- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, माझा गांव कुठे हरवला ? भाग क्र. १, आपला देश हा सुमारे सहा खेड्यामध्ये पसरलेला आहे.देशाचा पूर्व इतिहास लक्षात घेता खेडं हाच आपल्या देशाचा आत्मा आहे.पण गेल्या सात दशकात खेड्यातील आर्थिक व सामाजिक व्यवस्थेला तडा गेल्याचे दिसून आले आहे.गेल्या काही वर्षात खेड्यातून शहराकडे होणाऱ्या स्थलांतरणाचे प्रमाण प्रचंड वाढत गेले व खेडी ओस पडत गेली.या सात दशकाच्या काळात शासनकर्त्यांनी खेड्यातील हरवलेले चैतन्य परत निर्माण करण्याचा प्रयत्नच केला नाही.त्यांचे धोरण हे केवळ शहरी भागापूरतेच मर्यादित राहीले,त्यामुळे खेडी ही विकासापासून कायम वंचित राहीली. स्वातंत्र्यानंतर आखण्यात आलेले धोरण व प्रत्यक्षात निर्माण केलेली व्यवस्था,यामध्ये प्रचंड तफावत राहिल्यामुळे खेडी बाळसं धरू शकली नाहीत. पुरातन…
संजय लांडगे,वाडा वाडा शिवसेनेत ( शिंदे गट ) पक्ष प्रवेशाला चांगलाच वेग, राज्यात शिवसेनेत वेगाने इनकमिंग सुरु असताना पालघर जिल्ह्यातही दिवसागणिक प्रवेश होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात नालासोपारा येथे पाचशे ते सहाशे तरुण – तरुणीनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आज वाडा नगरपंचायत हद्दीतील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी नगराध्यक्ष संदीप गणोरे व शहर प्रमुख राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला. शिवशेना नेते प्रकाश पाटील यांच्या निवासस्थानी आज पार पडलेल्या एका कार्यक्रम प्रसंगी हा पक्षप्रवेश झाला. याप्रसंगी प्रभू धानवा,निशांत धानवा,जितेंद्र पवार,निलेश धानवा,प्रकाश घाडेगावकर, प्रीती घाडेगावकर,प्रिया…
अनंत भोईर,पालघर १९ फेब्रु. रोजी ” जय छत्रपती शिवाजी जय भारत,” यात्रेचे आयोजन, राष्ट्र व राज्याच्या शाश्वत विकासात युवा वर्गाचे मोलाचे योगदान आहे.युवांमध्ये नेतृत्व गुण,व्यक्तिमत्व विकास,सामाजिक सेवा भाव,शासकीय उपक्रमांबाबत माहीती व सहयोग यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. राष्ट्रभावना,सामाजिक सलोखा,युवा वर्गाच्या संकल्पना जाणून घेणे,कला, संस्कृती व परंपरा जतन करणे,स्वच्छता,पर्यावरण याविषयी जागृकता,राष्ट्र निर्माणात मोलाचे योगदान देणा-या व्यक्तिमत्वाच्या कार्याचे आदर्श युवा पिढी पर्यंत पोहचवणे,सांस्कृतिक वारसा जतन करणे,यासाठी केंद्र शासनाचे युवा कल्याण व खेल मंत्रालय,भारत सरकार व राज्य शासन यांच्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रु.२०२५ निमित्ताने ” जय छत्रपती शिवाजी जय भारत,” पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. या पदयात्रेत पालघर जिल्ह्यातील शाळा/महाविद्यालयातील विद्यार्थी,…
अवजड वाहनांच्या त्रासाने मुंगूस्ते ग्रामस्थ त्रस्त : दोन तास वाहने रोखून धरली, तालुक्यातील मुंगूस्ते येथील ग्रामस्थ अवजड वाहनांच्या त्रासाने त्रस्त झाले असून वैतागलेल्या नागरिकांनी आज सकाळी अकराच्या सुमारास गो-हे – कंचाड रस्त्यावरील सुरू असलेली अवजड वाहनांची वाहतूक मुंगूस्ते ग्रामस्थांनी रोखून धरली.अखेर पोलिसांनी आंदोलन स्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्या ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या दोन दिवसात सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अवजड वाहनाना सोडण्यात आले. या परिसरात मोठ्या प्रमाणात दगडखाणी आहेत शिवाय उरण – बडोदरा महामार्गासाठी लागणारी माती याच मार्गाने नेली जात असल्याने सध्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे.त्यामुळे या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. शिवाय सर्वत्र धुळीचे साम्राज्य…
वसंत भोईर,वाडा मराडेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक शिवशक्ती पीठ, भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा,या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य शिव शक्तीपीठ साकारण्यात येत आहे.शिवभक्त राजूभाऊ चौधरी यांनी हे शिव शक्तिपीठ साकारले आहे. या शिवशक्ती पिठाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून शिव शक्तीपीठ लोकार्पण सोहळा येत्या १४ मार्च २०२५ रोजी संपन्न होत आहे.अत्यंत सुबक व सुंदर पद्धतीने साकारलेले हा शिवशक्ती पीठ भविष्यात सर्व शिवभक्तांचे व महाराष्ट्र प्रेमी जनतेचे आकर्षणाचे केंद्र ठरणार असून,सर्व शिवप्रेमी या ठिकाणी नवी शिव ऊर्जा घेऊन जातील,अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे. हे शिव शक्तिपीठ साकारण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करणारे राजूभाऊ चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षांव होत आहे.
वसंत भोईर,वाडा, वाडा येथे मधमाशांचा हल्ला : अनेक नागरिक किरकोळ जखमी, तालुक्यातील तिळसेश्वर येथे आज सकाळी दशक्रिया विधी कार्यक्रम सुरू असताना मधमाशानी अचानकपणे हल्ला केल्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. मधमाशांच्या हल्ल्यात भटजी हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.अनेक नागरिकांना मधमाशांनी चावा घेतल्याने नागरिकांची पळापळ झाली. हाती आलेल्या वृत्तानुसार, तालुक्यातील भावेघर येथे एक व्यक्ती मयत झाल्याने त्यांचा दशक्रिया विधी आज तिळसेश्वर येथे होता.दशक्रीया विधी कार्यक्रम सुरू असतानाच जवळच असलेला मधमाशांचा पोळा उठल्यामुळे मधमाशांचा हैदोस सुरु झाला.पिसाळसलेल्या मधमाश्यानी विधीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना चावा घेतला. भटजींचा कडकडून चावा घेतल्याने ते सैरभर पळू लागले.शेवटी भटजींनी नदीमध्ये उडी मारून…
दीपक मोहिते माजी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा : भाड्याच्या खोलीत राहत होते… एका घरमालकाने भाडेकरूने त्याचे घरभाडे न दिल्याने ९४ वर्षीय वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले. त्या म्हातार्याकडे जुना पलंग, काही अॅल्युमिनियमची भांडी,एक प्लॅस्टिकची बादली शिवाय अन्य काहीही सामान नव्हते. म्हाताऱ्याने मालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली. शेजाऱ्यांनाही म्हातार्याची दया आली आणि त्यांनीही भाडे देण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती घरमालकाला केली.घरमालकाने अनिच्छेने त्याला भाडे भरण्यासाठी थोडा वेळ दिला. म्हातार्याने सामान आत घेतले. तेथून जाणाऱ्या एका पत्रकाराने थांबून हे सर्व दृश्य पाहिले.ही बातमी आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे,फायदेशीर ठरेल असे त्याला वाटले.त्याने ” क्रूर घरमालक पैशासाठी म्हातार्याला भाड्याच्या घरातून बाहेर काढतो.”…
दीपक मोहिते, ग्रामीण पाणीपुरवठा ; सरकारकडे निश्चित धोरणाचा अभाव, फेब्रु.महिना सुरू झाला की पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांची डोक्यावर हंडे घेऊन भटकंती सुरू होत असते.गेली अनेक वर्षे हे दुष्टचक्र असंच सुरू आहे. गेल्या काही वर्षात ऋतुचक्र कोलमडून पडले असून त्यांचा परिणाम वातावरणावर जाणवू लागला आहे.पावसाचे आगमन उशिराने होणे,पावसाचे मधूनच गायब होणे,अवकाळी व परतीचा पाऊस,अशा नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ग्रामस्थांना दरवर्षी फेब्रु.ते जून असे पाच महिने पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात.पर्यावरण व प्रदूषण,अशा दोन कारणामुळे पावसाचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. दरवर्षी मार्चपासून ग्रामीण भागातील विहिरी व बोअरिंग कोरड्याठाक पडू लागतात,ते थेट जूनच्या अखेरीस पावसाचे आगमन होईस्तोवर..पूर्वी मे व जून,असे दोन महिने…
जव्हार, प्रतिनिधी, जव्हार येथे संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती उत्साहात साजरी. जव्हार तालुक्यातील सिंफनी रिसॉर्ट येथे क्रांतिकारी संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास जव्हार तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सेवालाल महाराज यांना समाजाच्या परंपरेनुसार भोग लावून करण्यात आली.त्यानंतर बंजारा संस्कृतीचे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले,ज्यात समाजातील लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते.महिला मंडळांनीही रंगारंग सादरीकरणातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले.संस्कृतीचे जतन आणि प्रचार करण्याच्या उद्देशाने सादर केलेल्या कार्यक्रमांत पारंपरिक नृत्य,लोकगीतं आणि सांस्कृतिक कथा,यांचा समावेश होता. या सर्व…
वसंत भोईर,वाडा वाड्यात उन्हाळी भातपिकाची शेती.. वाडा तालुक्यातील खैरे – पासोरीपाडा येथील शेतकरी अशोक कोंडू पाटील या शेतक-याने आपल्या ४ एकर जागेत उन्हाळी भातपिकाची शेती केली असून जया या भात वाणाची लागवड केली आहे. उन्हाळी भातपीक शेती करण्याची ही माझी पहीलीच वेळ असून विंधन विहीरीच्या साहाय्याने पाणी देत आहे.या शेतीत विशेष नफा झाल्यास उन्हाळी शेतीमध्ये सातत्य कायम ठेवीन,असे त्यांचे म्हणणे आहे. वाडा तालुक्यात भात हे प्रमुख कृषी उत्पादन आहे. सिंचनाच्या विशेष सुविधा नसतानाही उन्हाळी हंगामात ही भातपीकाची लागवड करून येथील प्रयोगशील शेतकरी अशोक पाटील यांनी भाताचे उत्पादन घेण्याचे धाडस केले आहे.उन्हाळी भातशेती ही कष्टप्रद आणि त्रासाची असते.या सबबीखाली येथील शेतकरी…
