जव्हार प्रतिनिधी,
संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती उत्साहात साजरी,
भारती विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूल,तालुका जव्हार, जिल्हा पालघर येथे संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अर्जुन कुमार राठोड यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमात सहाय्यक शिक्षक योगेश कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात,संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या विचारांची आवश्यकता असल्याचे सांगितले.त्यांनी विद्यार्थ्यांना संत शिरोमणी यांचे विचार आपल्या जीवनात रुजवण्याचे आवाहन केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.राठोड यांनी विद्यार्थ्यांना सत्य,नम्रता आणि स्त्री सन्मान यावर आपले विचार मांडले. ” सत्य हाच खरा धर्म आहे आणि जीवनात नेहमी सत्याचे आचरण करा,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे नियोजन वैशाली जाधव यांनी केले.सूत्रसंचालन व कार्यक्रम लेखन सहाय्यक शिक्षक योगेश कुलकर्णी यांनी केले, तर सर्वांचे आभार दिपाली महाले यांनी मानले.या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्य, पालक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

