शुभम सावंत,विरार
पावसाळापूर्व कामे : बविआ शिष्टमंडळाची मनपा प्रशासनासमवेत चर्चा,
-
बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या विकासकामासंदर्भात चर्चा केली.या शिष्टमंडळत माजी नगरसेवक व संघटक सचिव आजीव पाटील,मार्शल लोपीस,सखाराम महाडिक,हार्दिक राऊत व कार्यकर्त्याचा समावेश होता.
वसई विरार शहर महानगर पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार व शहर अभियंता पाचंगे,नगररचनाचे वाय.एस. रेड्डी,यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ग्रामीण आणि शहरी भागातील विविध विकासकामावर चर्चा झाली.महानगसपालिका हद्दीतील मधील नाले साफ करणे,बोळींज ते चिखलडोंगरी दरम्यान असलेला नाला रुंद करणे व उघाडी बांधणे,लाल खाडी जवळ असलेली उघाडी रुंद करणे,आणि ठाणे शहराचे सांडपाणी जे आपल्या हद्दीत येते,ते रोखण्यासाठी ठाणे मनपा प्रशासनाशी चर्चा करणे,गास गावात जे पाणी साचते,त्याचा निचरा होण्यासाठी पर्यायी मार्ग काढणे,पावसाळ्या अगोदर धोकादायक झाडे कापणे,धोकादायक इमारतीचे ऑडिट करून त्यावर योग्य ती उपाय योजना करणे.तसेच विविध भागातील जी विकासकामे प्रलंबित आहेत त्यामध्ये रस्ते, नाला,पथदिवे,गटार साफसफाई,इ.कामे पावसाळ्या अगोदर तातडीने पूर्ण करणे,इ.विषयावर चर्चा झाली.या चर्चेनंतर आयुक्त व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी सर्व कामे लवकरात लवकर करू,असे, शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

