अजित क्षीरसागर, ठाणे
कळवा येथे ट्रेनमध्ये मोबाईलचा स्फ़ोट : कोणीही जख्मी नाही,
मोबाईल ही हल्लीच्या युगात अत्यावश्यक वस्तू असली तरी ती कधीही आपल्या जीवावर उठू शकते.कारण हल्ली मोबाईलचे स्फोट होण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
आज ठाण्यात उपनगरीय प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला.त्यामुळे काही काळ प्रचंड गोंधळ उडाला होता.या स्फोटानंतर संपूर्ण डब्यात धूर पसरला, नेमके काय घडलं,हे न कळल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
या प्रकरणी आपत्ती कक्षातर्फे जी माहिती दिली आहे,त्यानुसार काल रात्री ८.१५ वाजता ही घटना सीएसमटी- कल्याण लोकल कळवा स्थानकात आली असता घडली.या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.पण या स्फोटामुळे घाबरलेले प्रवासी डब्याबाहेर जाण्यासाठी दरवाजाकडे धावले,पण पोलिसांनी त्यांना रोखले व सुरक्षितपणे त्यांना बाहेर काढले.दरम्यान ज्या महिलेच्या मोबाईलचा स्फोट झाला,ती मात्र पोलिसांना सापडू शकली नाही.या घटनेची रेल्वे पोलीस कसून चौकशी करत आहेत.

