जव्हार, प्रतिनिधी,
जव्हार येथे संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती उत्साहात साजरी.
जव्हार तालुक्यातील सिंफनी रिसॉर्ट येथे क्रांतिकारी संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास जव्हार तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सेवालाल महाराज यांना समाजाच्या परंपरेनुसार भोग लावून करण्यात आली.त्यानंतर बंजारा संस्कृतीचे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले,ज्यात समाजातील लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते.महिला मंडळांनीही रंगारंग सादरीकरणातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले.संस्कृतीचे जतन आणि प्रचार करण्याच्या उद्देशाने सादर केलेल्या कार्यक्रमांत पारंपरिक नृत्य,लोकगीतं आणि सांस्कृतिक कथा,यांचा समावेश होता. या सर्व कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जव्हार तालुक्यातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.त्यांच्या योगदानामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि आनंदी वातावरणात पार पडला.कार्यक्रमाच्या शेवटी संत सेवालाल महाराज यांच्या कार्याचा आणि समाजासाठीच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.या प्रसंगी संतांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्पही करण्यात आला.

