- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा तुम्ही घेताय तो आवळा गावरान की संकरित? आंबट,तुरट व कडवट अशा चवीनी युक्त असणारा बहुगुणी आवळा बाजारात दाखल झाला आहे.या फळाचे सेवन सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष मोठ्या चवीने करू शकतात.औषध म्हणून आवळ्याचा उपयोग होतो. त्यामुळे सर्वजण आवळा खरेदी करायला प्राधान्य देत आहेत.मागणी वाढल्याने बाजारात गावरान अन् संकरित आवळा सुद्धा बाजारात दाखल झाला आहे. बाजारपेठेत आवला विक्रीला उपलब्ध झाला असून साठ रु. प्रति किलो दराने विक्रीला उपलब्ध आहे. आवळ्याचे लोणचे,कॅंडी,मुरंबा अनेकांना आवडत असतो.त्यामुळे अनेक गृहिणी हिवाळ्यात आवळ्याचे लोणचे तयार करतात. हायब्रीड आवळा आकाराने मोठा असतो. त्यामुळे यापासून इतर उत्पादित वस्तू करणे,सोयीचे होते.गावरान आवळा आकाराने छोटा असतो.त्यात गर कमी असतो रस…
जव्हार प्रतिनिधी, वाचनाचे अनेक फायदे असुन युवकांनो वाचक व्हा – नितीन आहेर, वाचनाचे अनेक फायदे असून युवकांनी वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे,असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक नितीन आहेर यांनी केले.ते गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आयोजित ” महाराष्ट्राचा वाचन संकल्प, ” या उपक्रमांतर्गत व्याख्यानमालेत बोलत होते. नितीन आहेर हे जिल्हा परिषद शाळा नवीवाडी येथील प्राथमिक शिक्षक असून पालघर जिल्ह्यात उत्तम वक्ते व प्रसिद्ध सूत्रसंचालक म्हणून ओळखले जातात.आपल्या भाषणात त्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की,वाचनामुळे ज्ञान, शब्दसंग्रह,सकारात्मकता, विचारशक्ती,सर्जनशीलता, कल्पनाशक्ती,एकाग्रता आणि संयम वाढतो.तसेच,वाचनाने आत्मविश्वास आणि हजरजबाबीपणाही वृद्धिंगत होतो. आहेर यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,अब्राहम लिंकन, स्वामी विवेकानंद आणि आईन्स्टाईन…
वसंत भोईर,वाडा, आदिवासी विकास महामंडळाच्या भातावर उंदीर घुशींचा डल्ला,साडेचार हजार क्विंटल भात वाया तालुक्यात आदिवासी विकास महामंडळातर्फे आधारभूत भात खरेदी केंद्राद्वारे शेतकऱ्यांचे भात खरेदी करण्यात येते.दरवर्षी काही ना काही कारणाने ही खरेदी वादात सापडत असते. या विभागाचे अधिकारी मात्र उपाययोजना करण्याऐवजी जव्हार,मोखाडा येथील कार्यालयात बसून उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम असतात.त्यांच्या या गलथान कारभारामुळे बळीराजा मात्र पार मेटाकुटीला आला आहे.अनेक हेलपाटे मारून ही ऑनलाइन नंबर येत नसल्याने व जानेवारी अर्धा संपत आला तरी शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी विक्री होऊ शकली नाही.ते भात देण्यासाठी तिष्ठत उभे असल्याचे पाहायला मिळत आहेत.तर दुसरीकडे मात्र गोदामे जुन्या भातानेच भरलेली आहेत.त्यामधील धान्यावर उंदीर – घुशी डल्ला मारत…
संदीप जाधव,बोईसर सरपंचांवर हल्ला : निषेधार्थ मनोर बाजारपेठ बंद, मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयात धक्काबुक्की आणि मारहाणीचा प्रकार घडल्याने मनोर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ मनोर बाजारपेठ पूर्णतः बंद करण्यात आली असून,अनुचित प्रकार घडू नये,यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ग्रामपंचायत हद्दीत एका इमारतीत बिअर शॉप सुरू करण्यासाठी ग्रामसभेने दिलेल्या ना हरकत ठरावावरून हा वाद उफाळला.ग्रामपंचायतीने राठोड नावाच्या व्यक्तीला हा ठराव दिल्यामुळे अल्वी अल्ताफ रईस हा आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात आला व त्याने ” ठराव दिलाच कसा ? ” असा जाब विचारत ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील यांच्याशी वाद…
संजय नेवे,विक्रमगड, गरोदर महिला व स्तनदा माता यांना बाळंतविडा कीटचे वाटप, जन्माला येणारे बालक सुदृढ असावे,यासाठी आज महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद पालघर,अंतर्गत येणाऱ्या विक्रमगड तालुक्यातील गरोदर महिला व स्तनदा मातांना बाळंत विडा किट वाटप करण्यात आले. सदर वाटप हे सुभाष भोये सदस्य व मंगू गढरी गटविकास अधिकारी पंचायत समिती विक्रमगड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्ण कामडी उपस्थित होत्या.मातांना बाळंत विड्याचं साहित्य देऊन त्याचे सर्व पदार्थ एकत्र करून लाडू बनवण्यास सांगण्यात आले. दररोज एक लाडू खाण्याबाबत अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.सदर आहाराचा समावेश का करण्यात आला आहे,याविषयी माहिती देण्यात आली.या आहारामध्ये स्तनदा मातेच्या पोषणासाठी असणाऱ्या…
सचिन परब,पालघर, शिवसेन नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पालघर मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर जिल्हाप्रमुख समीर मोरे,जिल्हा सचिव दिनेश गवई यासह मनसेच्या पालघर तालुक्यातील तालुकास्तरीय पदाधिकारी विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सदर प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसेचे उपशहर प्रमुख सुनील पाटील,विळंगी गावचे उपसरपंच,मनसेचे उपतालुका प्रमुख चेतन पाटील,मनसेचे उपतालुका प्रमुख महाराष्ट्र कामगार सेनेचे पालघर चिटणीस सिद्धेश महाले, विभाग प्रमुख नांदगाव गावचे ग्रामपंचायत सदस्य मनीष पाटील,आलेवाडी गावचे उपसरपंच सतीश ठाकूर,उप तालुकाप्रमुख रोहिदास भगत, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष उदय अधिकारी,महाराष्ट्र नवनिर्माण…
दीपक मोहिते, मंथन, अजून वेळ गेलेली नाही,… आज एक अत्यंत महत्वाचा तसेच वसई – विरारकरांसाठी ज्वलंत असलेला विषय,मी या ब्लॉगमध्ये हाताळणार आहे.विषय तसा संवेदनशील आहेच,पण तो वसईच्या नागरिकांसाठी देखील जिव्हाळ्याचा असा आहे.त्यामुळे मलाही या विषयावर लिहिताना खूप विचार करून लिहावा लागत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार उपप्रदेशात ज्या काही राजकीय उलथापालथी झाल्या,त्या नक्कीच सगळ्यासाठी वेदनादायक ठरल्या.गेली तीस ते पस्तीस वर्षे बहुजन विकास आघाडीच्या अबाधित असलेल्या साम्राज्याला सुरुंग लागला.गेल्या पस्तीस वर्षात बलाढ्य भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेला आ.हितेंद्र ठाकूर यांचा गड भेदता आला नाही.डॉमनिक गोंसालवीस,दीपक गव्हाणकर,मनवेल तुस्कानो,विवेक पंडित,प्रदीप शर्मा,यांना जे शक्य झाले नाही,ते राजकारणात नवख्या असलेल्या स्नेहा दुबे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” फोडाफोडीच्या राजकारणाला पुन्हा ऊत येणार… राष्ट्रीय स्तरावरील विरोधकांची इंडिया आघाडी व महाराष्ट्रात महाविकास आघाडी,या दोघांचे भवितव्य आता जवळपास अंधारात सापडले आहे.महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर भाजपने ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद हिरावून घेतले,ते लक्षात घेता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सावध झाले आहेत. कारण बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत.ही निवडणूक नितीशकुमार हे भाजप सोबत लढतील,असे वाटत नाही.नितीश कुमार यांनी जर एनडीए पासून फारकत घेतली तर केंद्र सरकारकडे काठावरचे बहुमत राहील.त्यामुळे भाजप आता शरद पवार गटाचे खासदार गळाला लावण्याच्या प्रयत्नात आहे.दुसरीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे देखील भाजपने लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आखलेल्या रणनितीमुळे सध्या अस्वस्थ…
वसंत भोईर,वाडा, वाडा – वडवली हद्दीतील टायर कंपन्या उठल्या शेतकऱ्यांच्या मुळावर, तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील मुसारणे पाडा व चिंचघरपाडा येथील टायर कंपन्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत. त्यांच्या मातीभरावाने येथील शेतकऱ्यांची भातशेती पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहॆ.त्यामुळे परिसरातील शेतजमिनी नापीक होणार आहेत.येथील शेतकरी आता देशोधडीला लागणार आहेत. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिवाय या कंपन्यानी येथील नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून पाण्याचा मार्ग बदलला आहे व नालाही अरुंद केल्याने नाल्याच्या पाण्याचा निचरा होणार नाही.त्यामुळे शेतजमिनीची नासाडी होणार होईल,असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहॆ.या नाल्यात रसायन मिश्रित दूषित पाणी सोडले जात असल्यामुळे नागरिकांसह गुराढोरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.या कंपन्या इतरत्र…
दीपक मोहिते, लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नातून लवकरच वसई – विरारचा पाणीपुरवठा सुधारणार, वसई विरार शहरातील पाणी वितरण व्यवस्था आता लवकर सुधारणार असून शहरांसोबतच महापालिकेत समाविष्ट गावांनाही पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.अमृत २.o अभियानांतर्गत शहरातील जल वितरण व्यवस्था बळकट आणि विस्तारित करण्यासाठी पालिका क्षेत्रात ९५ कि.मी. मुख्य जलवाहिन्या,४८७ किमी वितरण जलवाहिन्या आणि १० जलकुंभ उभारले जाणार आहेत.यासाठी प्रत्यक्ष कामाला डिसें. २०२४ पासून जलवाहिन्या अंथरण्याचे काम ठेकेदारांतर्फे सुरु करण्यात आले आहे. लोकनेते हितेंद्र ठाकूर,माजी आ.क्षितिज ठाकूर आणि माजी आ.राजेश पाटील यांनी वसई विरारचा पाणीवितरण व्यवस्था सुधारण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यांच्या पाठपुराव्याला यश येत शासनाकडून अमृत २.o पाणीपुरवठा योजना मंजूर करून शासनाने…
