वसंत भोईर,वाडा
तुम्ही घेताय तो आवळा गावरान की संकरित?
- आंबट,तुरट व कडवट अशा चवीनी युक्त असणारा बहुगुणी आवळा बाजारात दाखल झाला आहे.या फळाचे सेवन सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष मोठ्या चवीने करू शकतात.औषध म्हणून आवळ्याचा उपयोग होतो. त्यामुळे सर्वजण आवळा खरेदी करायला प्राधान्य देत आहेत.मागणी वाढल्याने बाजारात गावरान अन् संकरित आवळा सुद्धा बाजारात दाखल झाला आहे. बाजारपेठेत आवला विक्रीला उपलब्ध झाला असून साठ रु. प्रति किलो दराने विक्रीला उपलब्ध आहे.
आवळ्याचे लोणचे,कॅंडी,मुरंबा अनेकांना आवडत असतो.त्यामुळे अनेक गृहिणी हिवाळ्यात आवळ्याचे लोणचे तयार करतात.
हायब्रीड आवळा आकाराने मोठा असतो. त्यामुळे यापासून इतर उत्पादित वस्तू करणे,सोयीचे होते.गावरान आवळा आकाराने छोटा असतो.त्यात गर कमी असतो रस कमी निघत असल्यामुळे उत्पादनावर परिणाम पडतो.
केस,त्वचा चमकते:पचनशक्ती सुधारते,
आवळ्याच्या सेवनाने केस गळायचे थांबतात,लांब , चमकदार आणि काळे भोर होतात.यासोबतच पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
सध्या आवळ्याची आवक वाढली आहे. संक्रातीपर्यंत आवळ्याचा हंगाम असतो.या कालावधीत शहरात सर्वाधिक आवळा विकला जातो.गृहउद्योग, महिला बचत गट,गृहिणी कडून आवळ्याचे मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. लवकरच तुटवडा जाणवण्याची शआहे.
आवळ्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत.तसेच रसायन सुद्धा आहे.त्यामुळे आवळ्याचा वापर बलवर्धक, केशवर्धक,धातुवर्धक, उंचीवर्धक,दृष्टी सचित करणारे,रक्तशोधक,त्रिदोष नाशक म्हणून करतात त्यापासून ” क, ” जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते,तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. डोळ्यांसाठी ही आवला हितकारक मानला जातो. हिवाळ्यात आवळ्याचे सेवन करणे आरोग्यास फायद्याचे आहे.
-डाॅ.कुंदन संख्ये,आयुर्वेदाचायॅ

