- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
Author: दीपक मोहिते
शुभम सावंत,विरार बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्या : शिक्षिका आणि प्राचार्याविरुद्ध गुन्हा दाखल, आपली शिक्षण व्यवस्था कायम प्रकाशझोतात असते,परीक्षेचे पेपर फुटणे,परीक्षेत सर्रास कॉपी करणे,उत्तर पत्रिका गहाळ होणे,असले प्रकार आपल्या पाचवीला पुजले आहेत.शिक्षण विभागात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही.शिक्षणाचा सुमार दर्जा,शिक्षकांची अपुरी संख्या,त्यामुळे शाळेची पटसंख्या खालावणे व वेगाने बंद पडणाऱ्या शाळा इ. कारणामुळे आपले शिक्षण विभाग बदनाम झाले आहे. सध्या पालघर जिल्ह्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणाने आपल्या शिक्षण विभागाची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. बारावी वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिका जळल्या प्रकरणी संबंधित शिक्षिका आणि महाविद्यालयाच्या प्राचार्याविरोधात विरारच्या बोळींज पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षिकीने या उत्तरपत्रिका बेकायदेशीरपणे…
वसंत भोईर,वाडा वाड्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर, तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून वाडा तालुका देखरेख संघ,वाडा ग्रुप सेवा सहकारी संस्था,चांबळे सेवा सहकारी संस्था,आंबिस्ते सेवा सहकारी संस्था या चार सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या एप्रिलमध्ये होणार आहेत.या संस्थांची निवडणूक १९एप्रिल रोजी होणार असून १३ ते २० मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्याची करायची आहेत.तर २४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान माघार घेता येणार आहे. वाडा तालुका देखरेख संघ ही वाडा तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांची शिखर संस्था आहे.या संस्थेची इमारत असुन त्यामध्ये व्यापारी गाळे व संस्थेचे प्रशस्त कार्यालय आहे.मात्र तांत्रिक कारणामुळे ही इमारत वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.आगामी पंचवार्षिक निवडणुकीत नव्याने…
जव्हार प्रतिनिधी, अपघातग्रस्त चालकाला आर्थिक मदतीचा हात, समाजामध्ये संकटसमयी एकमेकांना आधार देणे,ही खरी माणुसकीची भावना आहे.याचे जिवंत उदाहरण जय हिंद चालक-मालक संघटनेने नुकतेच घालून दिले. संघटनेच्या एका सदस्याचा अपघात झाल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला आणि आर्थिक सहकार्य करून चालकाच्या कुटुंबाला दिलासा दिला. जव्हार तालुक्यातील तसेच गुजरात सीमेलगत असलेल्या दादरानगर हवेली सीमेलगत असलेल्या रुईघर गावातील जय हिंद चालक-मालक संघटनेचा एक सदस्य आपल्या खाजगी जीपने रात्री घरी परतत असताना दुर्दैवी अपघाताला सामोरा गेला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जीपचा मोठा अपघात झाला.स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत,त्याला सिल्वासा येथील विनोबा भावे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.मात्र, उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च सांगितल्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले.या…
दीपक मोहिते, गेले ते दिवस, रोजगार हमी योजनेचे जनक, वि.स.पागे यांचा आज स्मृतिदिन, काही वर्षांपूर्वी राज्यात दुष्काळ पडला असताना ऐतिहासिक निर्णय घेऊन ग्रामीण भागातील जनतेचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी रोजगार हमी योजना सुरु करणाऱ्या वि.स.पागे यांचा आज स्मृतिदिन आहे.२१ जुलै १९१० रोजी वाळवा तालुक्यातील बागणी येथे त्यांचा जन्म झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण तासगाव येथे झाले.त्यानंतर ते संस्कृत विषय घेऊन बी.ए.झाले,पण तेवढ्यावर न थांबता त्यांनी एल.एल.बी कायद्यांची पदवी घेतली.लहानपणापासूनच ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते.वाळवा हा तालुका क्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळखला जातो.१९३० ची कायदेभंगाची चळवळ तसेच १९४२ चे भारत छोडो आंदोलनामध्ये ते सक्रिय होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.स्वातंत्र्यानंतर वर्ष १९५२ ते १९६० या कालावधीत ते…
वसंत भोईर,वाडा वाड्यात आदिवासी विद्यार्थ्यांना पुरणपोळ्यांचे वाटप वाडा शहरातील गंधे कुटुंबीय दरवर्षी होळी सणानिमित्त शहरांमध्ये असलेल्या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पुरणपोळ्यांचे वाटप करून या विद्यार्थ्यांसोबत होळी उत्सव साजरा करत असतात. यावर्षीही या कुटुंबियांतर्फे त्यांनी हा उपक्रम राबवण्यात आला.गंधे कुटुंबाकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वैभव गंधे,नितीन गंधे हे सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असतात.वाडा शहरात हे एक नामवंत कुटुंब आहे.होळी सणानिमित्त या कुटुंबीयांकडून दरवर्षी पुरणपोळ्यांच्या वाटप होत असते.त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनातील गोडवा वाढला असून या कुटुंबीयांबद्दल आपुलकीची भावना दूढ झाली आहे.
दिपक मोहिते, बॉटमलाईन, शेवटचा स्तंभही आता कोसळण्याच्या तयारीत… भारतातील प्रगल्भ लोकशाही व्यवस्थेचे चार आधारस्तंभ म्हणून कायदेमंडळ,कार्यकारी मंडळ,न्यायपालिका व प्रसिद्ध माध्यमे ओळखली जातात.जी आपल्या व्यवस्थेची तत्वे व प्रत्येक संस्थेची पाया मजबूत करत असतात.लोकशाहीची ताकद,प्रत्येक स्तंभाच्या ताकदीवर व ते एकमेकांना कसे पूरक आहेत,यावर अवलंबून असते.त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळाच्या ७८ वर्षापैकी सुमारे ६६ वर्षे हे चारही स्तंभ व्यवस्थित आपल्या पायावर उभे होते. सन २०१४ नंतरच्या १२ वर्षाच्या काळात चारही स्तंभ हळूहळू निखळू लागले आहेत.कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व प्रसिद्धी माध्यमे ही तर केंव्हाच कोसळली आहेत,न्यायपालिका हा एकमेव स्तंभ टिकून होता. किमान या स्तंभाच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळू शकतो,असा भारतीय जनतेचा ठाम विश्वास होता,आता त्या विश्वासाला…
दीपक मोहिते, बीड : तोडक कारवाई माणुसकीला काळिमा फासणारी, गुंड खोक्याला जेरबंद केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत निर्दयीपणे आपल्या वनजमिनीवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर व तसेच पारधी समाजाच्या झोपड्यावर कारवाई केली.खोक्याने उभारलेला काचेचा बंगला बुलडोझर लावून जमिनदोस्त करण्यात आला.वनविभागाच्या अधिकाऱ्यांची ही कारवाई किती न्यायाला धरून होती ? हा प्रश्न वादाचा मुद्दा असला तरी या कारवाईच्या आडून पारधी समाजाच्या झोपड्या पाडणे,हे नक्कीच अन्यायकारक आहे. गुंड खोक्या प्रकरणी आपला विभाग अडचणीत येऊ नये,यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत घिसाडघाईने ही कारवाई केली आहे.खोक्याने वनजमिनीवर आलिशान काचेचा बंगला बांधत असताना या विभागाचे अधिकारी डोळ्यावर कातडे ओढून बसले होते का ? खोक्याने या अधिकाऱ्यांना मॅनेज करूनच हा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” फडणवीस यांच्या घोषणा वेळ मारून नेण्यासाठी असतात… ” बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कोणत्याही परिस्थितीत मोडून काढू,मग तो आका असो की खोक्या,प्रत्येकाला ठोकणारच,” अशी सिंहगर्जना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल प्रसिद्धी माध्यमांसमोर केली.पण त्यांच्या या गर्जनेला राज्याच्या रयतेने फारसे गांभीर्याने घेतले नाही.कारण फडणवीस यांना अधुनमधून अशा उचक्या लागत असतात व ते शब्दच्छल करत प्रचंड उत्साह व आवेशात बरंच काही बोलून जातात.त्यामुळे त्यांच्या या बोलण्याकडे लोकही फारसे लक्ष देत नाहीत.असो,आज आपण एका ज्वलंत विषयावर बोलणार आहोत.आपले देवाभाऊ गेल्या बारा वर्षात बरंच काही बोलले,” यंव करू,तंव करू,” पण सत्तेच्या हव्यासापोटी प्रत्यक्षात त्यांनी कधीच काही केले नाही,अशाच एका ज्वलंत विषयावर…
दीपक मोहिते, पालघर जिल्ह्यात कुणबी सेना व समविचारी संघटना जनआंदोलन उभारणार.. पालघर जिल्ह्यातील विविध प्रश्न,समस्या,प्रलंबित विकासाचे प्रश्न,भ्रष्टाचार व भूमिपुत्रांना विस्थापित करण्याचे राज्य व केंद्र सरकारचे दिशाहीन धोरण,याविरोधात कुणबी सेना,आदिवासी एकता परिषद व समविचारी संघटना एकत्र येऊन जिल्ह्यात जनआंदोलन उभारणार असल्याची घोषणा कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी पालघर येथे केली.ते पालघर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पालघर पूर्व भागातील ठाकूर सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील होणाऱ्या जनआंदोलना संदर्भात माहिती देताना म्हणाले,नव्याने जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर आम्हा जिल्हावासीयांना विविध प्रश्नी दिलासा मिळेल,आमचे दैनंदिन जीवनातील प्रश्न सुटतील,असे वाटले होते,पण आमचा भ्रमनिरास झाला.पण शासनाच्या या निर्णयाचा…
दीपक मोहिते, अर्थकारणाचा समृद्ध मार्ग, डहाणू व मालवण समुद्रात तेलाचे प्रचंड साठे,भारत तेलसंपन्न राष्ट्र होण्याच्या मार्गांवर, दोन दिवसांपूर्वी डहाणू व मालवण समुद्रात प्रचंड तेलसाठे सापडले.या तेलसाठ्यामुळे या दोन्ही जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.लवकरच तेलकंपन्या या भागात तेलसंशोधन व उत्खनन करण्यासाठी दाखल होणार आहेत.डहाणू येथे ५ हजार ३३८ तर मालवण समुद्रात सुमारे १९ हजार ३३१ चौ.की.मी.परिसरात हे तेलसाठे असल्याचे सांगण्यात आले आहे. कोकण विभागाच्या समुद्रात प्रचंड तेलसाठे असल्याची माहिती मिळाल्यानंतर येथे वेगाने संशोधन कार्य सुरु करण्यात आले होते. नव्याने सापडलेल्या तेलसाठ्यामुळे भारताचे तेल उत्पादन चारपटीने वाढणार आहे.या तेलसाठ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी येणार आहे.दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने या दोन्ही भागात संशोधन…
