सुरेश वैद्य,पालघर
सायबर गुन्हा : ८ आरोपींना अटक,२२ लाखांची रक्कम पोलिसांनी गोठवली,
पालघर जिल्ह्यात सुमारे साडेतीन कोटी रु. फसवणूकीचे प्रकरण उघडकीस आले आहे.बोईसर पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाणे,पालघर यांनी केलेल्या संयुक्त कारवाईमुळे हा डिजिटल फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकाणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असुन, त्यांची २२, लाखाची रक्कम पोलिसांनी गोठवली आहे.
हे प्रकरण एका ज्येष्ठ नागरिकाला ” डिजिटल अटक,” चा बनाव करून तब्बल ३.५६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या घटनेनंतर उघडकीस आला आहे.
चार महिन्यापूर्वी अंधेरी पोलीस ठाण्यातून बोलतो असे भासवणाऱ्या व्यक्तींनी फिर्यादी अनिलकुमार विष्णु आरेकर यांच्याशी संपर्क साधला.त्यांना तुमचा नंबर ” इललिगल अॅडव्हरटायझिंग, ” प्रकरणात सापडल्याचे सांगितले.सीबीआय तपास सुरू असून पोलीस कस्टडीत घेण्याची धमकी देत गोपनीयतेचा बडगा दाखवण्यात आला.त्यानंतर ” सीबीआय पब्लिक प्रोसिक्युटर, ” असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या खात्यातील रक्कम तपासासाठी पाठवण्यास भाग पाडले.विश्वास संपादन करून त्यांनी ३ कोटी ५६ लाख ६० हजार रु.वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतले.याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नागपूर,गुजरात व बिहार येथून
मो.सैफ रिजवान अन्सारी,
मो.फैज रिजवान अन्सारी,
मो.झोएब रिजवान अन्सारी,
गुणवंत रामराव मते,
झकरीया असरार झोया,
शोएब मोहम्मद शहा,
रिझवान साबीर मलिक,
बाबर सिराज खान, या आरोपीना अटक केली आहे.
तपासात आंतरराष्ट्रीय लिंक असल्याचा संशय निर्माण झाला असून तपास अजून सुरू आहे.आरोपी क्र. १ ते ७ यांना ११ एप्रिल रोजी पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून आरोपी क्र.८ याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
तपासाची धुरा पोलीस निरीक्षक शिरीष पवार (बोईसर पोलीस ठाणे) व अजय गोरड (सायबर पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखालील पथक सांभाळत आहे.
या कारवाईमुळे डिजिटल फसवणुकीच्या बाबतीत नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहावे,असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

