सुशील भोईर,वसई
प्रयागराज महाकुंभ मेळ्यात ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा,
बालय़ोगी श्री सदानंद महाराजांच्या कृपाशिर्वादाने संत ज्ञानेश्वर महाराज नगर,सेक्टर ९,लक्ष्मीद्वार येथे प्रयागराज महाकुंभ मेळाव्यात हिंदी ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्याचा शुभारंभ बालयोगींच्या हस्ते झाले.यावेळी व्यासपीठावर वारिंगे महाराज,विलास महाराज भोसले,कबीर महाराज आदि मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून बालयोगींचे सुमारे अडीच हजार भक्तगण आले आहेत.त्यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. १६ ते २३ फेब्रु.दरम्यान चालणाऱ्या या ज्ञानेश्वरी सप्ताह सोहळ्यात बीडचे तुकाराम महाराज शास्त्री,हे रामकथा कथन करणार असुन योगीराज गोसावी पैठण, विश्वनाथ महाराज वारिंगे अंबरनाथ,विजय महाराज जगताप पुणे,जगन्नाथ महाराज पाटील शहापूर यांची किर्तने होणार आहेत,तर सांगता कार्यक्रम कथा प्रवचनकार सर्वश्वरीताई याच्या उपस्थितीत दिपोत्सव व तुकाराम महाराज शास्त्री बीड यांच्या कावळ्याच्या किर्तनाचे होणार आहे.या पारायण सप्ताह सोहळ्यास उत्तर प्रदेशचे महंत व राजकीय मान्यवर भेट देणार आहेत.सप्ताह सोहळ्याचे औचित्य साधून येथील नागरिकांसाठी आश्रम संस्थेतर्फे वनौषधी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.प्रयागराज तिर्थक्षेत्रांत येथील नागरिकांमध्ये बालयोगी यांचा हिंदी ज्ञानेश्वरी सप्ताह सोहळा,हे विशेष आकर्षण व चर्चेचा विषय ठरला आहे.

