती,मात्र आता ती महिला…

Read More

मनिषा जोशी,पुणे कॅन्टोनमेंट, पोलिसाच्या डोक्यात दगड घालणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड, पुणे जिल्ह्यातील भेकराईनगर येथे बाईकस्वाराने रागाच्या भरात वाहतूक पोलिसाच्या डोक्यात दगड घालून पळ काढला होता.त्या आरोपीची पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत.सासवड रस्त्यावर ही घटना घडली होती.या घटनेत पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक ( वय ४७ ) हे गंभीर जखमी झाले होते.या घटनेनंतर आरोपी पळून गेला होता. पोलिसांनी त्याला धाराशिव येथून जेरबंद केले आहे. दरम्यान  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी येथील कार्यक्रमात पुण्यामध्ये क्राईम रेट सतत वाढतो आहे. पोलिसांनी अशा आरोपीची धिंड काढून गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले होते.वाहतूक पोलिसांला मारहाण करुन जखमी करणार्‍या बबलु मासाळ ( वय २५,मुळ…

Read More

सुशीला फातरपेकर, नालासोपारा, नालासोपारा ” फनस्ट्रीट,” उपक्रमाला बालगोपाळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद, वसई-विरार महानगरपालिका क्रीडा विभाग,जागरूक नागरिक संस्था ( वसई ) आणि नारी प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ फन स्ट्रीट,” हा अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लहानपण परत येत नाही,मात्र त्याच्या आठवणी पुन्हा जगता येतात,याचा अनुभव आज नालासोपारा शहरातील नागरिकांनी घेतला.महानगरपालिका व अन्य संस्थाच्या सहकार्याने आज शहरात ” फनस्ट्रीट,” ला या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात शहरातील बाळगोपाळ व तरुण / तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज सकाळी मोठ्या उत्साहात या रनला सुरुवात झाली.या उपक्रमामुळे बालपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला,यामध्ये सहभागी झालेल्याना खेळ, मनोरंजन आणि…

Read More