दीपक मोहिते,
लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नातून लवकरच वसई – विरारचा पाणीपुरवठा सुधारणार,
वसई विरार शहरातील पाणी वितरण व्यवस्था आता लवकर सुधारणार असून शहरांसोबतच महापालिकेत समाविष्ट गावांनाही पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.अमृत २.o अभियानांतर्गत शहरातील जल वितरण व्यवस्था बळकट आणि विस्तारित करण्यासाठी पालिका क्षेत्रात ९५ कि.मी. मुख्य जलवाहिन्या,४८७ किमी वितरण जलवाहिन्या आणि १० जलकुंभ उभारले जाणार आहेत.यासाठी प्रत्यक्ष कामाला डिसें. २०२४ पासून जलवाहिन्या अंथरण्याचे काम ठेकेदारांतर्फे सुरु करण्यात आले आहे.
लोकनेते हितेंद्र ठाकूर,माजी आ.क्षितिज ठाकूर आणि माजी आ.राजेश पाटील यांनी वसई विरारचा पाणीवितरण व्यवस्था सुधारण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यांच्या पाठपुराव्याला यश येत शासनाकडून अमृत २.o पाणीपुरवठा योजना मंजूर करून शासनाने याकामी मार्च २०२३ मध्ये रु. ४९४.१ कोटी रू. खर्चाला प्रशासकीय मंजुरी दिली होती.मंजुरी देण्यात आलेल्या खर्चापैकी ७० % अनुदान रु.३४५.८८ कोटी रू.खर्चाचा निधी वितरित करण्यात आला आहे.एप्रिल २०२४ पासून या कामाला सुरुवात झाली असून डिसें. २०२४ पासून प्रत्यक्ष जलवाहिन्या अंथरण्याची कामे वेगाने सुरु झाली आहेत.
एमएमआरडीएकडून पालिकेला सूर्या योजनेतून अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे.शहरातील विविध भागातील जलवाहिन्या आणि जलकुंभाची जलदाब चाचणी करण्याची कामे सुरु असून ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेतील पालिकेत समाविष्ट ५५ पैकी २६ गावांना यापूर्वीच पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.उर्वरित सर्व गावांमध्ये नव्याने जलवाहिन्या अंथरण्याची व दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यांनतर टप्य्याटप्याने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

