मनिष म्हात्रे,वसई,
उद्या विरार येथे ओम श्री साईधाम मंदिराचा ३८ वा वर्धापनदिन,
विरार पश्चिम,गावठाण रोड येथे असलेल्या ओम श्री साईधाम मंदिराचा ३८ वा वर्धापन दिन सोहळा उद्या साजरा होत आहे.समस्त विरारवासीयांसाठी मायेची सावली देणारे कृपाछत्र,अशी किर्ती असलेल्या या साईनाथांच्या मंदिर वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे तसेच भंडा-याचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी अभिषेक,होम-हवन,महापुजा,महाप्रसाद,भजन-किर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.मंदिराच्या वर्धापनदिनी हजारो साईभक्त दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेत असतात.
विरार पश्चिमेस गावठाण येथे १२ फेब्रु.१९८७ रोजी या मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे.दरवर्षी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते.मागील काही वर्षात मंदिर वर्धापन दिन सोहळा हा विरारचा जणू उत्सव बनून गेला आहे.गेल्या ३७ वर्षांत ओम श्री साईनाथ मंदिर ट्रस्टने अनेक धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक,सांस्कृतिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवलेले आहेत.आरोग्य क्षेत्रात मोलाचे कार्य या ट्रस्टमार्फत वर्षभर सुरू असतात.

यावर्षी मंदिराचा ३८ वा वर्धापनदिन सोहळा संपन्न होत आहे.विशेष म्हणजे गेल्या काही वर्षापासून वर्धापनदिनाला दर्शनासाठी येणाया भाविकांना देण्यात येणारा महाप्रसाद हा साईभक्तांनी आपल्या घरी बनवलेल्या प्रसादातून देण्यात येतो.विविध जाति-धर्माचे साईभक्त आपला पारंपारिक वेष परिधान करुन यावेळी आवर्जून उपस्थित असतात.साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विरार पश्चिम गावठाण परिसरात नयनरम्य रोषणाई करण्यात येत असते.दरवर्षी हिंदी-मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक नामवंत अभिनेते,मराठी कलाकारांची उपस्थिती असते.भजन संध्या व इतर कार्यक्रमास हजारो लोक उपस्थित असतात.विरार पश्चिम स्टेशन ते मंदिरापर्यंतच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते.
ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्टतर्फे विविध उपक्रम पालघर जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरही राबवण्यात येत असतात.सन २००७ साली ट्रस्टतर्फे शिर्डी येथील निमगांव,निघोज येथे भव्य स्वरूपात पालखी आणि पदयात्रींसाठी साई पालखी निवारा बांधण्यात आला आहे.महाराष्ट्र व गुजरात राज्यातून तसेच संपूर्ण देशभरातून साई पालखी निवारा येथे येत असतात.लाखो पदयात्री भक्तांनी निवासाचा लाभ घेतला आहे.या निवाऱ्यात शिर्डीत पालखी आणि पदयात्रेतून येणाऱ्या भाविकांची चहा,नाश्ता, जेवण,निवास तसेच आंघोळीसाठी गरम पाणी, अशी सोय विनामूल्य केली जाते.येणाऱ्या भाविकांना अध्यात्मिक मन:शांती अनुभवण्यासाठी ध्यानकेंद्र,प्रशस्त गोशाळा,देशी-वेदेशी पक्षांसाठी आधिवास क्षेत्र,अद्ययावत मत्सालय,उद्यानात मुलांसाठी खेळाचे साहित्य उभारण्यात आले आहे.पालखी निवारा परिसरात शंकर,पंचमूखी हनुमान,महादेव,विठ्ठल व गणेशाच्या भव्य संगमरवरी मुर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत.” साई पालखी निवारा, ” परिसरात बांधलेल्या दोन इमारती शिर्डी साईबाबा संस्थानाला देणगी दाखल देण्यात आल्या आहेत.पालघर जिल्हातील दुर्गम भागातील गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठीही सातत्याने या ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत असतात.जिवनावश्यक वस्तूंबरोबर शैक्षणिक साहित्य वाटप व कला-क्रिडा गुणांना वाव मिळावा,म्हणून क्रिडा साहीत्यांचे lवेळोवेळी वाटप केरण्यात येत असते.अनेक दानशुर साईभक्तांच्या व संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत असतो.अनेक सामाजिक उपक्रम,वारकऱ्यासाठी अन्नदान,महाप्रसाद तसेच मोफत रूग्णवाहिका,फिरते दवाखाने,आरोग्य शिबिरे, संगणक शिबिरे,असे अनेक उपक्रम होत असल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले.

