- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा शंभर रु.त क्विंटलभर गहू स्वच्छ ; थेट दळायला न्यायचं! रब्बी हंगामात गहू काढण्यासाठी शेतकरी आता हार्वेस्टरचा वापर करू लागले आहेत.मजुरावर अवलंबून राहणे,कमी होऊन काढणी प्रक्रिया जलद होऊ लागली आहे.पूर्वी गव्हाची काढणी मजुरांच्या मदतीने करण्यात येत असे.पण आता हार्वेस्टरमुळे ही प्रक्रिया सोपी झाली आहे. गहू फिल्टर करणाऱ्या यंत्रणेचा वापर केला,तर गहू काढणीनंतर गव्हात असणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण ९९ टक्के कमी होते.गहू चांगल्या प्रकारे स्वच्छ होतो. गहू स्वच्छ झाल्यानंतर थेट दळायला नेता येतो. गहू फिल्टर करण्यासाठीचा दर एका पोत्यामध्ये १२० रु.आहे.हार्वेस्टरच्या वापरामुळे गहू पिकाची काढणी कमी खर्चात आणि कमी वेळेत अधिक करता येते. साधारणपणे अर्ध्या तासात एका क्षेत्रातील गहू पिकाची काढणी…
डाकिवली- केळठण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा शिवसेनेचा आरोप, तालुक्यात वर्दळीचा डाकिवली- केळठण या रस्त्याचे काम सुरू असून या कामात नियमानुसार साहित्य वापरले जात नाही. त्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप शिवसेना ( शिंदे गटाचे ) उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी केला आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या बोगस ठेकेदार व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा,अशी मागणी एका निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. डाकीवली-केळठण हा १२ कि.मी.लांबीचा रस्ता असून त्यासाठी भिवंडी ग्रामीणचे आ.शांताराम मोरे यांच्या फंडातून साडेचार कोटीचा निधी मंजूर झाला असून हे काम ओवी कंट्रक्शन या ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे.परंतु ठेकेदार एजन्सीने या…
नाशिक प्रतिनिधी, नाशिक येथे गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आंदोलन, दोन वर्षानंतर येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणमुक्त करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सचिव दिनकर पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी नाशिकच्या कुंभमेळा स्थळी रामकुंडामध्ये बुडी मारून नाशिक महानगरपालिकेचा निषेध करीत आंदोलन केले. त्र्यंबकेश्वरपासून नाशिकपर्यंत वाहणाऱ्या गोदावरी नदीमध्ये अनेक ठिकाणी प्रदूषण,सांडपाणी व पानवेली यासारखे प्रश्न गंभीर असून गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याबाबत न्यायालयाने आदेश देऊन आणि पर्यावरणवादी संस्थांनी आंदोलन इशारे देऊन देखील नाशिक महानगरपालिका गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याबाबत अपयशी ठरत असल्याने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. आज पदाधिकाऱ्यांनी रामकुंडात गोदावरी नदीमध्ये उड्या मारून महानगरपालिकेच्या आणि प्रशासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. गोदावरीला आता पानवेलीचा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” बेफाम झालेल्या पोलीस यंत्रणेला सरकारने वेळीच रोखावे,पोलीस यंत्रणेत सुधारणा करावी, गेल्या काही वर्षात आपल्या पोलीस यंत्रणेची प्रकृती प्रचंड ढासळली असून या व्यवस्थेत अक्षरशः बजबजपुरी निर्माण झाली आहे.त्यामुळे लोकांचा या यंत्रणेवरून विश्वास उडत चालला आहे.पोलीस आपल्या पदाचा धाक गुन्हेगारांऐवजी सामान्य नागरिकाना दाखवण्यात धन्यता मानत आहेत.तसेच आचारसंहितेचे उल्लंघन करत त्यांच्याकडून होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सतत वाढत आहेत.अशात पोलीस व राजकारणी,अशी साखळी निर्माण झाल्यामुळे समाजात या दोघांविषयी प्रचंड चीड व संताप व्यक्त करण्यात येत आहे. देश व राज्यात पोलीस अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे पोलीस यंत्रणा व रचनेमध्ये सुधारणा ( रिफॉर्मस ) करण्याची आवश्यकता आहे.सचिन वाझे,प्रदीप शर्मा अशा अनेक…
सुरेश वैद्य,पालघर सायबर गुन्हा : ८ आरोपींना अटक,२२ लाखांची रक्कम पोलिसांनी गोठवली, पालघर जिल्ह्यात सुमारे साडेतीन कोटी रु. फसवणूकीचे प्रकरण उघडकीस आले आहे.बोईसर पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाणे,पालघर यांनी केलेल्या संयुक्त कारवाईमुळे हा डिजिटल फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकाणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असुन, त्यांची २२, लाखाची रक्कम पोलिसांनी गोठवली आहे. हे प्रकरण एका ज्येष्ठ नागरिकाला ” डिजिटल अटक,” चा बनाव करून तब्बल ३.५६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या घटनेनंतर उघडकीस आला आहे. चार महिन्यापूर्वी अंधेरी पोलीस ठाण्यातून बोलतो असे भासवणाऱ्या व्यक्तींनी फिर्यादी अनिलकुमार विष्णु आरेकर यांच्याशी संपर्क साधला.त्यांना तुमचा नंबर ” इललिगल अॅडव्हरटायझिंग, ” प्रकरणात सापडल्याचे सांगितले.सीबीआय…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” सरकारच्या निष्क्रियतेमुळे वैद्यकीय क्षेत्राला बाजारू स्वरूप आलंय, एकेकाळी वैद्यकीय क्षेत्राला लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण होते.पण हल्ली हे क्षेत्र पुरते बदनाम होत चालले आहे.या क्षेत्रात अपप्रवृत्ती डोके वर काढू लागल्या आहेत. लोकांचा ” डॉक्टर,” या शब्दावरून विश्वास उडत चालला आहे.या क्षेत्राला आता बाजारू स्वरूप आले आहे. डॉक्टरांनी पैसा जरूर कमवला पाहिजे,पण तो लु्टीचा असता कामा नये. पूर्वी डॉक्टराना समाजात मान होता,तो आता पाहायला मिळत नाही. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका गरोदर महिलेने अनामत रक्कम न भरल्याने तीला उपचार नाकारण्यात आला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. तनिषा भिसे,असे या महिलेचे नांव आहे.या घटनेनंतर अनेक राजकीय पक्षांनी,संघटनांनी आंदोलने केली.प्रकरण…
शुभम सावंत,विरार पावसाळापूर्व कामे : बविआ शिष्टमंडळाची मनपा प्रशासनासमवेत चर्चा, बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या विकासकामासंदर्भात चर्चा केली.या शिष्टमंडळत माजी नगरसेवक व संघटक सचिव आजीव पाटील,मार्शल लोपीस,सखाराम महाडिक,हार्दिक राऊत व कार्यकर्त्याचा समावेश होता. वसई विरार शहर महानगर पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार व शहर अभियंता पाचंगे,नगररचनाचे वाय.एस. रेड्डी,यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ग्रामीण आणि शहरी भागातील विविध विकासकामावर चर्चा झाली.महानगसपालिका हद्दीतील मधील नाले साफ करणे,बोळींज ते चिखलडोंगरी दरम्यान असलेला नाला रुंद करणे व उघाडी बांधणे,लाल खाडी जवळ असलेली उघाडी रुंद करणे,आणि ठाणे शहराचे सांडपाणी जे आपल्या हद्दीत येते,ते रोखण्यासाठी…
नाशिक प्रतिनिधी हंडा मोर्चा आंदोलनानंतर आठ पाड्यांवर टॅंकरने पाणीपुरवठा सुरू, नाशिक जिल्ह्यातील धार्मिक स्थळ आणि पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पावसाळ्यात निसर्गाच्या वरदानाने बहरणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जनता सध्या पाणीटंचाईने हैराण झाली आहे.आदिवासी वस्ती असलेल्या त्र्यंबक तालुक्यातील वाड्या व पाड्यावरील आदिवासींना हंडाभर पाण्यासाठी प्रचंड पायीपीट करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनही पाणीपुरवठा जलजीवन मिशन योजना कार्यान्वित होण्यास विलंब तसेच या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्यामुळे वाड्या व पाड्यांवर तातडीने टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा,या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटना आदिवासी भागात आंदोलन करीत आहे. काल त्र्यंबक तालुक्यातील पाणीप्रश्नाबाबत त्र्यंबक पंचायत समितीवर आदिवासी महिलांनी हंडा मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले आणि पंचायत समिती…
संजय लांडगे,वाडा आबिटघर परिसर पांघरणार हिरवाईचा शालू, ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी संतोष साठे यांच्या नेतृत्वाखाली अबिटघर ग्रामपंचायत नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विविध समाजोपयोगी संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करत असते.याचाच एक भाग म्हणून मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या मासिक सभेत आबिटघर गावाचा परिसर हिरवागार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव यांनी गाव आणि परिसरात ढासळणाऱ्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी परिसरातील शेकडो एकर जंगलात झाडांची लागवड करून त्याचे संगोपन करावे.तसेच हा प्रकल्प राबवताना ग्रामपंचायत हद्दीतील उद्योजकांचे सहकार्य घेऊन त्यांचा सीएसआर फंड व गरजेनुसार ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीचा उपयोग करावा असा ठराव मांडला.त्यास सदस्य कुलदीप पाटील यांनी अनुमोदन दिले तर सरपंच साक्षी संतोष साठे, उपसरपंच सुप्रिया…
संजय नेवे,विक्रमगड खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील घोडीचा पाडा येथे पाणीटंचाईला सुरुवात, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असुन ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यावरील विहिरीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.अशा परिस्थितीमध्ये सर्वत्र पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील घोडीचापाडा येथील अनेक विहिरींनी तळ गाठले असून या भागातील लोकांची पाण्यासाठी पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. ग्रामपंचायतीने पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. तापमान वाढल्यामुळे पाण्याची पातळी सतत कमी होत चालली आहे. तालुक्यातील काही गावपाड्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.त्यासाठी तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा तयार करणे, आवश्यक असून पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी लोकप्रतिनिधी केली आहे.
