वसंत भोईर,वाडा
मराडेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक शिवशक्ती पीठ,
भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा,या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य शिव शक्तीपीठ साकारण्यात येत आहे.शिवभक्त राजूभाऊ चौधरी यांनी हे शिव शक्तिपीठ साकारले आहे.
या शिवशक्ती पिठाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून शिव शक्तीपीठ लोकार्पण सोहळा येत्या १४ मार्च २०२५ रोजी संपन्न होत आहे.अत्यंत सुबक व सुंदर पद्धतीने साकारलेले हा शिवशक्ती पीठ भविष्यात सर्व शिवभक्तांचे व महाराष्ट्र प्रेमी जनतेचे आकर्षणाचे केंद्र ठरणार असून,सर्व शिवप्रेमी या ठिकाणी नवी शिव ऊर्जा घेऊन जातील,अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.
हे शिव शक्तिपीठ साकारण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करणारे राजूभाऊ चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षांव होत आहे.

