मनिष म्हात्रे,वसई
वसईत जागतिक महिला दिनानिमीत्त बाईक रॅलीचे आयोजन,
डी फॅक्टरी,रॉयल थम्स,डार्क हॉर्स मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वसईमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आज वसईत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
वसई विरार महानगरपालिका मुख्यालय विरार येथून चिमाजी आप्पा स्मारक वसई किल्ला दरम्यान रॅली काढण्यात आली होती.
सकाळी अनेक महिला व पुरुष रायडर्स यामध्ये सहभागी झाले होते. सामाजीक कार्यकर्ते नितीन म्हात्रे आणि प्रीती म्हात्रे
यांनी रॅलीला झेंडा दाखवल्यानंतर सकाळी ८:०० वाजता रॅलीला सुरुवात झाली.वसईतील धवल नितीन म्हात्रे या बाईक रायडर तरुणाने २०१२ साली महिलांच्या कर्तुत्वांना वाव मिळावा,यासाठी जागतीक महिला दिनी बाईक रॅली काढण्यास सुरुवात केली होती.करोना महामारीच्या काळात धवल याचा दुदैवाने मृत्यू झाला.त्याच्या पश्चात त्याची आठवण म्हणून त्यांचे कुटुंबीय व मित्र दरवर्षी वसईत रॅलीचे आयोजन करीत असते.
नालासोपारा पश्चिम ते गास मार्गे,सन सिटी,अंबाडी रोड ते नरवीर चीमाजी अप्पा स्मारक असा बाईक स्वारांनी प्रवास केला.त्यात जवळपास ५० महिला रायडर्स होत्या. एकंदरीत स्त्री,पुरुष मिळून २०० हून अधिक रायडर्स रॅलीमध्ये सहभागी झाले होते. नरवीर चिमाजी आप्पा स्मारक येथे रॅली आल्यानंतर ढोल व ताशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आलं.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गौरव राजपूत,श्रेयस धुरी,ट्रॉय,युवराज,किरण शिंदे या सर्वांच्या टीमने खूप परिश्रम घेतले.महिलांच्या आत्मसन्मानाच्या निमित्ताने काढलेल्या रॅलीत कामण येथील एका आश्रमशाळेला मदत करण्याचा संकल्प करून,रॉयल थम्स,व्ही. रायडर्स, बर्न ग्रुप सर्व बाईक स्वारांचं आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
अमेरिका वर्ल्ड डाॅर्फ ऑलिम्पिक गेम्स पॉवरलिफ्टिंग सुवर्णपदक विजेती तसेच वसईची सुवर्णकन्या रूही शिंगाडे,अभिनेत्री व मिस दिल्ली रेखा राणा,साऊथ आफ्रिकन स्टार एनजीओ,क्रिकेटपटू सुलक्षणा नाईक,जेट एअरवेजच्या पायलट कँप्टन चावला,गिर्यारोहक हर्षाली वर्तक अशा विविध क्षेत्रात नावलौकीक कमावलेल्या महिला गेल्या या बाईक रँलीत सहभागी झाल्या होत्या.
बायकर्समध्ये नावाजलेल्या रॉयल थम्स,हेर्ली डेविडसन, ट्रीम्प,यामाहा,इंडीयन, बीएमडब्लू,बर्न,बॉम्बे,सुझूकी,होन्डा,कावासाकी,एप्रिला,राॅयल इनफिल्ड,डूकाटी,मोटो गुझ्झी,केटीएम, बजाज,हँरीअर्स,पेडल पावर या संस्थांच्या रायडर्स या बाईक रँलीत सहभागी झाल्या होत्या.

