वसंत भोईर,वाडा,
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श शाळा कणेर वसई तालुक्यात प्रथम,
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रतियोगिता २०२३-२४ मध्ये जिल्हा परिषद आदर्श शाळा कणेर शाळेला वसई पंचायत समितीचे सभापती अशोक पाटील गटशिक्षणाधिकारी माधुरी पाटोळे व इतर मान्यवरांच्या हस्ते तीन लाख रु.चा धनादेश,सन्मान चिन्ह, व प्रशस्तीपत्रक देऊन वसई तालुक्यात प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शकुंतला पागी,मोहन पाटील,संदीप पाटील,राजेंद्र पाटील, अनुजा गायकवाड,बाळू पारधी,वैभव सोमवंशी,सुजित बागकर,शाळा व्यवस्थापन समितीच्या आशाताई तुंबडा व गुरुनाथ दळवी तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे मान्यवरांनी कौतुक केले.
या शाळेने वसई तालुक्यातील पहिली आयएसओ शाळा होण्याचा मान देखील दोन वर्षांपूर्वी पटकावला होता.सर्व मान्यवरांनी शाळेला भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

