- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” सुप्तावस्थेत असलेला राज्याचा सत्तासंघर्ष टोकाला जाऊ शकतो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसेंदिवस आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे. फडणवीस व अजित पवार,या दोघांमध्ये वाढत असलेली जवळीक,दिल्ली दरबारी अजित पवार यांना मिळणारे झुकते माप व आपल्या पक्षाला मिळणारी सावत्रपणाची वागणूक,या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे समांतर आता सरकार चालवू पाहत आहेत.तसेच संघटनात्मक स्तरावरही शिंदे यांनी फडणवीस यांच्यावर गेल्या काही दिवसापासून कुरघोडी करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.कोकणात त्यांच्या पक्षात जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे.भाजपच्या तुलनेत कोकणात त्यांच्या पक्षाचा विस्तार वेगाने होत आहे. कोकणात आपल्या पक्षाचा जनाधार वाढ़वण्यासाठी त्यांनी किरण व उदय सामंत या दोन बंधुसमवेत राजन साळवी…
वसंत भोईर,वाडा टॉमेटोचे विक्रमी उत्पादन,आवक वाढल्याने बाजारात भाव कोसळला,शेतकरी अडचणीत, मोठ्या मेहनतीने पिकवलेला टोमॅटो,भाजीपाला मातीमोल दराने विकायची पाळी आल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. या अशा अस्मानी संकटामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.बाजारात सध्या टोमॅटो दहा रु.किलो दराने विकला जात आहे. शेतकरी भातशेतीसोबत भाजीपाल्यासह फळभाज्यांची लागवड करत असतो.दोन पैसे गाठीला येतील,या आशेने तो आपल्या शेतीत विविध बागायती उत्पन्न घेत असतो. परंतु,बाजारात या उत्पादनांना योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते.सध्या बाजारात टोमॅटोला मातीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी अपार कष्ट करून घेतलेले टोमॅटोचे उत्पादन जनावरांपुढे टाकण्याची वेळ त्याच्यावर ओढवली आहे. काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने…
सुशील भोईर,वसई प्रयागराज महाकुंभ मेळ्यात ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा, बालय़ोगी श्री सदानंद महाराजांच्या कृपाशिर्वादाने संत ज्ञानेश्वर महाराज नगर,सेक्टर ९,लक्ष्मीद्वार येथे प्रयागराज महाकुंभ मेळाव्यात हिंदी ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्याचा शुभारंभ बालयोगींच्या हस्ते झाले.यावेळी व्यासपीठावर वारिंगे महाराज,विलास महाराज भोसले,कबीर महाराज आदि मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून बालयोगींचे सुमारे अडीच हजार भक्तगण आले आहेत.त्यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. १६ ते २३ फेब्रु.दरम्यान चालणाऱ्या या ज्ञानेश्वरी सप्ताह सोहळ्यात बीडचे तुकाराम महाराज शास्त्री,हे रामकथा कथन करणार असुन योगीराज गोसावी पैठण, विश्वनाथ महाराज वारिंगे अंबरनाथ,विजय महाराज जगताप पुणे,जगन्नाथ महाराज पाटील शहापूर यांची किर्तने होणार आहेत,तर सांगता कार्यक्रम कथा प्रवचनकार सर्वश्वरीताई याच्या उपस्थितीत दिपोत्सव…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आउटगोइंगला प्रचंड वेग : आम्हाला काही फरक पडत नाही,उद्धव ठाकरे यांचा हा हट्टीपणा पक्षाला मारक ठरणार, शिवसेनेची ( उबाठा ) मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले चिपळूणचे आ.भास्कर जाधव यांनी पक्षाच्या सद्यस्थितीवर केलेल्या भाष्यामुळे सर्वांच्या भुवया वर गेल्या आहेत.उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खा.विनायक राऊत यांनी ” आ.भास्कर जाधव हे आमचे नेते आहेत,ते जर नाराज असतील तर त्यानी पक्षप्रमुखाशी बोलायला हवे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.आ.भास्कर जाधव हे लढवय्ये नेते म्हणून ओळखले जातात.कोकणात राणे कुटुंबियांशी सरळ दोन हात करण्यात ते कायम आघाडीवर राहीले.पण अनेक संकटप्रसंगी त्यांना पक्षाकडून कधीच मदत मिळाली नाही.यापूर्वी देखील अशाच वागणुकीमुळे सेनेला सोडचिठ्ठी…
दीपक मोहिते, सर्वच्या सर्व ४१ अनधिकृत इमारती जमिनदोस्त ; तेवीसशे कुटुंबाचे संसार रस्त्यावर…. नालासोपारा पूर्व भागातील सर्वच्या सर्व ४१ अनधिकृत इमारती महानगरपालिकेने जमिनदोस्त केल्या.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.मात्र या कारवाईमुळे सुमारे तेवीसशे कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले आहेत.याला जबाबदार कोण ? या प्रश्नाच्या खोलात शिरूनही आपल्याला उत्तर सापडणार नाही.मात्र या प्रकरणामध्ये असलेली मोडस ऑपरेंडी आपण लक्षात घ्यायला हवी. भूमाफिया,अनधिकृत बांधकाम व्यवसायिक,दलाल व अधिकारी,कसे संगनमताने गोरगरीब जनतेची फसवणूक करतात,हे दिसून आले आहे.ज्या जमिनीवर या अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या,ती जमीन शासकीय कामासाठी आरक्षित आहे.कुख्यात भूमाफिया सीताराम गुप्ता ( माजी नगरसेवक ) यांनी त्या जमिनीवर कब्जा करून विविध अनधिकृत बांधकाम व्यवसायिकांना विकल्या.त्यांनी…
जव्हार प्रतिनिधी, संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती उत्साहात साजरी, भारती विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूल,तालुका जव्हार, जिल्हा पालघर येथे संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अर्जुन कुमार राठोड यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमात सहाय्यक शिक्षक योगेश कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात,संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या विचारांची आवश्यकता असल्याचे सांगितले.त्यांनी विद्यार्थ्यांना संत शिरोमणी यांचे विचार आपल्या जीवनात रुजवण्याचे आवाहन केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.राठोड यांनी विद्यार्थ्यांना सत्य,नम्रता आणि स्त्री सन्मान यावर आपले विचार मांडले. ” सत्य हाच खरा धर्म आहे आणि जीवनात नेहमी सत्याचे आचरण करा,”…
वसंत भोईर,वाडा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श शाळा कणेर वसई तालुक्यात प्रथम, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रतियोगिता २०२३-२४ मध्ये जिल्हा परिषद आदर्श शाळा कणेर शाळेला वसई पंचायत समितीचे सभापती अशोक पाटील गटशिक्षणाधिकारी माधुरी पाटोळे व इतर मान्यवरांच्या हस्ते तीन लाख रु.चा धनादेश,सन्मान चिन्ह, व प्रशस्तीपत्रक देऊन वसई तालुक्यात प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शकुंतला पागी,मोहन पाटील,संदीप पाटील,राजेंद्र पाटील, अनुजा गायकवाड,बाळू पारधी,वैभव सोमवंशी,सुजित बागकर,शाळा व्यवस्थापन समितीच्या आशाताई तुंबडा व गुरुनाथ दळवी तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे मान्यवरांनी कौतुक केले. या शाळेने वसई तालुक्यातील पहिली आयएसओ शाळा होण्याचा मान देखील दोन वर्षांपूर्वी पटकावला होता.सर्व मान्यवरांनी…
संजय लांडगे, वाडा वाड्याच्या आत्मा मलिक शाळेला परदेशी पाहुण्यांची सदिच्छा भेट, वाडा तालुक्यातील अंभई येथील आत्मा मालिक शाळा आणि आश्रमास पोलंड, जर्मनी आणि स्वित्झर्लंड येथून आलेल्या परदेशी पाहुण्यांनी भेट दिली.या विशेष भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारतीय शिक्षणपद्धती आणि आश्रमातील अध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला तसेच विद्यार्थ्यांसोबत पारंपरिक आदिवासी नृत्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले.यानंतर त्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत पारंपरिक वेशभूषेत लोकनृत्य,गाणी आणि कला सादर केली. पाहुणेही मोठ्या आनंदाने या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले.विशेष म्हणजे त्यांनी आदिवासी नृत्याची मजा लुटली. या भेटीदरम्यान पाहुण्यांनी शाळेतील विविध उपक्रम, आश्रमाचे शांत आणि सात्त्विक वातावरण,तसेच ध्यानधारणेच्या माध्यमातून आत्मिक शांतीचा…
मनिष म्हात्रे,वसई, केसरीभाऊंचा अनंताचा प्रवास,वृद्धापकाळाने दु:खद निधन, पालघर जिल्ह्यातील सोमवंशी क्षत्रिय समाजाचा मानबिंदू , पर्यटकांचे प्रेम आणि विश्वास यावरच गेली ४० वर्षे ” केसरी, ” ची यशस्वी वाटचाल सुरू असलेल्या ” केसरी, ” टूर्सचे संस्थापक व अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांचे आज पहाटे मुंबई वांद्रे येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.ते केसरी परिवाराचे आधारस्तंभ होते. वयाच्या ५० वर्षी त्यांनी केसरी टूर्सची स्थापना करून खुप कष्टाने जग विख्यात कंपनी म्हणून नावारूपास उदयास आणली.त्यांना पर्यटन क्षेत्रातील विद्यापीठ म्हणून संबोधले जायचे.त्यांनी अनेकांना प्रेमाने मार्गदर्शन करून असंख्य हृदये जिंकली आहेत. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संस्थापक केसरीभाऊ पाटील यांचा जन्म १० एप्रिल १९३५ रोजी मथाणे या…
दीपक मोहिते, वसई विरार मनपा आगामी निवडणूक ; उत्तर भारतीय व गुजराती समाजाचे मतदान ठरणार निर्णायक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा तिढा अद्याप सुटला नसतानाही महायुतीचे प्रमुख घटक असलेले भाजप,शिवसेना ( एकनाथ शिंदे ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) हे पक्ष आता कामाला लागले आहेत.या तिन्ही पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे.दिवसागणिक अन्य पक्षाचे माजी आमदार व पदाधिकारी त्यांच्या पक्षात दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पालघर जिल्ह्यातही या प्रक्रियेला सध्या वेग आला आहे.दोन दिवसांपूर्वी सुमारे चारशे ते पाचशे तरुणांनी नालासोपारा येथे एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.आजपर्यंत वसईकरानी भाजपच्या प्रवेश सोहोळ्याचे अनेक इन्व्हेंट पाहिले,पण शिंदे गटात तरुणांचे इतक्या…
