दीपक मोहिते
माजी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा : भाड्याच्या खोलीत राहत होते…
एका घरमालकाने भाडेकरूने त्याचे घरभाडे न दिल्याने ९४ वर्षीय वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले. त्या म्हातार्याकडे जुना पलंग, काही अॅल्युमिनियमची भांडी,एक प्लॅस्टिकची बादली शिवाय अन्य काहीही सामान नव्हते. म्हाताऱ्याने मालकाला भाडे देण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली. शेजाऱ्यांनाही म्हातार्याची दया आली आणि त्यांनीही भाडे देण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती घरमालकाला केली.घरमालकाने अनिच्छेने त्याला भाडे भरण्यासाठी थोडा वेळ दिला.
म्हातार्याने सामान आत घेतले.
तेथून जाणाऱ्या एका पत्रकाराने थांबून हे सर्व दृश्य पाहिले.ही बातमी आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे,फायदेशीर ठरेल असे त्याला वाटले.त्याने ” क्रूर घरमालक पैशासाठी म्हातार्याला भाड्याच्या घरातून बाहेर काढतो.” अशा मथळ्याखाली त्याने बातमी तयार केली व त्या पीडित भाडेकरूचे आणि भाड्याच्या घराचे काही फोटोही काढले.
पत्रकाराने आपल्या पेपरच्या मालकाला घडलेला प्रकार सांगितला. मालकाने ते फोटो बघताच त्यांना धक्काच बसला.त्यांनी विचारले,या म्हाताऱ्याला तू ओळखले नाही का ? पत्रकार म्हणाला,नाही मी त्यांना नाही ओळखले..!
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मोठी बातमी छापून आली.” गुलझारीलाल नंदा,” भारताचे माजी पंतप्रधान,एक दयनीय जीवन जगत आहेत,” या बातमीत पुढे लिहिले होते की,माजी पंतप्रधान कसे आपल्या घराचे भाडे देऊ शकले नाहीत आणि त्यांना घरमालकाने घरातून कसे हाकलून दिले.आजकाल फ्रेशर्सही भरपूर पैसे कमावतात,अशी टिप्पणी केली गेली.तर दोन वेळा काळजीवाहू माजी पंतप्रधान राहिलेल्या आणि दीर्घकाळ केंद्रीयमंत्री राहिलेल्या व्यक्तीकडे स्वतःचे घरही नाही.
वास्तविक गुलझारीलाल नंदा यांना रु.५०० /- प्रत महिना भत्ता जाहीर झाला होता,परंतु स्वातंत्र्यसैनिकांच्या भत्त्यासाठी आपण स्वातंत्र्य लढाई लढलो नाही,असे सांगून त्यांनी हे पैसे नाकारले होते.नंतर त्यांच्या मित्रांनी तुम्हाला दुसरे कोणतेही आर्थिक स्त्रोत नाहीत,त्यामुळे हे पैसे स्विकारा,अशी गळ घातली.त्यांतर त्यांनी पैसे स्विकरण्यास सुरुवात केली.या पैशातून ते घरभाडे देऊन उरलेल्या पैशात गुजराण करत असत.
दुसऱ्या दिवशी तत्कालीन पंतप्रधानांनी,मंत्री आणि अधिकाऱ्यांना वाहनांच्या ताफ्यासह त्यांच्या घरी पाठवले.व्हीआयपी वाहनांचा एवढा ताफा पाहून घरमालक थक्क झाला.त्यानंतर त्याला कळले की त्याचे भाडेकरू हा साधारण माणूस नाहीतर ते गुलझारीलाल नंदा असून भारताचे माजी पंतप्रधान होते.घरमालक त्यांच्या गैरवर्तनाबद्दल लगेच गुलझारीलाल नंदा यांच्या चरणी नतमस्तक झाले.
अधिकारी आणि व्हीआयपींनी गुलझारीलाल नंदा यांना सरकारी निवास आणि इतर सुविधा स्विकारण्याची विनंती केली.पण गुलझारीलाल नंदा यांनी या वृद्धापकाळात अशा सुविधांचा उपयोग काय ? असा प्रतिप्रश्न करत त्यांचा प्रस्ताव स्विकारला नाही.शेवटच्या श्वासापर्यंत ते सामान्य नागरिकासारखे साधे जीवन जगले.१९९७ मध्ये सरकारने त्यांचा भारतरत्न देऊन गौरव केला.
त्यांच्या आयुष्याची तुलना सध्याच्या राजकारण्यांशी पंचतारांकित जीवनाशी करा.

