संजय नेवे,विक्रमगड,
गरोदर महिला व स्तनदा माता यांना बाळंतविडा कीटचे वाटप,
जन्माला येणारे बालक सुदृढ असावे,यासाठी आज महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद पालघर,अंतर्गत येणाऱ्या विक्रमगड तालुक्यातील गरोदर महिला व स्तनदा मातांना बाळंत विडा किट वाटप करण्यात आले. सदर वाटप हे सुभाष भोये सदस्य व मंगू गढरी गटविकास अधिकारी पंचायत समिती विक्रमगड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्ण कामडी उपस्थित होत्या.मातांना बाळंत विड्याचं साहित्य देऊन त्याचे सर्व पदार्थ एकत्र करून लाडू बनवण्यास सांगण्यात आले. दररोज एक लाडू खाण्याबाबत अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.सदर आहाराचा समावेश का करण्यात आला आहे,याविषयी माहिती देण्यात आली.या आहारामध्ये स्तनदा मातेच्या पोषणासाठी असणाऱ्या सर्व घटकांचा समावेश असल्याबाबत सांगण्यात आले.विक्रमगड तालुक्यामध्ये सॅम – मॅमची घटत असलेली संख्या या विविध उपाययोजनामुळे होत असल्याने आज परिस्थितीमध्ये बदल होत आहॆ.

