अनंत भोईर,पालघर
१९ फेब्रु. रोजी ” जय छत्रपती शिवाजी जय भारत,”
यात्रेचे आयोजन,
राष्ट्र व राज्याच्या शाश्वत विकासात युवा वर्गाचे मोलाचे योगदान आहे.युवांमध्ये नेतृत्व गुण,व्यक्तिमत्व विकास,सामाजिक सेवा भाव,शासकीय उपक्रमांबाबत माहीती व सहयोग यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. राष्ट्रभावना,सामाजिक सलोखा,युवा वर्गाच्या संकल्पना जाणून घेणे,कला, संस्कृती व परंपरा जतन करणे,स्वच्छता,पर्यावरण याविषयी जागृकता,राष्ट्र निर्माणात मोलाचे योगदान देणा-या व्यक्तिमत्वाच्या कार्याचे आदर्श युवा पिढी पर्यंत पोहचवणे,सांस्कृतिक वारसा जतन करणे,यासाठी केंद्र शासनाचे युवा कल्याण व खेल मंत्रालय,भारत सरकार व राज्य शासन यांच्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रु.२०२५ निमित्ताने ” जय छत्रपती शिवाजी जय भारत,” पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या पदयात्रेत पालघर जिल्ह्यातील शाळा/महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण युवक व युवती,खेळाडू, स्काउट गाईड व एनसीसी यांनी आपल्या गणवेशात तसेच ढोलताशा,लेझिम पथक,पांरपारिक वेषभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम,योगा, मल्लखांब,पारंपारिक व ऐतिहासिक बाबींची पथकामध्ये सामील होणा-यांनी विद्यार्थ्यानी त्या-त्या वेशभूषा व सांस्कृतिक वेशभूषेत उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे आवाहन, जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.

