वसंत भोईर,वाडा
वाड्यात आदिवासी विद्यार्थ्यांना पुरणपोळ्यांचे वाटप
वाडा शहरातील गंधे कुटुंबीय दरवर्षी होळी सणानिमित्त शहरांमध्ये असलेल्या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पुरणपोळ्यांचे वाटप करून या विद्यार्थ्यांसोबत होळी उत्सव साजरा करत असतात.
यावर्षीही या कुटुंबियांतर्फे त्यांनी हा उपक्रम राबवण्यात आला.गंधे कुटुंबाकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वैभव गंधे,नितीन गंधे हे सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असतात.वाडा शहरात हे एक नामवंत कुटुंब आहे.होळी सणानिमित्त या कुटुंबीयांकडून दरवर्षी पुरणपोळ्यांच्या वाटप होत असते.त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनातील गोडवा वाढला असून या कुटुंबीयांबद्दल आपुलकीची भावना दूढ झाली आहे.

