सुरेश काटे,तलासरी,
कवाडा शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा,
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कवाडा ठाकरपाडा येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चारित्र्यावर आधारित माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सुशीला तिरपुडे,ज्येष्ठ शिक्षिका जेष्ठ गीता गुडपे यांनी दिली.
या कार्यक्रमामध्ये कवाडा गावच्या सरपंच दर्शना बोदले यांनी उपस्थित महिला व विद्यार्थिनींना स्व:रक्षणाचे महत्व,संस्कार कसे दिले जावे, हे जिजाऊ मातेचे उदाहरणं देऊन सांगितले.
तसेच या दिवशी शालेय विद्यार्थींनीनी जागतिक स्तरावर पराक्रमी शूरवीर महिलांची भूमिका सादर केली.निपुण भारत अंतर्गत मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र या माध्यमातून इ. १ ली ते ३ री पर्यंतच्या मुलांसाठी माता-पालक गट कार्यरत आहे.या दिवशी उत्कृष्ट काम करणाऱ्या माता गटांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले,तसेच उपस्थित महिलांच्या विविध मनोरंनात्मक स्पर्धेचे आयोजन करून प्रथम क्रमांकावर आलेल्या तीन महिलांना बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी,शिक्षक वृंद व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

