संजय लांडगे,वाडा
ऐतिहासिक किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याची गरज – डॉ.सवरा,
अर्थसंकल्पीय अधिवेशनात पालघर जिल्ह्यातील भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या किल्ल्यांची दुरवस्था आणि नागरी सुविधांच्या अभावाबाबत खा.सवरा यांनी या विषयी महत्वाचा प्रश्न उपस्थित केला.तसेच या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत,अशी मागणी खा.डॉ.हेमंत सवरा यांनी केली.
आपले सरकार पर्यटन वाढीसाठी लहान व मोठ्या
पर्यटन स्थळांचा विकास करण्यावर भर देत आहे. इतिहासाची साक्ष पटवणाऱ्या किल्ल्यांचे संरक्षण व विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
पालघर जिल्ह्यात वसई किल्ला,अर्नाळा किल्ला, शिरगाव किल्ला,अशेरी किल्ला,केळवा किल्ला, भोपतगड,कोहोच किल्ला, तांदुळवाडी,तारापूर, महालक्ष्मी,गंभीर गड,वज्रगड, डहाणू किल्ला,मांडवी किल्ला, काळदुर्ग आणि टकमक किल्ला यांसारखी अनेक ऐतिहासिक स्थळे व किल्ले आहेत.ही स्थळे भूतकाळातील संस्कृती,कला आणि वास्तुशैलीचे दर्शन घडवतात. परंतु या किल्ल्यांचे संरक्षण व विकासाची नितांत आवश्यकता आहे.
या किल्ल्यांवर पिण्याचे पाणी, शौचालय,कॅफेटेरिया आणि इतर नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी योग्य उपाययोजना राबवणे गरजेचे आहे.योग्य सुविधा निर्माण केल्यास पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल,असे मत डॉ.सवरा यांनी व्यक्त केले.

