सचिन परब,पालघर,
शिवसेन नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पालघर मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर जिल्हाप्रमुख समीर मोरे,जिल्हा सचिव दिनेश गवई यासह मनसेच्या पालघर तालुक्यातील तालुकास्तरीय पदाधिकारी विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
सदर प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसेचे उपशहर प्रमुख सुनील पाटील,विळंगी गावचे उपसरपंच,मनसेचे उपतालुका प्रमुख चेतन पाटील,मनसेचे उपतालुका प्रमुख महाराष्ट्र कामगार सेनेचे पालघर चिटणीस सिद्धेश महाले, विभाग प्रमुख नांदगाव गावचे ग्रामपंचायत सदस्य मनीष पाटील,आलेवाडी गावचे उपसरपंच सतीश ठाकूर,उप तालुकाप्रमुख रोहिदास भगत, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष उदय अधिकारी,महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष हमेश पाटील,विनय आघाव, विळंगी गावच्या सरपंच सुमिता घरत,ग्रामपंचायत सदस्य प्रियांका घरत,देविका पाटील,सरावली विभाग प्रमुख जितेंद्र महामंत,रोजगार स्वयंरोजगार तालुका अध्यक्ष मंदार तांडेल,नांदगाव शाखाप्रमुख मयुरेश पाटील, टेंभी शाखाप्रमुख कैलास पाटील,कोंढाण विभाग प्रमुख चेतन पाटील,मंदार अधिकारी शाखाप्रमुख साईनाथ रावते, विभाग अध्यक्ष नितेश तरे, शैलेश पडोसा,उपतालुका प्रमुख रामदास पाटील,सुरेश बटवा प्रतीक चिपाट,मायकोप ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र किणी,सदाशिव पाटील,प्रणय पाटील,कलाकार भोईर,बहुजन विकास आघाडीचे श्रीकांत पाटील, प्रतीक भोईर,प्रसाद घरत,हर्षद घरत,उदय भोईर यांनीही प्रवेश केला असून या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये याचा खूप मोठा फायदा हा शिवसेनेला होईल,यात शंका नाही. याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकरिता व शिवसेना संघटनात्मक वाढीकरिता जोमाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले.
मनसे पदाधिकाऱ्यांच्या आजच्या या प्रवेशाप्रसंगी पालघर विधानसभेचे आ. राजेंद्र गावित,बोईसर विधानसभेचे आ. विलासजी तरे,माझे सहकारी जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण,शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतीताई मेहेर,माजी आ.मनिषाताई निमकर, युवासेना जिल्हाध्यक्ष साईराज पाटील कुणाल पाटील,पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख रवी चौधरी,शहरप्रमुख राहुल घरत,माजी नगरसेवक बंड्या म्हात्रे,रईस खान,शहर संघटीका सविता मल्ला,युवासेना जिल्हा समन्वयक नैवेद्य संखे, युवासेना पालघर विधानसभाध्यक्ष कुमार माळी,विकी संखे,प्रदीप यादव, प्रफुल पाटील,नरेश पाटील यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

