संजय लांडगे,वाडा
वाडा शिवसेनेत ( शिंदे गट ) पक्ष प्रवेशाला चांगलाच वेग,
राज्यात शिवसेनेत वेगाने इनकमिंग सुरु असताना पालघर जिल्ह्यातही दिवसागणिक प्रवेश होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात नालासोपारा येथे पाचशे ते सहाशे तरुण – तरुणीनी शिंदे गटात प्रवेश केला होता.
आज वाडा नगरपंचायत हद्दीतील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व
शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी नगराध्यक्ष संदीप गणोरे व शहर प्रमुख राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला.
शिवशेना नेते प्रकाश पाटील यांच्या निवासस्थानी आज पार पडलेल्या एका कार्यक्रम प्रसंगी हा पक्षप्रवेश झाला. याप्रसंगी प्रभू धानवा,निशांत धानवा,जितेंद्र पवार,निलेश धानवा,प्रकाश घाडेगावकर, प्रीती घाडेगावकर,प्रिया धानवा,पौर्णिमा धानवा व सीमा धानवा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.प्रकाश पाटील यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील सामाजिक व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

