वसंत भोईर,वाडा
टॉमेटोचे विक्रमी उत्पादन,आवक वाढल्याने बाजारात भाव कोसळला,शेतकरी अडचणीत,
मोठ्या मेहनतीने पिकवलेला टोमॅटो,भाजीपाला मातीमोल दराने विकायची पाळी आल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
या अशा अस्मानी संकटामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.बाजारात सध्या टोमॅटो दहा रु.किलो दराने विकला जात आहे.
शेतकरी भातशेतीसोबत भाजीपाल्यासह फळभाज्यांची लागवड करत असतो.दोन पैसे गाठीला येतील,या आशेने तो आपल्या शेतीत विविध बागायती उत्पन्न घेत असतो. परंतु,बाजारात या उत्पादनांना योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते.सध्या बाजारात टोमॅटोला मातीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी अपार कष्ट करून घेतलेले टोमॅटोचे उत्पादन जनावरांपुढे टाकण्याची वेळ त्याच्यावर ओढवली आहे.
काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने टोमॅटोचा दर ८० ते १०० रु.प्र.कि.पर्यंत दर मिळत होता,पण सध्या भावात प्रचंड घसरण झाली आहे.
चांगले उत्पन्न मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती.चार महिन्यात एकरी ८० हजार रु. खर्च करून त्यानी हे उत्पन्न घेतले,पण भावात झालेल्या घसरणीमुळे त्याचे अवसान पार गळून पडले आहे.सुरुवातीला टोमॅटोला प्र.कि.२० ते ३० रु.भाव मिळाला.परंतु आता दहा रु.दराने कोणी टॉमेटो घ्यायला तयार नाही.भाव पडल्यामुळे तोडणी,वाहतुकीचा खर्चही निघत नाही.
टोमॅटोच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.
बाजारात सध्या टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.त्यावेळी भावात प्रचंड घसरण सुरु झाली आहे.
त्यामुळे जनावरांना चारा म्हणून टोमॅटो देण्याची वेळ आमच्यावर आली आहे.
– मोहन पवार,टोमॅटो उत्पादक शेतकरी

