- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
Author: दीपक मोहिते
सुरेश काटे,तलासरी खाजगी परीक्षाकेंद्रे बदलण्याची उमेदवारांची मागणी, पालघर जिल्ह्यालगत असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची दुय्यम अभियंता व कनिष्ठ अभियंता या पदाच्या परीक्षा फेब्रु.व मार्च महिन्यात आयोजित करण्यात आली आहॆ.या परीक्षेसाठी आयबीपीएस कंपनीची नेमणूक झाली असताना अधिकृत परीक्षा केंद्र न देता खाजगी केंद्रावर परीक्षा ठेवण्यात आली आहे. दुय्यम व कनिष्ठ अभियंता ही अत्यंत महत्त्वाची पदे असून त्यासाठी खाजगी गल्लीबोळात देण्यात आलेल्या परीक्षाकेंद्रामुळे परीक्षेत गैरप्रकार होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे महाराष्ट्रातील गरीब विद्यार्थी ९०० ते १००० रु.फी भरून विद्यार्थी चार ते पाच वर्षे तयारी करतात आणि अशा प्रकारे परीक्षा केंद्र मिळत असतील तर हा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर खूप मोठा अन्याय आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे…
” टग्या,” फंटर लंख्येने अधिकाऱ्यांच्या काढल्या चड्ड्या, बहुचर्चित वसई विरार शहर महानगरपालिकेची लक्तरे आता वेशीला टांगली गेली असून दररोज एकामागोमाग नवनवीन प्रकरणे बाहेर येत आहेत.” खंडणी व वसुली,हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो तुम्हा करदात्यांच्या उरावर बसून मिळवणारच,” असे या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बोधवाक्य बनवले आहे.या महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी कंबरेचे सोडून डोक्याला बांधले आहे.एक वरीष्ठ अधिकारी नामे अनिककुमार भवार व परेश कनाले या दोघांनी गेल्या तीन वर्षात महानगरपालिकेची तिजोरी लुटून खाल्ली. वसई विरार उपप्रदेशात या दोघांचे खंडणीखोर फंटर्स यांनी हैदोस घातला आहे.त्यांच्याच एका फंटरने दोन दिवसांपूर्वी हे एका ऑडिओ क्लिपने सिद्ध करून दाखवले आहे.रोहन लंख्ये या फंटरने आपले वरीष्ठ वसुलीच्या पैशासाठी कसा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” फोर्ब्सच्या यादीत भारताला पहिल्या दहामध्ये स्थान नाही, अमेरिका,चीन,रशिया,फ्रांस नंतर महासत्ता होण्याची स्वप्न पाहणाऱ्या आपल्या देशाला यंदा फोर्ब्स – २०२५ यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळू शकलेले नाही.नेतृत्व,आर्थिक क्षमता,राजकीय शक्ती,लष्करी ताकद व आंतरराष्ट्रीय संबंध,या निकषावर आपला देश खरा उतरला नाही,त्यामुळे आपण बाराव्या क्रमांकावर फेकलो गेलो आहोत.या घडामोडीमुळे भारताला चांगलाच झटका बसला आहे. फोर्ब्सने जगातील शक्तिशाली राष्ट्राच्या नावाची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे.अमेरिकेने भक्कम अर्थव्यवस्था ( ३०.३४ ट्रीलीयन डॉलर्स व लोकसंख्या – ३४.५ कोटी,) व लष्करी ताकद या बळावर आपले अव्वल स्थान टिकवुन धरले आहे.तर चीनने ( १९.५३ ट्रीलीयन डॉलर्स व लोकसंख्या – १४१.०९ कोटी,) निर्यात,रोजगारनिर्मिती व लष्कर/आर्थिक क्षमता…
संजय लांडगे,वाडा, महिलांना मिळणार रोजगार निर्मितीसाठी सहाय्य, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोग आणि आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अपर्णा शिंगटे व आबिटघर ग्रामपंचायतीतर्फे जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आला होता.या जनजागृती शिबिराला महिला बचत गटाचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सदर जनजागृती शिबिरामध्ये खादी ग्रामोद्योग पालघर जिल्हा नोडल ऑफिसर अरुण कुमार यादव यांनी महिलांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी व त्यांना स्वयंपूर्ण बनवून आर्थिक साक्षर करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या नियोजनाचे सुंदर विवेचन केले. तसेच असे विविध सांस्कृतिक व समाजोपयोगी उपक्रम राबवून ग्रामपंचायत आबिटघरच्या सरपंच खऱ्या अर्थाने आपल्या सरपंच पदाचा गौरव वाढवत असल्याचा अभिमान वाटतो, असे उदगार,वाडा पंचायत समितीच्या सभापती अस्मिता लहांगे यांनी…
आशिष देशपांडे,मुंबई नक्की खरं काय ? आणि खोटं कोण बोलतंय ? मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे.मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ९८ हजार कोटी रु.च्या मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवींवर शिंदे सरकारने डल्ला मारल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांच्या या आरोपानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर येऊन घाईघाईने खुलासा केला,पण तो मुंबईकरांना पटलेला नाही.या ठेवी आता ९ हजार कोटीवर आल्याचे स्पष्ट होत आहे. शिक्षण,आरोग्य,उद्याने, धरणे,रस्ते,कोस्टल रोड,या सहा विकासकामांपैकी रस्ते व कोस्टल रोड,या दोन विकासकामांवर गेल्या तीन वर्षात प्रचंड खर्च करण्यात आला आहे.यामध्ये सत्ताधारी,अधिकारी व ठेकेदार यांचे उखळ चांगलेच पांढरे झाले आहे.ही जी लूट झाली आहे,ती प्रशासकीय…
बोईसर प्रतिनिधी, चुकून झाडलेल्या गोळीने साथीदाराचा बळी ; आठ जण अटकेत ,दोन जण फरार, पालघर तालुक्यातील बोरशेती जंगलात अवैध शिकारीदरम्यान झालेल्या गोळीबारात एका शिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. २९ जाने.रोजी पहाटे, रानडुकराच्या शिकारीसाठी जंगलात गेलेल्या टोळीतील एका सदस्याच्या बंदुकीतून चुकून झाडलेल्या गोळीने रमेश वरठा (वय ६० रा. बोरशेती ) यांचा जागीच मृत्यू झाला.त्यानंतर त्यांचा मृतदेह झुडुपांत लपवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र,पोलिसांच्या तपासातून ही घटना उघडकीस आली असून,या प्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. २८ जाने.रोजी आठ ते दहा जणांनी बोरशेती जंगलातील आंब्याच्या पाणी भागात रानडुकराच्या शिकारीचे नियोजन केले होते. शिकाऱ्यांनी बंदुका घेऊन डोंगराच्या कड्यावर आणि झाडांवर ठाण मांडले…
सुशील जोशी,पालघर पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न, पालघर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करताना पालघर जिल्ह्यातील सर्व विकास यंत्रणांनी लोकोपयोगी कामे तातडीने करावीत.अशा सूचना वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित शासकीय अधिकारी यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिल्या. वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक काल सकाळी ११.०० वाजता लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे झाली.सदर बैठकीस जि.प.अध्यक्ष प्रकाश निकम,खा.सुरेश म्हात्रे,आ.ॲड.निरंजन डावखरे,आ.राजेंद्र गावित, आ.दौलत दरोडा, आ.विलास तरे,आ.विनोद निकोले,आ.हरिश्चंद्र भोये, आ.स्नेहा दुबे-पंडित,आ. राजन नाईक, जिल्हाधिकारी गोविंद बोडके,पोलीस आयुक्त मिरा-भाईंदर, वसई-विरार मधुकर पाण्डेय,अति. आयुक्त एमएमआरडीए राधाबिनोद शर्मा,जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी…
दीपक मोहिते, ” परिवर्तन,” दिल्लीचे तख्त ; भाजप काबीज करण्याची शक्यता, सुमारे २७ वर्षानंतर भाजपला दिल्लीचे तख्त मिळण्याची शक्यता आहे. विविध एक्झिट पोल्सनी भाजपला काठावरचे बहुमत मिळेल,असा अंदाज व्यक्त केला आहे.चाणक्य या एक्झिट पोल एजन्सीने भाजपला ३९ – ४४ पर्यंत तर मॅट्रिझने ३५ – ४० जागा मिळतील,असा अंदाज व्यक्त केला आहे.तर आम आदमी पार्टीची मजल ३२ – ३७ पर्यंत जाऊ शकते,असे म्हंटले आहे.त्यामुळे निकालानंतर घोडेबाजाराला उत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला केवळ ३ जागा मिळू शकतील,अशी शक्यता चाणक्यने व्यक्त केली आहे.भाजपला जर काठावरचे बहुमत मिळाल्यास भाजप ” मिशन लोटस,” राबवेल.ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपने आम आदमी पार्टीला भगदाड…
वाडा येथील स्फोटाप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, वाडा तालुक्यातील वडवली येथील मे.एम.डी.पायरोलीसीस एल.एल.पी कंपनीत गेल्या आठवड्यात स्फोट होवून दोन मुलींना प्राण गमावावा लागला आहे,तर इतर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेला कंपनी व्यवस्थापक व मालक जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.तसेच पिडीत आणि मयत झालेल्या मुलांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी( अ ) ऑफ इंडियाचे सचिव रमेश भोईर यांनी केली आहे. वाड्याचे तहसीलदार यांना भोईर यांनी दिलेल्या निवेदनातून कंपनीत काम करणारे परमार कुटूंबियातील पाच ते सहा सदस्यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती होवून काही लोकं अत्यवस्थ आहेत.त्यामधील लहान मुलांपैकी काजोल परमार ( वय ३ वर्षे ),…
अनंत भोईर,पालघर आभासी पद्धतीने उपकेंद्र आणि आदर्श शाळांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, आज पालकमंत्री पालघर जिल्हा तथा महाराष्ट्र राज्य वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आभासी पद्धतीने जिल्ह्यातील उपकेंद्र आणि आदर्श शाळांचे उद्घाटन करण्यात आले. आज जिल्हा नियोजन समितीच्या सभे दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथून हे उद्घाटन करण्यात आले. सातपाटी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवास्थान इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र मलवाडा येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारत, मौजे इंदगाव येथे ता. विक्रमगड येथील उपकेंद्र इमारत, मौजे विजयनगर ता.जव्हार येथील उपकेंद्र इमारत, मौजे खैरे-अंबिवली ता.वाडा येथील उपकेंद्र इमारतींचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम,भिवंडीचे खा.सुरेश म्हात्रे,आ.निरंजन डावखरे, दौलत दरोडा,स्नेहा दुबे…
