दीपक मोहिते,
अर्थकारणाचा समृद्ध मार्ग,
डहाणू व मालवण समुद्रात तेलाचे प्रचंड साठे,भारत तेलसंपन्न राष्ट्र होण्याच्या मार्गांवर,
दोन दिवसांपूर्वी डहाणू व मालवण समुद्रात प्रचंड तेलसाठे सापडले.या तेलसाठ्यामुळे या दोन्ही जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.लवकरच तेलकंपन्या या भागात तेलसंशोधन व उत्खनन करण्यासाठी दाखल होणार आहेत.डहाणू येथे ५ हजार ३३८ तर मालवण समुद्रात सुमारे १९ हजार ३३१ चौ.की.मी.परिसरात हे तेलसाठे असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोकण विभागाच्या समुद्रात प्रचंड तेलसाठे असल्याची माहिती मिळाल्यानंतर येथे वेगाने संशोधन कार्य सुरु करण्यात आले होते. नव्याने सापडलेल्या तेलसाठ्यामुळे भारताचे तेल उत्पादन चारपटीने वाढणार आहे.या तेलसाठ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी येणार आहे.दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने या दोन्ही भागात संशोधन व उत्खनन कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.२०१७ साली सापडलेल्या तेलसाठ्यांच्या तुलनेत हे तेलसाठे अनेक पटीने अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.यापूर्वी ” बॉम्बे हाय,” येथे हे तेलसाठे सापडले होते.त्यासाठी अमृत व मुंगा,या दोन विहिरी खोदण्यात आल्या होत्या.येथे आजही खोदकाम सुरूच आहे.नव्याने सापडलेल्या तेलसाठ्यामुळे पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल,तसेच मोठ्याप्रमाणात रोजगारनिर्मिती होईल,असे केंद्रीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

