शुभांगी शिंदे,नाशिक,
संस्कृतमुळे प्राचीन भारतीय संस्कृतीची ज्ञानप्राप्ती : प्रा.के. डी.शिंदे,
संस्कृत भाषेमुळे व्यक्ती सुसंस्कृत होतो,तसेच प्राचीन भारतीय संस्कृतीचे अगाध ज्ञानदेखील आपल्याला प्राप्त होऊ शकते.म्हणून तरुणांनी संस्कृत भाषा शिकण्याकडे प्रोत्साहित झाले पाहिजे,असे प्रतिपादन प्राध्यापक के.डी. शिंदे यांनी केले.ते मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयात आज झालेल्या एकदिवसीय जिल्हास्तरीय संस्कृत भाषा संवर्धन कार्यशाळेच्या पहिल्या मार्गदर्शन सत्रात बोलत होते.यावेळी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक के. डी. शिंदे व डॉ. लीना हुन्नरगिरीकर होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाची सदर कार्यशाळेत
दुसऱ्या मार्गदर्शन सत्रात डॉ. हुन्नरगिरीकर यांनी प्राचीन संस्कृत ग्रंथांचा आधार घेत विद्यार्थ्यांना संबोधन केले. त्याचप्रमाणे आजच्या काळात संस्कृत भाषेचे महत्त्वदेखील विशद केले.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.एस. एस.काळे यांनी केटीएचएम महाविद्यालयात आयोजित होणाऱ्या विविध विद्यार्थी केंद्रित उपक्रमांची माहिती दिली.संस्कृत भाषेकडे व्यवसायिक दृष्टिकोनाने बघण्याचा सल्लादेखील विद्यार्थ्यांना दिला.
कार्यशाळेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.तुषार पाटील व डॉ.सविता तिदमे यांनी प्रयत्न केले.कार्यशाळेस जिल्हाभरातून विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.तुषार पाटील यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.