- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नौटंकी लक्षात न येण्याइतके वसईचे लोक दुधखुळे नाहीत…. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या अनेक मतदारसंघात दिग्गज उमेदवारांना पराभव चाखावा लागला.या पराभवाच्या मागची नेमकी कारणे काय आहेत ? याची उकल करण्यासाठी अनेक आमदारांनी न्यायालयात धाव घेतली आहे.या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनपेक्षितपणे झालेल्या या परिवर्तनानंतर किती बदल झाला ? मतदारसंघातील विकासकामांना किती वेग आला ? व अन्य प्रश्नांची उत्तरे लवकर मागणे,हे न्यायाला धरून होणार नाही.कारण सुरुवातीचे दोन ते तीन महिने,हे ” नव्या नवरीच्या,नवलाईचे नऊ दिवस असतात,” ते त्यांना द्यावेच लागतात. हा दोन महिन्याचा काळ आता जवळपास संपत आला आहे.त्यामुळे परिवर्तनाच्या लाटेत…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे भारती विद्यापीठ शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न, जव्हार भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या सांस्कृतिक कार्यक्रमात नारीशक्तीच्या दुर्दम्य ध्येयाला निश्चय वृत्तीला आणि त्यागाला सलाम करण्यासाठी ” तमसो मा ज्योतिर्गमय,” या प्रार्थनेच्या ओळींतून पूर्ण शाळेचा कार्यक्रमाचे स्वरूप तयार करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस नववीच्या विद्यार्थिनींनी भारती विद्यापीठ गीत म्हटले. तर सिनियर केजीच्या गार्गी गायकवाड या लहानशा विद्यार्थिनीने पाहुण्यांसाठी सुंदर स्वागत गीत सादर केले व सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जव्हार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे व मनीषा डांगे,शिक्षण विस्तार अधिकारी,पंचायत समिती जव्हारचे अधिकारी उपस्थित होते.भारती विद्यापीठ…
वसंत भोईर,वाडा, मिरचीचा तोरा उतरला,होऊ द्या झणझणीत… नवीन मिरचीचे उत्पादन निघताचा मिरचीचा भाव उतरण्यास सुरुवात झाली आहे.कोणत्याही प्रकारची मिरची केवळ १५० रु.कि. दराने मिळत आहे. मिरचीचे भाव याहून खाली उतरण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तेलंगणा राज्यात मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.अर्ध्या अधिक देशात तेलंगणा राज्याचीच मिरची विक्री केली जाते. मागील वर्षी चांगल्या दर्जाच्या मिरचीचा भाव सुमारे २६० रु. कि.जोपर्यंत पोहोचला होता. मिरची खरेदी करण्यासाठी किमान ५०० रु.ची नोट घेऊनच जावे लागत होते.मिरची हा आहारातील अविभाज्य भाग बनला आहे. गेल्यावर्षी बेडगी- १५०- ३००- ४५० गरुडा-१००- २५० -३५० गुंटूर- १५० – २०० – २५० लवंगी- १८० – २१०- ३०० कोणत्या…
सुगंध जुन्नरकर,वाणगाव परीक्षा कॉपीमुक्त,भयमुक्त आणि निकोप वातावरणात पार पाडाव्यात – पालकमंत्री गणेश नाईक, मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत,१२ वी व १० वी परीक्षा कॉपीमुक्त,भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात, यासाठी पालघर या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आवाहन करीत आहे,असे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पत्राद्वारे कळवले आहे. तुमच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे.आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त,आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जावे,यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा.शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून,ते तुमच्या ज्ञानवृध्दी आणि जीवन घडवण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्वल भविष्यासाठी माझी सर्व…
मनिष म्हात्रे,वसई, उद्या विरार येथे ओम श्री साईधाम मंदिराचा ३८ वा वर्धापनदिन, विरार पश्चिम,गावठाण रोड येथे असलेल्या ओम श्री साईधाम मंदिराचा ३८ वा वर्धापन दिन सोहळा उद्या साजरा होत आहे.समस्त विरारवासीयांसाठी मायेची सावली देणारे कृपाछत्र,अशी किर्ती असलेल्या या साईनाथांच्या मंदिर वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे तसेच भंडा-याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अभिषेक,होम-हवन,महापुजा,महाप्रसाद,भजन-किर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.मंदिराच्या वर्धापनदिनी हजारो साईभक्त दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेत असतात. विरार पश्चिमेस गावठाण येथे १२ फेब्रु.१९८७ रोजी या मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे.दरवर्षी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते.मागील काही वर्षात मंदिर वर्धापन दिन सोहळा हा विरारचा जणू उत्सव बनून गेला…
संजय लांडगे,वाडा ऐतिहासिक किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याची गरज – डॉ.सवरा, अर्थसंकल्पीय अधिवेशनात पालघर जिल्ह्यातील भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या किल्ल्यांची दुरवस्था आणि नागरी सुविधांच्या अभावाबाबत खा.सवरा यांनी या विषयी महत्वाचा प्रश्न उपस्थित केला.तसेच या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत,अशी मागणी खा.डॉ.हेमंत सवरा यांनी केली. आपले सरकार पर्यटन वाढीसाठी लहान व मोठ्या पर्यटन स्थळांचा विकास करण्यावर भर देत आहे. इतिहासाची साक्ष पटवणाऱ्या किल्ल्यांचे संरक्षण व विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पालघर जिल्ह्यात वसई किल्ला,अर्नाळा किल्ला, शिरगाव किल्ला,अशेरी किल्ला,केळवा किल्ला, भोपतगड,कोहोच किल्ला, तांदुळवाडी,तारापूर, महालक्ष्मी,गंभीर गड,वज्रगड, डहाणू किल्ला,मांडवी किल्ला, काळदुर्ग आणि टकमक किल्ला यांसारखी अनेक ऐतिहासिक स्थळे…
शुभांगी शिंदे,नाशिक, संस्कृतमुळे प्राचीन भारतीय संस्कृतीची ज्ञानप्राप्ती : प्रा.के. डी.शिंदे, संस्कृत भाषेमुळे व्यक्ती सुसंस्कृत होतो,तसेच प्राचीन भारतीय संस्कृतीचे अगाध ज्ञानदेखील आपल्याला प्राप्त होऊ शकते.म्हणून तरुणांनी संस्कृत भाषा शिकण्याकडे प्रोत्साहित झाले पाहिजे,असे प्रतिपादन प्राध्यापक के.डी. शिंदे यांनी केले.ते मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयात आज झालेल्या एकदिवसीय जिल्हास्तरीय संस्कृत भाषा संवर्धन कार्यशाळेच्या पहिल्या मार्गदर्शन सत्रात बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक के. डी. शिंदे व डॉ. लीना हुन्नरगिरीकर होते. संस्कृत भाषेमुळे व्यक्ती सुसंस्कृत होतो,तसेच प्राचीन भारतीय संस्कृतीचे अगाध ज्ञानदेखील आपल्याला प्राप्त होऊ शकते.म्हणून तरुणांनी संस्कृत भाषा शिकण्याकडे प्रोत्साहित झाले…
अभय घोरपडे,अलिबाग, रायगड जिल्हा पालकमंत्रीपद : राष्ट्रवादी व शिवसेना वाद चिघळणार…. राज्यातील नाशिक आणि रायगड,या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.आज रायगड जिल्हा नियोजन आढावा बैठकीवरून राष्ट्रवादी व शिंदे गटातील वाद पुन्हा उफाळून वर आला आहे.या घडामोडीवरून महायुतीत पुन्हा धुसफूस सुरु झाल्याचे स्पष्ट होत आहे.अशात आज शिवसेनेच्या आमदारां शिवाय रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडल्यामुळे चांगलीच ठिणगी पडली आहे.रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पध्दतीने या बैठकीला उपस्थित होते,भरत गोगावले रायगडमध्येच आहेत,महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे शिंदे यांचे आमदार देखील रायगडमध्ये असल्याची माहिती आहे.त्यामुळे एकनाथ शिंदें गटाच्या आमदाराशिवाय रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली.त्यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेना आणि…
अजित क्षीरसागर, ठाणे कळवा येथे ट्रेनमध्ये मोबाईलचा स्फ़ोट : कोणीही जख्मी नाही, मोबाईल ही हल्लीच्या युगात अत्यावश्यक वस्तू असली तरी ती कधीही आपल्या जीवावर उठू शकते.कारण हल्ली मोबाईलचे स्फोट होण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. आज ठाण्यात उपनगरीय प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला.त्यामुळे काही काळ प्रचंड गोंधळ उडाला होता.या स्फोटानंतर संपूर्ण डब्यात धूर पसरला, नेमके काय घडलं,हे न कळल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणी आपत्ती कक्षातर्फे जी माहिती दिली आहे,त्यानुसार काल रात्री ८.१५ वाजता ही घटना सीएसमटी- कल्याण लोकल कळवा स्थानकात आली असता घडली.या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.पण या स्फोटामुळे घाबरलेले…
दीपक मोहिते, थोर समाजवादी नेते मनवेल तुस्कानो यांचा १९ फेब्रु.रोजी अमृतमहोत्सवी गौरव सोहळा, समाजवाद व गांधीवादाने ओतप्रोत भरलेले निर्भयी व तत्वनिष्ठ,अशी ओळख असलेले मनवेल तुस्कानो यांचा बुध.१९ फेब्रु.रोजी विरार येथे अमृतमहोत्सवी गौरव सोहळा साजरा होत आहे. गेल्या ५० वर्षांपासून तळागाळातील सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी गल्ली ते दिल्लीपर्यंत अविरत संघर्ष करणाऱ्या या थोर नेत्याचा त्यांच्या जन्मभूमी व कर्मभूमीत होणाऱ्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात मुंबई,पालघर,ठाणे व राज्याच्या विविध भागांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.विरार पश्चिमेस सेंट जोसेफ हायस्कुल मैदान, नंदाखाल येथे सांयकाळी ५.०० वाजता होणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वसई प्रांताचे बिशप थॉमस डिसुझा आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले तर विशेष अतिथी म्हणून सामाजिक…
